Thane Mahanagarpalika Bharti Syllabus 2025
Thane Mahanagarpalika Syllabus PDF: The Thane Mahanagarpalika Mega Bharti 2025 syllabus and exam pattern have been officially announced for candidates applying to various Group C and Group D posts in the Thane Municipal Corporation Recruitment 2025. The written exam will include sections on Marathi language, English language, General Knowledge, Quantitative Aptitude, and Technical or Professional Knowledge specific to the post. Aspirants should focus on current affairs, Maharashtra GK, reasoning ability, and job-related technical skills to score well. The Thane Municipal Corporation Mega Bharti exam pattern 2025 will carry 200 marks and is designed to test both general aptitude and professional expertise. Preparing with the latest TMC Bharti syllabus PDF, mock tests, and previous year question papers will boost your chances of selection in the Thane Mahanagarpalika recruitment 2025. Get your Thane Mahanagarpalika Syllabus PDF from below link:
ठाणे महानगरपालिका मेगाभरती २०२५ चा अभ्यासक्रम आणि परीक्षापद्धती जाहीर करण्यात आलेली आहे. ठाणे महानगरपालिका भरती २०२५ अंतर्गत गट-क व गट-ड पदांसाठी लेखी परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, अंकगणित / तार्किक क्षमता, तसेच पदानुसार तांत्रिक किंवा व्यावसायिक ज्ञान या विषयांचा समावेश असेल. उमेदवारांनी चालू घडामोडी, महाराष्ट्र सामान्य ज्ञान, तार्किक विचार क्षमता, आणि पदानुसार तांत्रिक कौशल्ये यावर विशेष लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. ठाणे महानगरपालिका मेगाभरती परीक्षापद्धती २०२५ एकूण २०० गुणांची असून, सामान्य योग्यता व व्यावसायिक पात्रता या दोन्हींची चाचणी घेईल. अद्ययावत टीएमसी भरती अभ्यासक्रम पीडीएफ, सराव प्रश्नपत्रिका आणि मागील वर्षांचे पेपर्स यांचा अभ्यास केल्यास ठाणे महानगरपालिका भरती २०२५ मध्ये यश मिळवणे सोपे होईल.
ठाणे महानगरपालिका आस्थापनेवरील गट-क व गट-ड’मधील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. प्रस्तुत जाहिरातीमध्ये पदे हि प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा, इत्यादी सेवेमधील आहेत. भरती प्रक्रियेत तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरातीनुसार गट-क व गट-ड’मधील एकूण १७७३ पदांकरीता अर्ज करण्याचा कालावधी दि.१२/०८/२०२५ ते दि.०२/०९/२०२५ पर्यंत आहे. जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छूक उमेदवारांनी ठाणे महानगरपालिकेच्या www.thanecity.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दि.०२/०९/२०२५ रोजी २३:५९ वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत विविध संवर्गातील भरावयाच्या पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.
Selection Process For Thane Mahanagarpalika Saral Seva Exam 2025
उमेदवारांची निवड निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ५०% व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
✔️Online Exam
✔️ Physical Exam
✔️ Document Verification Of Selected Candidates
Thane Mahanagarpalika Exam Pattern 2025
जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या प्रत्येक पदासाठी ऑनलाईन परीक्षा वेगवेगळी घेण्यात येईल
परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित/बुध्दीमत्ता चाचणी व विषयज्ञान या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. सदर परीक्षेचा दर्जा हा संबंधित पदाकरीता विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार तसेच संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या कौशल्य तपासणीस पूरक राहील.
प्रत्येक संवगांचे परीक्षेचे गुण २०० व परीक्षेचा कालावधी दोन तास राहील.
परीक्षेतील विषयप्रश्न प्रकारपरीक्षेचा दर्जा / स्वरूप
मराठी भाषावस्तुनिष्ठ बहुपर्यायीसंबंधित पदाची किमान शैक्षणिक अर्हता व आवश्यक कौशल्य तपासणीस पूरकइंग्रजी भाषावस्तुनिष्ठ बहुपर्यायीसंबंधित पदाची किमान शैक्षणिक अर्हता व आवश्यक कौशल्य तपासणीस पूरकसामान्य ज्ञानवस्तुनिष्ठ बहुपर्यायीसंबंधित पदाची किमान शैक्षणिक अर्हता व आवश्यक कौशल्य तपासणीस पूरकअंकगणित / बुद्धिमत्ता चाचणीवस्तुनिष्ठ बहुपर्यायीसंबंधित पदाची किमान शैक्षणिक अर्हता व आवश्यक कौशल्य तपासणीस पूरकविषयज्ञानवस्तुनिष्ठ बहुपर्यायीसंबंधित पदाची किमान शैक्षणिक अर्हता व आवश्यक कौशल्य तपासणीस पूरक
परंतु अग्निशमन सेवेतीलसहायक अग्निशमन केंद्र अधिकारी, चालक-यंत्रचालक व फायरमन या संवर्गाचे परीक्षेचे गुण १०० व परीक्षेचा कालावधी एक तास राहील. तसेच शारिरीक व मैदानी चाचणीकरीता १०० गुण असतील. ऑनलाईन परीक्षा ही त्या पदाची शैक्षणिक अर्हता, कामाचे स्वरुप, तांत्रिक ज्ञान यांचेशी संबंधित राहील…
Thane Mahanagarpalika Fireman Exam Pattern 2025
पदाचे नाव | लेखी परीक्षेचे गुण | परीक्षेचा कालावधी | शारीरिक व मैदानी चाचणीचे गुण | ऑनलाईन परीक्षेचा विषयवस्तू |
---|---|---|---|---|
सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी | 100 | 1 तास | 100 | शैक्षणिक अर्हता, कामाचे स्वरूप, तांत्रिक ज्ञानाशी संबंधित |
चालक-यंत्रचालक | 100 | 1 तास | 100 | शैक्षणिक अर्हता, कामाचे स्वरूप, तांत्रिक ज्ञानाशी संबंधित |
फायरमन | 100 | 1 तास | 100 | शैक्षणिक अर्हता, कामाचे स्वरूप, तांत्रिक ज्ञानाशी संबंधित |
📚 ठाणे महानगरपालिका मेगा भरती 2025 – अभ्यासक्रम |Thane Mahanagarpalika Syllabus 2025
1️⃣ मराठी भाषा
-
व्याकरण : संधी, समास, अलंकार, वाक्प्रचार, म्हणी
-
शब्दलेखन, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द
-
शब्दरचना, वाक्यरचना
-
योग्य शब्दप्रयोग
-
वाचन व आकलन (Comprehension)
-
अपूर्ण वाक्ये पूर्ण करणे
2️⃣ इंग्रजी भाषा
-
Grammar : Tenses, Prepositions, Articles, Conjunctions
-
Vocabulary : Synonyms, Antonyms
-
Sentence Correction
-
Fill in the Blanks
-
Comprehension Passages
-
Active & Passive Voice
-
Direct & Indirect Speech
3️⃣ सामान्य ज्ञान (General Knowledge)
-
भारतीय इतिहास व स्वातंत्र्य चळवळ
-
भारतीय राज्यघटना व शासनव्यवस्था
-
भूगोल – भारत व महाराष्ट्र
-
विज्ञान व तंत्रज्ञानातील नवकल्पना
-
चालू घडामोडी – राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय
-
अर्थव्यवस्था, वित्त व बँकिंग
-
महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक घडामोडी
4️⃣ अंकगणित / बुद्धिमत्ता चाचणी (Quantitative Aptitude & Reasoning)
-
संख्या पद्धती
-
अपूर्णांक, टक्केवारी, प्रमाण व प्रमाणानुपात
-
सरासरी, वेळ व काम, वेळ व अंतर
-
साधे व चक्रवाढ व्याज
-
क्षेत्रफळ, घनफळ
-
तार्किक कोडी
-
अक्षर व अंक मालिका
-
सादृश्यता (Analogy)
-
कोडिंग-डिकोडिंग
-
पझल्स
5️⃣ विषयज्ञान (Subject Knowledge)
हे घटक संबंधित पदाच्या स्वरूपानुसार बदलतात.
-
पदाशी संबंधित तांत्रिक ज्ञान
-
कार्यप्रणाली, साधने व उपकरणे
-
सुरक्षा नियम व कार्यपद्धती
-
सेवा क्षेत्रातील अद्ययावत बदल
-
पदासाठी आवश्यक तांत्रिक व व्यावहारिक कौशल्ये