फॉक्सकॉन करणार भारतात मोठी भरती! – Telecom Sector Recruitment

Telecom Sector Recruitment by foxconn

तैवानस्थित फॉक्सकॉन कंपनीने बंगळुरूजवळील देवनहळ्ळी येथे उभारलेल्या नव्या आयफोन असेंब्ली युनिटसाठी अवघ्या आठ–नऊ महिन्यांत सुमारे ३० हजार कर्मचाऱ्यांना रोजगार दिला आहे. भारतात आजवर कोणत्याही कारखान्याने केलेली ही सर्वात वेगवान भरती मानली जात असून, चीनबाहेर आपली पुरवठा साखळी विविध करण्याच्या ॲपलच्या कटिबद्धतेचे हे द्योतक आहे. विशेष म्हणजे सुमारे ३०० एकर परिसरात उभारलेली ही सुविधा प्रामुख्याने महिलांच्या माध्यमातून चालवली जात असून, त्यातील सुमारे ८० टक्के महिला १९ ते २४ वयोगटातील आहेत आणि बहुतेकांसाठी ही पहिलीच नोकरी आहे. या युनिटमध्ये एप्रिल–मे २०२५ पासून चाचणी उत्पादन सुरू झाले होते, ज्यामध्ये आयफोन १६ तयार करण्यात आले. सध्या येथे नव्या आयफोन १७ प्रो मॅक्स मॉडेलचे उत्पादन सुरू असून, कारखान्यात तयार होणाऱ्या ८० टक्क्यांहून अधिक आयफोनची निर्यात केली जात आहे.

मिनी टाउनशिप आकार घेत असून, पुढील वर्षी उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर या कारखान्यात सुमारे ५० हजार कर्मचाऱ्यांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. परिसरात महिलांसाठी सहा मोठे वसतिगृह (डॉरमिटरी) ब्लॉक उभारण्यात येत असून, त्यापैकी अनेक आधीच कार्यान्वित झाले आहेत. येत्या काळात निवासी सुविधा, वैद्यकीय सेवा, शाळा व मनोरंजनाच्या सोयींसह हा कारखाना मिनी टाउनशिपचे स्वरूप घेऊ शकतो. महिला कर्मचाऱ्यांना दरमहा १८ हजार रुपये वेतन दिले जात असून, ब्लू-कॉलर नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी हे वेतन सर्वाधिक पातळीपैकी एक मानले जाते. यासोबतच मोफत निवास, प्रशिक्षण आदी सुविधाही पुरवण्यात येत आहेत.

देशातील सर्वात मोठा कारखाना ठरणार
फॉक्सकॉन या प्रकल्पात सुमारे २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. सुमारे २ लाख ५० हजार चौरस फूट उत्पादन क्षेत्रफळ असलेला हा कारखाना पूर्ण झाल्यानंतर उत्पादन आणि रोजगार या दोन्ही बाबतीत देशातील सर्वात मोठा कारखाना ठरू शकतो. तमिळनाडूतील फॉक्सकॉनच्या पहिल्या आयफोन युनिटपेक्षाही हा कारखाना मोठा असून, त्या ठिकाणी सध्या सुमारे ४१ हजार कर्मचारी कार्यरत आहेत.


 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

आयफोन बनवणारी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपनी फॉक्सकॉनने (foxconn) मोठी घोषणा केली आहे. फॉक्सकॉन कंपनी भारतात (India) 1200 कोटी रुपये खर्च करून 40 हजार रोजगार निर्माण करण्याच्या तयारीत आहे.  फॉक्सकॉनचा भारतातील व्यवसाय 2024 पर्यंत 10 अब्ज डॉलर्सच्या पुढे जाणार आहे. त्यामुळं रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार आहेत. Foxconn ने त्याच्या कर्नाटक स्थित कंपनी Hon High Technology India Mega Development Private Limited मध्ये सुमारे 1,200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. Foxconn Singapore Pvt. या कंत्राटी आयफोन उत्पादन कंपनीच्या सिंगापूर युनिटने अलीकडेच 10 रुपये प्रति शेअर दराने Foxconn Hon Hi Technology India Mega Development Pvt Ltd चे 120.35 कोटी पेक्षा जास्त शेअर्स खरेदी केले आहेत. कर्नाटक सरकारने गेल्या आठवड्यात एका निवेदनात म्हटले होते की फॉक्सकॉन डोड्डा बल्लापूरजवळ एक प्रचंड उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी 25000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. ज्यामुळं 40,000 रोजगार निर्माण होतील. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

FoxCom Jobs

 

चीन नंतर भारतातील दुसरा सर्वात मोठा प्लांट कर्नाटकमध्ये असलेले हे युनिट लवकरच फॉक्सकॉनचा चीननंतरचा दुसरा सर्वात मोठा प्लांट असेल. यातून 40000 थेट रोजगार निर्माण होणार आहेत. फॉक्सकॉनचा भारतातील व्यवसाय 2024 पर्यंत 10 अब्ज डॉलर्सच्या पुढे जाणार आहे. अलीकडील गुंतवणुकीसह, फॉक्सकॉन सिंगापूरने कर्नाटक युनिटमध्ये एकूण 13,800 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. कर्नाटक सरकारने फॉक्सकॉनला राज्यातील आगामी मोबाइल उत्पादन युनिटसाठी 300 एकर जमीन दिली आहे. भारतात आतापर्यंत 1.4 अब्ज डॉलरची गुंतवणूक फॉक्सकॉनने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने आतापर्यंत भारतात 1.4 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. आम्ही येत्या वर्षात बरेच काही करु अशी माहिती सीईओ यंग लिऊ यांनी दिली.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड