JOIN Telegram

NHM CHO Exam Instruction For Candidates – CHO भरती परीक्षेच्या सूचना लगेच बघा

NHM CHO Exam Instruction For Candidates

NHM CHO Exam Instruction For Candidates – Maharashtra National Health Mission CHO Exam is scheduled on 22nd January 2023, Admit card for which is alreday OUT | For CHO Exam 2023, Candidates need to folllow NHM CHO Exam Instrcution. Here we are giving you official NHM CHO Exam Instruction PDF. Download it and read it carefully before going for NHM CHO Exam 2023

🧿NHM Maharashtra CHO Syllabus PDF -New Syllabus PDF

महाराष्ट्र नॅशनल हेल्थ मिशन CHO परीक्षा 22 जानेवारी 2023 रोजी नियोजित आहे, ज्याचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे, त्याकरिता लिंक खाली उपलब्ध आहे | CHO परीक्षा 2023 साठी, उमेदवारांनी NHM CHO परीक्षा निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. येथे आम्ही तुम्हाला अधिकृत NHM CHO परीक्षा सूचना PDF देत आहोत. NHM CHO परीक्षा 2023 ला जाण्यापूर्वी ते डाउनलोड करा आणि काळजीपूर्वक वाचा..

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

 

🧿To Download Admit Card Click Here

उमेदवारांसाठी CHO भरती परीक्षेच्या सूचना | Instruction For NHM Maha CHO Exam 2023

१) प्रवेश परिक्षा ही १०० गुणांची असेल, त्यामध्ये ५० वस्तुनिष्ठ बहूपर्यायी प्रश्नांचा समावेश असेल. प्रत्येक प्रश्नास चार पर्याय असतील. प्रत्येक प्रश्नास २ गुण असतील. निगेटिव्ह गुणात्मक पध्दत असणार नाही. योग्य उत्तर दर्शविण्यासाठी OMR Sheet मधील सुचनाचे पालन करावे.
२) परीक्षा कक्षात प्रवेश मिळण्यासाठी हे प्रवेश प्रमाणपत्र परिक्षेच्या वेळी सोबत आणणे आवश्यक आहे व प्रवेश प्रक्रिया पुर्ण होईपर्यत पर्यवेक्षकांची स्वाक्षरी असलेले प्रवेश पत्र जपून ठेवावे.
३) परिक्षेस येते वेळी ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत: चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळख पत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा वाहन चालविण्याचा परवाना यापैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र व त्याची छांयाकीत प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.
४) उमेदवारांनी परिक्षेच्या नियोजित वेळेपूर्वी ३० मिनिटे अगोदर परिक्षा केंद्रावर हजर रहावे.
५) परिक्षा कक्षामध्ये सर्व उमेदवारांनी परिक्षेच्या नियोजित वेळेपूर्वी १५ मिनिटे अगोदर उपस्थित रहाणे अनिवार्य आहे . त्यानंतर कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
६) उमेदवाराने परिक्षेकरीता काळया शाईचे बॉल पेन वापरावे.
७) परिक्षेच्या वेळी परिगणकासारख्या कोणत्याही साधनाचा उपयोग करण्यास सक्त मनाई आहे.
८) डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल फोन इत्यादी सारखी दूरसंचार साधने परिक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परिक्षा कक्षात आणण्यास व स्वत: जवळ बाळगण्यास सक्त मनाई आहे.
९)  सर्व परिमंडळ स्तरावर प्रवेश परिक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणार असल्यामुळे ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त जिल्हयासाठी अर्ज केला आहे, ते उमेदवार ज्या जिल्हयाच्या परिक्षेसाठी उपस्थित राहतील तो जिल्हा प्रशिक्षण व पुढील नियुक्ती साठी विचारात घेण्यात येईल.
१०)उमेदवार परिक्षेच्या दिवशी एका जिल्हयासाठी एकदा आसन व्यवस्थेवर बसल्यावर त्यास दुस-या जिल्ह्य परिक्षा देता येणार नाही याची नोंद घ्यावी.
११)प्रवेश परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी राज्यस्तरावरुन निश्चित केलेल्या दिनांकास प्रशिक्षण केंद्रावर रूजू होणे आवश्यक आहे.
१२)उमेदवारांनी प्रवेश परिक्षाच्या निकाल संदर्भात तसेच इतर अडचणी बाबत संबंधित उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ कार्यालयास संपर्क साधावा.
१३)परिक्षा केंद्रावर परवानगी नाकारलेले कोणत्या ही प्रकारचे अनधिकृत साधन / साहित्य परीक्षेच्या वेळी संबंध | केंद्राच्या प्रवेशव्दारावर ठेवावे लागेल. अशा साधन साहित्याची सुरक्षितेची जबाबदारी उमेदवारांची राहील.
१४) परिक्षा संपल्यानंतर उमेदवारांनी Original OMR Sheet व प्रवेश पत्र प्रत पर्यवेक्षकाकडे जमा कराव्यात व | उमेदवारांनी प्रश्नप्रत्रिका Candidate OMR Sheet ची प्रत सोबत घेऊन जावी.
१५)दिनांक. २४/०१/२०२३ रोजी संकेस्थळावर मिळालेल्या गुणांची यादी आणि Answer Key जाहीर केली जाईल. उमेदवारांना गुणांबाबत आक्षेप असल्यास ते नोंदविण्यासाठी २ दिवसाचा कालावधी देण्यात येईल. आक्षेप अर्जासोबत | उमेदवारांना भविष्यात परिक्षेतील गुणासंबंधी शंका / आक्षेप असल्यास त्यांच्याकडील OMR Sheet ची प्रत सादर करणे बंधनकारक राहील.
१६)प्रशिक्षणासाठी पात्र होण्यासाठी किमान ४० गुण आवश्यक आहे.
१७)सदर प्रवेश परिक्षा व पदभरतीच्या अनुषंगाने अदयावत माहिती साठी https://arogya.maharashtra.gov.in & www.nrhm.maharashtra.gov.in संकेतस्थळाना भेट दयावी.


test99

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड