Goa TET Exam Update
गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ९ आणि १० डिसेंबर रोजी गोवा शिक्षक पात्रता परीक्षा (GTET) ची दुसरी सत्र परीक्षा आयोजित करणार आहे. या परीक्षेसाठीची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू असून, यंदा किमान ३ हजार शिक्षक परीक्षेला बसतील, असा अंदाज मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी व्यक्त केला.
मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिव्यांग उमेदवारांसाठी नोंदणी शुल्क पूर्णतः माफ करण्यात आले आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना फक्त ५० टक्के शुल्क भरावे लागणार आहे. शिक्षकभरतीसाठी अर्ज करताना GTET उत्तीर्ण असणे ही अनिवार्य अट असल्याने उमेदवारांमध्ये परीक्षेबद्दल उत्साह दिसत आहे.
गोवा बोर्डाकडून ही परीक्षा दुसऱ्यांदा घेतली जात असून, मागील सत्राची परीक्षा मे- जून २०२४ मध्ये पार पडली होती. प्राथमिक शिक्षकांसाठीच्या पेपर १ मध्ये किमान १,००० उमेदवार, तर इयत्ता ६ वी ते ८ वीच्या माध्यमिक शिक्षकांसाठीच्या पेपर २ मध्ये सुमारे २,००० उमेदवार सहभागी होतील, अशी माहिती मंडळाने दिली आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















