उच्च न्यायालयात नोकरीची मोठी संधी, 1000 हून अधिक टायपिस्ट, लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु!
Highcourt Bharti For 1000 Posts
न्यायालयात नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. तेलंगणा उच्च न्यायालयात विविध पदांसाठी 1000 पेक्षा जास्त रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. कोर्ट मास्टर, कॉम्प्युटर ऑपरेटर, स्टेनोग्राफर, टायपिस्ट, कनिष्ठ सहाय्यक, परीक्षक व इतर पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 8 जानेवारी 2025 पासून ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी 2025 आहे. संबंधित पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. अधिक माहितीसाठी वाचा.
तेलंगणा उच्च न्यायालयाने मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली असून, विविध पदांसाठी 1000 हून अधिक रिक्त जागा उपलब्ध आहेत. कोर्टात नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. या भरतीमध्ये कोर्ट मास्टरच्या 12, कॉम्प्युटर ऑपरेटरच्या 11, असिस्टंटच्या 42, परीक्षकाच्या 24, टायपिस्टच्या 12, कॉपीिस्टच्या 12, सिस्टम ॲनालिस्टच्या 20, ऑफिस सबऑर्डिनेटच्या 75, स्टेनोग्राफर ग्रेड IIच्या 45, कनिष्ठ सहाय्यकच्या 340, फील्ड असिस्टंटच्या 66, प्रोसेस सर्व्हरच्या 130, रेकॉर्ड असिस्टंटच्या 52 आणि कार्यालय अधीनस्थांच्या 479 पदांचा समावेश आहे. अर्ज प्रक्रिया येत्या 8 जानेवारी 2025 पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे. पात्र उमेदवारांनी वेळ न दवडता अर्ज करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. भरती प्रक्रियेसंबंधी अधिक माहिती हवी असल्यास tshc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, जिथे याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कसा कराल अर्ज?
- सर्व प्रथम तेलंगणा उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइट (tshc.gov.in) वर जा.
- मुख्यपृष्ठावर दिलेल्या सूचनेवर क्लिक करा.
- वेगवेगळ्या पोस्टसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
- आवश्यक माहिती भरून नोंदणी क्रमांक मिळवा.
- नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
- अर्ज काळजीपूर्वक भरा आणि सबमिट करा.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर, एक अद्वितीय क्रमांक तयार होईल.
- भविष्यातील वापरासाठी अर्ज डाउनलोड करा आणि मुद्रित करा.
- वयोमर्यादा: या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, उमेदवारांचे वय 18 ते 34 वर्षांच्या दरम्यान असावे. 1 जुलै 2024 रोजी वयाची गणना केली जाईल.
लेखी परीक्षा
काही पदांसाठी संगणकावर आधारित लेखी परीक्षा घेतली जाईल. परीक्षेत एकूण 90 प्रश्न असतील, त्यापैकी 50 प्रश्न सामान्य ज्ञानाशी संबंधित असतील आणि 40 प्रश्न सामान्य इंग्रजीशी संबंधित असतील. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असेल आणि उमेदवारांना परीक्षेसाठी 120 मिनिटे मिळतील.
Table of Contents