सणासुदीच्या काळात निर्माण होणार 10 लाख अतिरिक्त रोजगाराच्या संधी; महिलांना नोकरीच्या संधी!

Festival Job Opportunities

भारतातील नोकऱ्यांची परिस्थिती अजूनही बिकट आहे. एकीकडे नवीन नोकऱ्या निर्माण होत आहेत, मात्र दुसरीकडे बेरोजगारीही वाढत आहे. विशेषतः तरुण आणि महिलांमध्ये बेरोजगारीची समस्या अधिक पहायला मिळत आहे. आता त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे, भारतातील आगामी सणासुदीच्या हंगामात 10 लाखांपर्यंत नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे गिग आणि महिला कर्मचा-यांच्या सहभागामध्ये लक्षणीय वाढ होईल. आगामी सणासुदीच्या सिझनमध्ये व्हाईट कॉलर आणि ब्लू-कॉलर दोन्ही पोझिशन्स 35 टक्क्यांनी वाढतील. तंत्रज्ञान आणि डिजिटल टॅलेंट सोल्यूशन्स प्रदाता एनएलबी सर्व्हिसेसच्या मते, महिला गिग इकॉनॉमीमध्ये उपलब्ध असलेल्या लवचिकता आणि विविध भूमिकांकडे अधिकाधिक आकर्षित होत आहेत, ज्यामध्ये ब्रँड ॲडव्होकेसी, सौंदर्य, ऑनलाइन शिकवणी, घरगुती मदत, टॅक्सी ड्रायव्हिंग आणि फूड डिलिव्हरी अशा भूमिकांचा समावेश होतो. यासह रिटेल, हॉटेल, ई-कॉमर्स, लॉजिस्टिक्स, ग्राहकोपयोगी वस्तू, बँकिंग, वित्तीय सेवा, विमा अशा अनेक उद्योगांमध्ये नोकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Festival Job Opportunities

एनएलबी सर्व्हिसेसचे सीईओ सचिन अलुग म्हणतात की, डिलिव्हरी ड्रायव्हर्स, ग्राहक सेवा प्रतिनिधी, टेक सपोर्ट स्पेशलिस्ट आणि फ्रीलान्स इंजिनीअर्सची मागणी वाढत आहे. या उद्योगांमध्ये, ई-कॉमर्सला गेल्या वर्षीच्या तुलनेत 22 टक्के वाढीसह सर्वाधिक मागणी दिसेल.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख मेट्रो शहरांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत या सणासुदीच्या हंगामी भरतीमध्ये 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर नागपूर, जयपूर, वडोदरा, कोची, विझाग, मदुराई, लखनौ, गुरुग्राम, चंदीगड, इंदूर, कोईम्बतूर, सूरत, भुवनेश्वर आणि भोपाळ या टायर 2 शहरांमध्ये 20 ते 25 टक्के वाढ झाली आहे. या सणासुदीच्या हंगामात नोकरीच्या संधींमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. या नवीन भूमिकांपैकी, अंदाजे 70 टक्के हंगामी मागणी पूर्ण करण्यासाठी तात्पुरत्या असतील, तर उर्वरित 30 टक्के कायमस्वरूपी राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अधिक स्थिर, दीर्घकालीन पदे मिळतील.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड