https://mahabharti.in/wp-admin/edit.php?post_type=better-banner

पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना मोफत इंटर्नशिप- ‘के स्किम’ अंतर्गत फ्री इंटर्नशिपची संधी

Polytechnic free Internship Maharashtra

पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना मोफत इंटर्नशिप’के स्किम’ अंतर्गत संधी – Free Internship For Polytechnic Students in Maharashtra  under K Schme 2025 – महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंतर्गत राज्यातील तंत्रनिकेतन शिक्षण संस्थांमध्ये ‘के स्किम’ योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण (इंटर्नशिप) मोफत दिली जात आहे. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. सर्व विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेता येणार आहे अशा सूचना पुन्हा दिल्या आहेत. यासंदर्भातील वेळापत्रक जाहीर केले आहे. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना १२ आठवड्यांचे औद्योगिक अनुभव मिळणार असून, यासाठी १० गुण दिले जाणार आहेत. प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक वातावरणाचा अनुभव मिळेल. तसेच, उद्योगातील तंत्रज्ञान आणि कौशल्यांबद्दल सखोल ज्ञान प्राप्त होईल. उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक कौशल्ये आत्मसात केल्याने विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी अधिक प्राप्त होतील. या संदर्भात संस्थांनी नोंदणी तसेच मार्गदर्शक म्हणून कोणतीही शुल्क आकारणी करु नये ही सर्व प्रक्रिया मोफत आहे.

polytechnic free internship maharashtra

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने गेल्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून के स्किम अंतर्गत पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुधारित करण्यात आला आहे. आता पाचव्या सत्रातील अभ्यासक्रमांना इंटर्नशिपची संधी यंदा मिळत आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात आले असून, त्याचा उद्देश विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान व औद्योगिक कौशल्ये प्राप्त करून देणे हा आहे. यासाठी संस्था प्रमुखांना आणि विद्यार्थ्यांना औद्योगिक नोंदणीसाठी स्वतंत्र संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. संस्थांनी उद्योग क्षेत्राशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी मिळवून द्यावी. या प्रक्रियेसाठी मंडळाने नोंदणी प्रपत्र आणि मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. संस्थांनी उद्योग क्षेत्राशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी मिळवून द्यावी. उद्योगांसोबत नोंदणी प्रक्रिया, मार्गदर्शक नियुक्ती व प्रगती मूल्यांकनाची प्रक्रिया नियमितपणे पूर्ण करावी असे आदेशही गुरुवारी मंडळाने दिले आहेत. प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्‌या दुर्बल विद्यार्थ्यांनाही या संधीचा लाभ घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना १२ आठवड्यांचे औद्योगिक अनुभव मिळणार असून, यासाठी १० गुण दिले जाणार आहेत. यासंदर्भातील वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार संस्थांनी कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या आहेत.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड