Mumbai University BA, BCom Final Year Result 2020

Final Year Exam Result

Mumbai University BA, BCom Final Year Result 2020 – Final Year Exam Result  : Mumbai University Results 2020 are published now. The TYBA, TY BCom University Examinations result can be check online now from mumresults.in. The further details about MU Results 2020.

आजपर्यंत विद्यापीठाने 206 निकाल जाहीर केले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) शैक्षणिक वर्ष 2019-20 च्या तृतीय वर्ष बी.कॉम. व बी.ए. परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या अंतिम वर्ष पदव्युत्तर एमकॉम सत्र 4 चा निकाल बुधवारी (ता.11) रात्री जाहीर करण्यात आला आहे. तसेच आयडॉलने तृतीय वर्ष बीकॉम आणि बी ए परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. हे निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

तृतीय वर्ष बीएस्सी सत्र ६ या परीक्षेचा निकाल ९७.८५ टक्के लागला आहे. या परीक्षेत एकूण ८ हजार ०२५ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. या परीक्षेला १० हजार ५२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १० हजार ४४७ परीक्षेस विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. तर ७६ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच १७६ विद्यार्थी हे परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत.

तृतीय वर्ष बीएमएस सत्र ६ या परीक्षेचा निकाल ९७.५८ टक्के लागला आहे. या परीक्षेत एकूण १३ हजार १६६ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. या परीक्षेला १५ हजार ७५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १५ हजार ७०७ परीक्षेस विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. तर ४४ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच ३२७ विद्यार्थी हे परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत.

परीक्षा विभागातील निकाल कक्ष व सीसीएफ मधील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग निकाल जाहीर करण्यासाठी कार्यरत आहेत.

निकाल – http://www.mumresults.in/


मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२०च्या अंतिम वर्षाच्या नियमित परीक्षेतील बीकॉम आणि बीएमएमचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. बीकॉमच्या सत्र ६चा निकाल ९५.७९ टक्के, तर बीएमएमचा निकाल ९६.११ टक्के इतका लागला आहे.

बीकॉमच्या परीक्षेत एकूण ४९ हजार २९३ एवढे विद्यार्थीउत्तीर्ण झाले. या परीक्षेला ६४ हजार ७४७ एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६४ हजार १८२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, तर ५३९ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. यासह बीएमएम सत्र ६च्या परीक्षेत एकूण तीन हजार ९५७ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेसाठी एकूण चार हजार ९४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी चार हजार ९०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षांचे निकाल विद्यापीठाच्या वेबसाइटवरील http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाने प्रथमतःच सत्र ६ सह नियमित मुख्य परीक्षेच्या सर्व निकालांच्या नमुना गुणपत्रिका गुण, ग्रेड व छायाचित्रासह विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांने त्यांच्या कॉलेजच्या नावाची निवड करून आसन क्रमांक टाकल्यास ही गुणपत्रिका छायाचित्रासह पीडीएफ फॉर्मेटमध्ये उपलब्ध होणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

‘अन्य निकालही वेळेत लागणार’

मुंबई विद्यापीठाच्या सर्व नियमित आणि बॅकलॉग परीक्षांच्या निकालास सर्वोच्च प्राधान्य देऊन वेळेत निकाल जाहीर करण्यासाठी विद्यापीठाने यशस्वी नियोजन केले आहे. कॉलेजांनी वेळेत पोर्टलवर गुण उपलब्ध करून दिल्यामुळे अल्पावधीतच विद्यापीठाने हे महत्वाचे निकाल जाहीर केले आहेत. इतरही सर्व निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी विद्यापीठाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.


TYBCom Mumbai University 2020 Result 

Final Exam Year Result Mumbai University Final Year Exam Results 2020: TYBcom Online result of Mumbai university is published now. The candidates can find there online results from the given links. Commerce candidates can Check the results online now. The official website to find the result is www.mu.ac.in.

TYBA, BPharm, BVoc, BArch Final Year Results

Mumbai Univerity also published the results of other streams like BA, BPharm, BVoc, BArch Final year results.

मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या अंतिम वर्ष/ सत्राच्या नियमित आणि बॅकलॉगच्या २० परीक्षांचे निकाल जाहिर करण्यात आले आहेत. यामध्ये तृतीय वर्ष बीकॉम सत्र ५ (सीबीसीएस) चा निकाल जाहीर करण्यात आला असून या परीक्षेचा निकाल ९४.३६ टक्के एवढा लागला आहे. या परीक्षेत एकूण २२ हजार ६५३ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. या परीक्षेला २५ हजार ६८२ एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी २४ हजार ५०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

एकूण २० परीक्षांचे निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. कोणत्या अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले ती यादी पुढीलप्रमाणे –

  1. बीकॉम अकॉऊन्ट एन्ड फायनान्स सत्र ६ (सीबीएसजीएस) व नॉन सीबीएसजीएस,
  2. बीकॉम अकॉऊन्ट एन्ड फायनान्स सत्र ५ (सीबीएसजीएस) व नॉन सीबीएसजीएस,
  3. बीकॉम बँकिंग एन्ड इन्श्युरन्स सत्र ६ (सीबीएसजीएस) व नॉन सीबीएसजीएस,
  4. बीकॉम बँकिंग एन्ड इन्श्युअरन्स सत्र ५ (सीबीएसजीएस),
  5. बीफार्म सत्र ७ (चॉईस बेस्ड),
  6. टीवाय बीए कलिनरी आर्ट सत्र ५ (सीबीसीएस),
  7. टीवाय बीए कलिनरी आर्ट सत्र ६ (सीबीसीएस),
  8. बीफार्म सत्र ८ (सीबीएसजीएस),
  9. बीफार्म सत्र ७ (सीबीएसजीएस),
  10. बी-व्होक टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट सत्र ५ (सीबीएसजीएस ७५:२५),
  11. बी-व्होक रिटेल मॅनेजमेंट सत्र ५ (सीबीएसजीएस ७५:२५),
  12. टीवाय बीकॉम इन्वेस्टमेंट मॅनेजमेंट सत्र ५(चॉईस बेस्ड),
  13. टीवाय बीकॉम ट्रांसपोर्ट मॅनेजमेंट सत्र ५ (चॉईस बेस्ड),
  14. टीवाय बीकॉम फायनान्शिअल मॅनेजमेंट सत्र ५ (चॉईस बेस्ड),
  15. बीएस्सी एव्हिएशन सत्र ५ (सीबीसीएस),
  16. टीवाय बीकॉम/ बीएमएस एन्व्हार्यमेंटल मॅनेजमेंट अँड इकोनॉमिक्स सत्र ५ (चॉईस बेस्ड),
  17. बॅचलर ऑफ सोशल वर्क सत्र ५ (सीबीसीएस),
  18. तृतीय वर्ष बॅचलर ऑफ आर्किटेक्चर टर्म १ आणि टर्म २

महाविद्यालयांकडून पोर्टलवर गुण अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू असून, उर्वरित इतर परीक्षांचेही निकाल जलदगतीने लावण्यासाठी विद्यापीठाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात असल्याचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाच्या सलंग्नित महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागातील अंतिम वर्ष/ सत्राच्या बॅकलॉग आणि नियमित परीक्षा या वेळेत पूर्ण झाल्या. २५ सप्टेंबर पासून सुरू झालेल्या या ऑनलाईन परीक्षांचे योग्य नियोजन करण्यात आले होते.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड