जी-सूट फॉर एज्युकेशन, गुगल क्लासरुम – राज्यात ऑनलाइन वर्गांसाठी दोन नवीन उपक्रम

Google Classroom For Education

Google Classroom For Education : जी-सूट फॉर एज्युकेशन आणि गुगल क्लासरुम या दोन नवीन उपक्रमांचं उद्घाटन गुरुवारी राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आलं.

Google Classroom For Education: ‘संपूर्ण जग एका विचित्र परिस्थितीतून जात आहे. सगळं जग ठप्प असताना शिक्षण निरंतर कसं सुरू ठेवायचं हा मोठा प्रश्न होता. शाळा कधी सुरू होणार यापेक्षा शिक्षण कसं सुरू राहणार हा मोठा प्रश्न होता. मला आनंद आहे की जी सूट आणि गुगल क्लासरुम हे उपक्रम सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे याचा मला अभिमान आहे. करोनाच्या आपत्तीत अनेक चांगल्या गोष्टीही होत आहेत. वर्तमानातून आपण भविष्यात गेलो आहोत. नवीन पिढीला तंत्रज्ञानाचं स्वप्न दाखवणं गुगलमुळे शक्य झालं आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याला अन्य क्षेत्रातही कसा करता येईल हे पाहणं महत्त्वाचं आहे,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Google Classroom

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जी-सूट फॉर एज्युकेशन आणि गुगल क्लासरुम या दोन नवीन उपक्रमांचं उद्घाटन गुरुवारी राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आलं. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. गुगल इंडियाचे उपाध्यक्ष संजय गुप्ता यांनीही यावेळी मार्गदर्शन केलं. ”शाळा बंद पण शिक्षण सुरू आहे’, एससीईआरटीचं कॅलेंडर, रेडिओ, दूरदर्शनच्या माध्यमातून शिक्षण आदि अनेक उपक्रम महाराष्ट्र शासनाने सुरू केले. आता एससीईआरटी गुगलसोबत पार्टनरशीप करत आहे. या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षण यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे,’ असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

ऑनलाइन वर्ग म्हणजे वर्ग म्हणजे संकटकाळात संधी शोधण्याचा प्रयत्न : अजित पवार
‘करोनाकाळातही विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू राहिलं पाहिजे, या उद्देशाने शासनाने हे उपक्रम सुरू केले आहेत. व्हर्च्युअल क्लासरुमच्या माध्यमातून हे वर्ग म्हणजे संकटकाळात संधी शोधण्याचा प्रयत्न आहे. राज्याच्या शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं, शिकण्याची व शिकवण्याची प्रक्रिया सुरू राहावी यासाठी राज्याचा शालेय शिक्षण विभाग सुरूवातीपासुनच प्रयत्नशील आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सर्व संबंधित घटकांना या उपक्रमाला पाठिंबा द्यावा असं माझं आवाहन आहे. केंद्र सरकारने नुकतंच नवं शैक्षणिक धोरण आणलं आहे. आधुनिक काळाची गरज लक्षात घेऊन राज्यातील शिक्षण विभागही पावलं टाकत आहे ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. अर्थात तंत्रज्ञानाने जग कितीही बदललं तरी वर्गात प्रत्यक्ष शिक्षक शिकवताना विद्यार्थ्यांना मिळणारा शिक्षणाचा आनंद वेगळाच असतो, याची मला जाणीव आहे. मात्र करोना संकटातून बाहेर पडल्यावर आपण लवकरच हे वर्गही सुरू करू अशी मला खात्री आहे,’ असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड