New Rules for Marathi Language Standardization

New Rules for Marathi Language Standardization

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

New Rules for Marathi Language Standardization Everyone’s attention was on the committee’s decision regarding the appearance of the letters ‘S’ and ‘L’.  The new rules regarding Marathi language authentication were announced on Thursday by the ‘Marathi Bhasha Samanlekhna Seftikaran Samiti’, set up by the state government. The committee has given decisions regarding the number of vowels, vowels, consonants in the alphabet, the inclusion of ‘R’, ‘L’ etc. While retaining most of the recommendations announced by the previous committee in 2009, it suggested some minor changes. As the Marathi Literature Corporation has decided the rules regarding the words Tatsam and Tadbhava, the committee excluded the matter from the working room, saying that the action should be taken by the Corporation itself.

राज्य सरकारतर्फे स्थापन करण्यात आलेल्या ‘मराठी भाषा प्रमाणलेखन निश्चितीकरण समिती’तर्फे मराठी भाषेच्या प्रमाणलेखनाबाबतचे नवे नियम गुरुवारी जाहीर करण्यात आले. वर्णमालेतील स्वर, स्वरादी, व्यंजने यांची संख्या निश्चिती, ‘ऋ’, लृ’ आदींचा वर्णमालेतील समावेश तसेच जोडाक्षरांबाबतचे निर्णय या समितीने दिले आहेत. मागील समितीने २००९ मध्ये जाहीर केलेल्या बहुतांश सूचना कायम ठेवत काही किरकोळ बदल यात सुचवले आहेत.

‘श’ व ‘ल’ या अक्षरांच्या दृश्यरुपाबाबतच्या समितीच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष होते. या दोन अक्षरांची देठयुक्त ‘श’ व गाठयुक्त ‘श’ तसेच पाकळीयुक्त ‘ल’ व दंडयुक्त ‘ल’ असी दोन्ही रुपे प्रचलित असल्याने दोन्ही दृश्यरुपांना प्रमाण म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी होती. समितीच्या काही सदस्यांनीही हीच भूमिका मांडली. मात्र, चर्चेअंती समितीने देठयुक्त ‘श’ व पाकळीयुक्त ‘ल’ याच दृश्यरुपांना मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘लृ’ या स्वरचिन्हापासून तयार होणारे शब्द मराठीत नसल्याने हा स्वर वर्णमालेतून वगळण्याची मागणीही केली होती. मात्र, क्लृप्ती, क्लृप्त आदी शब्दांमध्ये ‘लृ’चा वापर होत असल्याने हा स्वर कायम ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. तसेच ‘ऋ’ हा स्वर व ‘ञ्’ हे व्यंजनही वर्णमालेत कायम ठेवले आहे.

जोडाक्षरासंबंधीच्या नियमांबाबत यापूर्वीच्या समितीची मांडणीच कायम ठेवली आहे. तसेच, पूर्वीच्या समितीने जाहीर केलेली वर्णमालाही कायम ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला. त्यामुळे सध्या वर्णमालेत १४ स्वर, २ स्वरादी, ३४ व्यंजने व २ विशेष संयुक्त व्यंजने यांचा समावेश आहे. तत्सम व तद्भव शब्दांबाबतचे नियम मराठी साहित्य महामंडळाने निश्चित केले असल्याने त्याबाबतची कार्यवाही महामंडळानेच करावी, असे सांगत समितीने हा विषय कार्यकक्षेतून वगळला

समितीचे अन्य काही महत्त्वाचे निर्णय
– ‘अब्ज’ या संख्येनंतरच्या संख्यावाचक शब्दांचा समावेश नाही
– ‘विरामचिन्हे व इतर चिन्हे’ यात व्याप्तिचिन्ह, छेदचिन्ह व तिर्यकरेषा या नवीन चिन्हांचा समावेश
– स्वरादी व अतिरिक्त चिन्हांसाठी ‘स्वरेतर चिन्हांचे नाव’ असा नवा रकाना
– स्वरेतर चिन्हांच्या तक्त्यांमध्ये ‘चंद्रबिंदू’ या नवीन चिन्हाचा समावेश
– ‘स्वरचिन्हाचे नाव’ या रकान्याशेजारील ‘चिन्ह’ या रकान्याचे नाव बदलून ‘स्वरांशचिन्हे’
– ‘मराठी अक्षरमाला तक्ता-शालेय स्तरासाठी’ यातील ‘स्वर व स्वरचिन्हे’ या विभाग शीर्षकाऐवजी ‘स्वरचिन्हे व स्वरांशचिन्हे’ असा बदल

समितीचे तपशील ः
मराठी भाषेच्या लेखनात एकरूपता राखण्यासाठी नियमावली तयार करणे, हे समितीचे उद्दिष्ट आहे. या समितीत डॉ. अनघा मांडवकर, डॉ. रेणुका ओझरकर या मराठी भाषा अभ्यासकांसह मराठी भाषा विभागाचे सचिव, सहसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे विद्यार्थी विकास सहसचिव, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम मंडळाच्या विशेषाधिकारी सविता वायाळ व राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांचा समावेश आहे.

Leave a Comment


Available for Amazon Prime