Van Vibhag Stenographer Skill Test Details
Van Vibhag Stenographer Skill Test Details: पदभरती प्रक्रिया-2023 अंतर्गत प्रधान मुख्य (वन बल प्रमुख) म.रा. नागपूर यांच्या कार्यालाच्या आस्थापनेवरील लघुलेखक (उच्च श्रेणी) व लघुलेखक (निम्न श्रेणी) पदाची व्यावसायिक चाचणी गोपनिय संस्थेव्दारे दि.29 व 30.09.2024 रोजी ठाणे, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, नांदेड, अकोला, नाशिक, नागपूर या परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने, सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की, लवकरच उमेदवारांना त्यांचे वैयक्तीक ई-मेल वर परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच, लघुलेखक (उच्च श्रेणी) व लघुलेखक (निम्न श्रेणी) पदाची व्यावसायिक चाचणी करीता अनुसरावयाची कार्यपध्दती या सोबत जोडण्यात येत आहे. संबंधीत सर्व उमेदवारांनी कार्यपध्दती चे अवलोकन करावे. चाचणी संदर्भातील आवश्यक सुचना वनविभागाचे www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार असल्याने उमेदवारांनी आपले ई-मेल व संकेतस्थळास वारंवार भेट द्यावी.
व्यावसायिक चाचणी लघुलेखन परीक्षेसाठी अनुसरावयाची कार्यपध्दती व गुणदान पध्दतीने प्रारुप 1. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडुन उच्चश्रेणी लघुलेखन (मराठी व इंग्रजी), निम्नश्रेणी लघुलेखन (मराठी व इंग्रजी) आणि लघु टंकलेखक (मराठी व इंग्रजी) या संवर्गासाठी 80 गुणांची संगणक प्रणालीवर आधारित संगणक लघुलेखन चाचणी आयोजित करण्यात येईल, या परीक्षेमध्ये 80 गुणांचा एक गती उतारा (Speed Passage) राहील.
अ) संगणक लघुलेखन परीक्षा ही ज्या परीक्षा केंद्रावर संगणक उपलब्ध आहेत, अशा परिक्षा केंद्रावर घेण्यात येईल. यामध्ये उमेदवारांना सोडवावयाचा गती उतारा (Speed Passage) हा संगणकाच्या माध्यमातुन सॉफ्टवेअर द्वारे हेडफोनने ऐकविण्यात येईल.
ब) परीक्षा केंद्रावर येतांना उमेदवारांनी पेन, पेन्सिल, शार्पनर, Transparent Writing Pad, परीक्षेचे प्रवेश पत्र आणि आधार कार्ड/पॅन कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक फोटो ओळखपत्राची मुळ प्रत तसेच दिव्यांग उमेदवार असल्यास दिव्यांगाबाबतचे प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
क) चाचणी दरम्यान खोडरबर (Eraser) वापरण्यास मनाई असल्यामुळे उमेदवारांना परीक्षा केंद्रावर खोडरबर आणता येणार नाही. ड) कर्णबधिर प्रवर्गाचा दावा केलेले दिव्यांग उमेदवार चाचणीसाठी स्वतःचे श्रवणयंत्र घेऊन येऊ शकतात.
अ) कोणत्याही उमेदवाराला स्वतःचा किबोर्ड आणण्याची परवानगी दिली जाणार नाही.
ब) किबोर्डमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नसल्यास केवळ उमेदवारांच्या मागणीवरुन कोणत्याही उमदेवारांस किबोर्ड बदलून मिळणार नाही.
किबोर्डमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नसल्यास केवळ उमेदवारांच्या मागणीवरुन कोणत्याही उमदेवारांस किबोर्ड बदलून मिळणार नाही.
क) किबोर्डमध्ये तांत्रिक बिघाड नसतानाही उमेदवाराने किबोर्ड बदलून देण्याचा आग्रह केल्यास सदर उमेदवारांचे कृत्य हे परीक्षा आयोजनामध्ये अडथळा समजण्यात येईल व अशा उमेदवारांवर विभागाच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.
अ) एक मिनिटाचा सराव परिच्छेद (Trial Passage) व 4 मिनिटांच्या गती उताऱ्याचे डिक्टेशन (श्रुतलेखन) संगणकावर देण्यात येणार असल्याने प्रत्येक परीक्षा केंद्रावर साधा (Auxillary Port) असलेला हेडफोन उमेदवारांना संस्थेमार्फत परीक्षा केंद्रामार्फत उपलब्ध करुन देण्यात येईल.
साध्या हेडफोन व्यतिरिक्त इतर कोणतेही इअरफोन, ब्लूटूथ हेडफोन परीक्षा केंद्रामध्ये आणणाऱ्या उमेदवारास परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचे स्पीकर, रेकॉर्डिंगचे साहित्य चीप किंवा मोबाईल आढळून आल्यास गैरप्रकार या सदरात गृहीत धरण्यात येईल. उमेदवाराने व्यावसायिक चाचणीमध्ये अनुचित मार्ग वापरण्यास सदर उमेदवारास चाचणी परीक्षेसाठी अपात्र ठरविले जाईल व संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
मराठी लघुलेखनामध्ये टंकलेखन करताना ISM 6.2 REMINGTON MARATHI हा फॉन्ट By Default वापरण्यात येईल व इंग्रजी टंकलेखनासाठी QWERTY किबोर्ड लेआऊट राहील, त्या अनुषंगाने उमेदवारांनी प्रशिक्षित व्हावयाचे आहे.
परीक्षा सुरु होण्यापुर्वी उमेदवारांनी करावयाच्या आवश्यक कृती :-
अ) परीक्षेच्या दिवशी उमेदवारांना 45 मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर हजर राहणे बंधनकारक राहील. प्रत्येक उमेदवाराने संगणक लॅबमध्ये बसतांना आपल्या बैठक क्रमांकाच्या चढत्या क्रमांकानुसारच बसावयाचे आहे. लॉगिन करण्यापुर्वी उमेदवारांनी किबोर्ड व माऊस सुस्थितीत असल्याची पुर्णपणे खात्री करुन घ्यावी. किबोर्ड चाचणीसाठी त्यांना संगणकामधील Notepad सॉफ्टवेअरचा वापर करता येईल, किबोर्ड चाचणी उमेदवारांनी परीक्षा सुरु होण्यापुर्वी संगणकावर करुन घ्यावी.
ब) उमेदवारांना परीक्षा केंद्रावरील संगणक तंत्रज्ञाकडून Login व Password मिळतील. ते संगणकांत नोंदवल्यानंतर परीक्षा प्रणालिस सुरुवात होईल. प्रत्यक्षात परीक्षा सुरु इ वाल्यानंतर म्हणजेच उमेदवारांनी लॉगिन केल्यानंतर उमेदवारांना हेडफोनमधील आवाज व्यवस्थित ऐकू येतो किंवा कसे? याची पडताळणी करण्यासाठी 30 सेकंदाची टेस्ट ऑडिओ (Test Audio) ऐकविण्यात येईल. आवाज व्यवस्थित ऐकू न आल्यास उमेदवारांनी परीक्षा केंद्रावरील तज्ञांशी संपर्क करावयाचा आहे. आवाज व्यवस्थित ऐकू आल्यानंतर, “मला उपलब्ध करुन दिलेले संगणक, किबोर्ड, माऊस, हेडफोन हे मी तपासले असून ते सुस्थितीत आहेत” असे उमेदवाराने । Agree यावर टिक करुन प्रमाणित करावयाचे आहे. पुढील ट्रायल पॅसेजला पासवर्ड (Controller Password) टाकल्यानंतर परीक्षेची वेळ प्रत्यक्षात सुरु होईल. त्यानंतर सरावसाठी व रीडर (Reader) च्या आवाजाची ओळख व्हावी. यासाठी सर्वप्रथम सराव पॅसेज (Trial Passage) चे श्रुतलेखन (Mock Dictation) देण्यात येईल. हा सराव पॅसेज (Trial Passage) केवळ आणि केवळ रीडरच्या आवाजाची ओळख होण्यासाठी असेल.