तरुणांसाठी एक मोठी खुशखबर !! महाराष्ट्रात 2795 पदांसाठी मोठी भरती सुरु ! चला तर मग अर्ज करा | Mega Govt Job Opportunity: 2795 Posts!

Mega Govt Job Opportunity: 2795 Posts!

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी खुशखबर आहे. महाराष्ट्र सरकारने पशुसंवर्धन विभागात मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून विभागातील रिक्त पदे भरून काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Mega Govt Job Opportunity: 2795 Posts!

पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या 2795 पदांसाठी भरती प्रक्रिया
पशुसंवर्धन सेवा गट-अ मधील पशुधन विकास अधिकारी (Livestock Development Officer – LDO) या संवर्गातील 2795 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) कडे अधिकृतरित्या मागणीपत्र सादर करण्यात आले आहे. ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

विभागाचे काम पूर्ण क्षमतेने सुरू राहण्यासाठी भरती अत्यावश्यक
ग्रामीण भागात पशुसंवर्धनाचे कार्य अधिक वेगाने आणि कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी विभागातील पदे भरली जाणे अत्यावश्यक होते. पशुधन विकास अधिकाऱ्यांची भूमिका केवळ जनावरांचे आरोग्य सांभाळण्यातच नव्हे तर दुग्धव्यवसाय, जनावरांचे लसीकरण, शेतकऱ्यांना मार्गदर्शन अशा अनेक बाबतींत महत्त्वाची असते.

मंजूर आकृतीबंधानुसार 5684 पैकी 2798 पदे रिक्त
सुधारित आकृतीबंधानुसार पशुसंवर्धन सेवा गट-अ मध्ये एकूण 5684 पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या 1886 पदे भरलेली असून 2798 पदे रिक्त आहेत. याशिवाय 2025 च्या अखेरीस 8 पदे सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणार आहेत. त्यामुळे एकूण 2806 पदांची भरती गरजेची बनली आहे.

सरळसेवा जाहिरात क्र. 12/2022 अंतर्गत प्रतीक्षा यादीतील 11 पदांची कार्यवाही सुरू
याआधी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सरळसेवा जाहिरात क्र. 12/2022 अंतर्गत प्रतीक्षा यादीतील ११ उमेदवारांना संधी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पार पडल्यावर उर्वरित 2795 पदांसाठी स्वतंत्र जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.

तातडीने भरती करण्याचे आदेश; प्रक्रिया लवकरच सुरू
मंत्री पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला तातडीने भरती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. विभागातील कामकाजावर होत असलेल्या परिणामाची गांभीर्याने दखल घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे. ही भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना व पशुपालकांना अधिक चांगली सेवा उपलब्ध होणार आहे.

ग्रामीण भागातील पशुपालकांना दिलासा
ही भरती केवळ नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठीच नव्हे, तर ग्रामीण भागातील जनतेसाठीही एक दिलासादायक निर्णय आहे. पशुधन विकास अधिकाऱ्यांमार्फत वेळेत लसीकरण, उपचार, जनावरांची तपासणी अशा सेवा पोहोचवता येणार आहेत, असे मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

सुवर्णसंधीचा फायदा घ्या!
या मेगाभरतीमुळे सहस्त्रों तरुणांना शासकीय नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम, वयोमर्यादा आणि इतर अटी जाणून घेण्यासाठी सज्ज रहावे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड