MPSC Rajya Seva Mains Exam Revised Question Paper Pattern – राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ सुधारित परीक्षा पध्दती – प्रश्नपत्रिकेचा नमुना व प्रश्नपत्रिकेसंबधी विशेष सूचना जाहीर

MPSC Rajya Seva Mains Exam Revised Question Paper Pattern For 2025 Exam

MPSC Rajya Seva Mains Exam Revised Question Paper Pattern: महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षेमधील सन २०२५ पासून पारंपारिक/वर्णनात्मक स्वरुपात घेण्यात येणा-या राज्य सेवा मुख्य परीक्षेकरीता विहित केलेल्या एकूण नऊ प्रश्नपत्रिकेची रचना (Question Paper Structure) साधारणतः पुढीलप्रमाणे राहील :- तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Rajyaseva Syllabus 2024 – अखेर एमपीएससीकडून राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तारीख जाहीर

MPSC Rajyaseva Mains GS Question Paper PDF – आज झालेला MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 पेपर (मराठी आणि इंग्रजी) PDF

MPSC Rajya Seva Cut Off Marks, Merit List 2022 – यंदा इतका लागला राज्य सेवा मुख्य परीक्षा कट ऑफ !

New Changes in MPSC Exam Pattern – सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू होणार

MPSC Rajyaseva Prelims 2022 Question Paper Download PDF – Exam Date 21 Aug 2022

प्रश्नपत्रिकेचा नमुना _ MPSC State Service Mains Exam 2025 Question Paper Pattern

  1. पेपर-१ मराठी भाषा (अर्हताकारी पेपर)
  2. माध्यम – मराठी प्रश्नपत्रिकेचे स्वरुप
  3. पारंपारिक/वर्णनात्मक
  4. एकूण गुण ३०० –
  5. एकूण कालावधी – ३ तास

प्रश्नपत्रिकेसंबंधी विशेष सूचना
प्रश्नांची उत्तरे लिहिण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
१. सर्व प्रश्न अनिवार्य आहेत.
२. प्रश्नांचे गुण त्या त्या प्रश्नासमोर / उपप्रश्नासमोर दिलेले आहेत.
३. जेथे पर्याय दिलेले असतील तेथे सोडविलेल्या पर्यायांचे केवळ आवश्यक संख्येइतकेच अनुक्रमाने प्रथम प्रतिसादांचे मूल्यांकन केले जाईल. एखादे उत्तर काट मारल्याशिवाय अंशतः सोडविलेले असल्यास ते मोजण्यात येईल. अतिरिक्त प्रतिसादांचे मूल्यांकन केले जाणार नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाईल.
४. उमेदवारांनी प्रत्येक प्रश्नातील उपप्रश्नांची उत्तरे एकत्रित सोडविणे अपेक्षित आहे. जर एखाद्या प्रश्नाचा उपप्रश्न इतरत्र सोडविल्यास, (काही पृष्ठ सोडल्यानंतर किंवा दुस-या इतर प्रश्नाचा प्रयत्न केल्यानंतर) अशा प्रकरणी नंतरचे उपप्रश्न मुल्यांकनासाठी दुर्लक्षित केले जाईल.
५. प्रश्नामध्ये वेगळा निर्देश केलेला नसेल तर प्रश्नाची उत्तरे मराठीत (देवनागरी लिपिमध्ये) लिहावयाची आहेत. ६. जेथे जेथे शब्दसंख्येची मर्यादा प्रश्नामध्ये सांगितलेली असेल, तेथे तेथे तिचे पालन केलेच पाहिजे. सांगितलेल्या शब्दसंख्येपेक्षा जास्त अथवा कमी शब्दात उत्तर लिहिलेले असल्यास गुण कमी केले जातील.
७. उत्तर पुस्तिकेतील कोणतेही पृष्ठ कोरे सोडल्यास त्यावर स्पष्टपणे काट मारावी.

MPSC Rajya Seva Marathi mains Exam Question paper Pattern

इतर पेपर्स साठी प्रश्नपत्रिका नमुना तुम्ही खालील pdf द्वारे डाउनलोड करू शकता येथे आम्ही तुम्हाला मराठी या विषयाकरिता प्रश्नपत्रिका नमुना दिलेला आहे

टिप – (१) राज्य सेवा मुख्य परीक्षेतील भूगोल या विषयाच्या वैकल्पिक पेपरमध्ये नकाशावर आधारित प्रश्नांसाठी उमेदवारांना Outline Stencil वापरण्यास मुभा असेल.
(२) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील विद्युत अभियांत्रिकी, यांत्रिकी अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, सांख्यिकी, वाणिज्य व लेखाशास्त्र या वैकल्पिक विषयांच्या पारंपरिक स्वरुपाच्या परीक्षेमध्ये उमेदवारांना सायंटिफिक (नॉन प्रोग्रॅमेबल टाइप) गणनयंत्राचा वापर करण्याची मुभा असेल. प्रोग्राम करण्यायोग्य प्रकारच्या गणनयंत्राना परवानगी दिली जाणार नाही आणि अशा गणनयंत्राचा वापर उमेदवारांद्वारे अवैध मार्गाचा अवलंब केल्याचे समजले जाईल. परीक्षा कक्षामध्ये अन्य उमेदवारांकडून गणनयंत्र मागण्यास किंवा अदलाबदल करण्यास परवानगी नाही.

Download MPSC State Service Mains Exam 2025 New Question Paper Pattern

Available for Amazon Prime