JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

राज्य सेवा मुख्य परीक्षेतील Optional Subject रद्द; MPSC ची अधिकृत घोषणा | MPSC Optional Subject Removed From 2027 For State Services Main Examination

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Optional Subject Removed From 2027 For State Services Main Examination

MPSC Optional Subject Removed From 2027 For State Services Main Examination: The Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced a major reform in the State Services Main Examination pattern, effective from the 2027 examination. As per the earlier scheme introduced through the Commission’s notification dated June 24, 2022, candidates were required to appear for two optional subject papers. However, following the model adopted by several state public service commissions, including Tamil Nadu, Telangana, Madhya Pradesh, Gujarat, Rajasthan, Punjab, Haryana, Uttar Pradesh, and Bihar, which have removed optional subjects to ensure a more uniform and standardized evaluation process, MPSC has also decided to abolish optional papers. Under the revised examination pattern, the State Services Main Examination will consist of seven compulsory papers: two language papers (Marathi and English), one Essay paper, and four General Studies papers.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्य सेवा मुख्य परीक्षा पद्धतीत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाने २४ जून २०२२ रोजी प्रसिद्ध केलेल्या परीक्षा योजनेनुसार उमेदवारांना मुख्य परीक्षेत वैकल्पिक विषयाचे दोन पेपर अनिवार्य होते. मात्र, तामिळनाडू, तेलंगणा, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहार आदी राज्य लोकसेवा आयोगांनी त्यांच्या मुख्य परीक्षा पद्धतीतून वैकल्पिक विषय वगळून अधिक एकसमान व प्रमाणित मूल्यमापन प्रणाली स्वीकारली आहे. याच धर्तीवर सर्व बाबींचा साकल्याने विचार करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही राज्य सेवा मुख्य परीक्षेतून वैकल्पिक विषय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल सन २०२७ पासून होणाऱ्या राज्य सेवा मुख्य परीक्षेपासून लागू होणार असून, त्यानंतर मुख्य परीक्षेत मराठी व इंग्रजी या दोन भाषा विषयांचे पेपर, निबंधाचा एक पेपर आणि सामान्य अध्ययनाचे चार पेपर असे एकूण सात अनिवार्य पेपर असतील.

⇒MPSC AMVI Bharti New Exam Pattern And Syllabus PDF – 461 पदांची संगणक प्रणालीवर आधारित (Computer-Based Test) परीक्षा | सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व, मुख्य परीक्षेचा पॅटर्न

⇒Maharashtra Group C Services Exam Pattern And Syllabus-परीक्षा तीन टप्प्यांत, MPSC गट क सेवा परीक्षा अभ्यासक्रम डाउनलोड करा

MPSC चालू घडामोडी २०२६ टेस्ट सिरीज, सर्व परीक्षेस उपयुक्त प्रश्न, लगेच सोडवून बघा! – Chalu Ghadamodi 2026

खालील तक्त्यात दर्शविल्यानुसार राज्य सेवा मुख्य परीक्षेकरिता मराठी आणि इंग्रजी या भाषा विषयाचे दोन, निबंध या विषयाचा एक आणि सामान्य अध्ययनाचे चार असे एकूण सात पेपर्स अनिवार्य राहतील :-

सध्याची राज्य सेवा मुख्य परीक्षा योजनागुणसुधारित राज्य सेवा मुख्य परीक्षा योजना (सन २०२७ पासून लागू)गुण
भाषा पेपर १ – मराठी
(२५% गुणांसह अर्हताकारी)
300भाषा पेपर १ – मराठी
(२५% गुणांसह अर्हताकारी)
300
भाषा पेपर २ – इंग्रजी
(२५% गुणांसह अर्हताकारी)
300भाषा पेपर २ – इंग्रजी
(२५% गुणांसह अर्हताकारी)
300
निबंध (मराठी किंवा इंग्रजी)250निबंध (मराठी किंवा इंग्रजी)250
सामान्य अध्ययन – १250सामान्य अध्ययन – १250
सामान्य अध्ययन – २250सामान्य अध्ययन – २250
सामान्य अध्ययन – ३250सामान्य अध्ययन – ३250
सामान्य अध्ययन – ४250सामान्य अध्ययन – ४250
वैकल्पिक विषय पेपर १ (२६ विषय)250वैकल्पिक विषय पेपर १ (२६ विषय)250
वैकल्पिक विषय पेपर २ (२६ विषय)250वैकल्पिक विषय पेपर २ (२६ विषय)250
एकूण लेखी गुण1250
(पेपर क्र. ३ ते ७)
एकूण लेखी गुण1750
(पेपर क्र. ३ ते ९)
मुलाखत275मुलाखत275
एकूण गुण (लेखी + मुलाखत)1525एकूण गुण (लेखी + मुलाखत)2025

* वगळण्यात आले

४. वरील निर्णयानुसार राज्य सेवा मुख्य परीक्षेची सुधारित योजना आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिध्द करण्यात येईल.

५. महाराष्ट्र नागरी सेवेतील महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षेकरिता वैकल्पिक विषयांची तरतुद पूर्वीप्रमाणेच लागू राहील. तसेच महाराष्ट्र स्थापत्य / यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा मुख्य परीक्षा आणि निरीक्षक वैधमापनशास्त्र मुख्य परीक्षा या सर्व परीक्षा प्रचलित योजनेनुसार घेण्यात येतील. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेले नाही.

Download PDF To Check Full Notice

Table of Contents