MPKV Exam Pattern and Syllabus 2025
MPKV Exam Pattern and Syllabus: महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या गट-क आणि गट-ड संवर्गातील पदांसाठी होणाऱ्या लेखी परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. ही परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारातील (MCQ) असेल आणि संबंधित पदाच्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार प्रश्नांचा स्तर राहील. ज्या पदांसाठी पदवी ही किमान अर्हता आहे, त्या पदांसाठी प्रश्नांचा दर्जा मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या समकक्ष असेल, तर मराठी आणि इंग्रजी विषयांची प्रश्नपत्रिका इयत्ता १२ वी स्तराच्या समकक्ष असेल. अभ्यासक्रमामध्ये मराठी व इंग्रजी व्याकरण, शब्दसंपत्ती, वाक्यरचना, उतारे, चालू घडामोडी, महाराष्ट्राचा इतिहास व भूगोल, भारतीय राज्यघटना, विज्ञान व तंत्रज्ञान, तसेच कृषि क्षेत्राशी संबंधित तांत्रिक व व्यावसायिक माहितीचा समावेश आहे. उमेदवारांनी अभ्यासक्रमाच्या प्रत्येक घटकावर सखोल लक्ष केंद्रित करून तयारी करावी आणि वेळेचे योग्य नियोजन करून परीक्षेसाठी सराव करावा.
MPKV Exam Selection Process:
१) लेखी परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा त्या त्या पदांच्या सेवाप्रवेश नियमांमध्ये विहीत करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेच्या दर्जापेक्षा निम्न स्वरुपाचा नसेल.
२) ज्या पदांकरिता पदवी ही कमीतकमी अर्हता आहे. अशा पदांकरिता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहिल. परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) दर्जाच्या समान राहिल.
३) शासन निर्णय दिनांक, ०४ मे, २०२२ अन्वये गट-क व गट-ड मधील संबंधित पदांकरीता उमेदवारांची निवड करतांना मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरिता प्रत्येकी ५० गुण ठेवून एकूण २०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. सदर परीक्षेकरिता अपंग उमेदवारांना नियमित वेळेपेक्षा अर्धा तास अधिकचा वेळ देण्यात येईल. सदर परीक्षेमध्ये एकुण गुणांच्या किमान ४५% गुण मिळवणा-या उमेदवारांमधुन निवडसूची तयार करुन निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल.
४) ज्या पदांसाठी शारिरिक चाचणी (Physical Test) किंवा व्यावसायिक चाचणी (Proficiency Test) घेणे आवश्यक असेल, अशा पदांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरिता प्रत्येकी ३० गुण ठेवुन एकुण १२० गुणांची (एकुण ६० प्रश्न) लेखी परीक्षा व ८० गुणांची शारिरिक चाचणी / व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. तथापि, जे उमेदवार लेखी परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करतील, अशा उमेदवारांनाच शारिरिक चाचणी / व्यावसायिक चाचणी देता येईल. लेखी परीक्षा व शारिरिक चाचणी / व्यावसायिक चाचणी यांमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करुन निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल.
५) शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण पेक्षा कमी अर्हता आवश्यक असलेल्या पदांसाठी व्यावसायिक चाचणी, आवश्यक तेथे शारिरिक क्षमतेची चाचणी घेणे आवश्यक असल्यामुळे अशा उमेदवारांची निवड करताना ६० गुणांची व्यावसायिक चाचणी व आवश्यक तेथे ४० गुणांची शारिरिक क्षमतेची चाचणी घेऊन यांमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करुन निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल. ज्या पदांसाठी शारिरिक क्षमतेची चाचणी घेण्याची आवश्यकता नाही, अशा पदांसाठी १०० गुणांची व्यावसायिक चाचणी घेऊन यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करुन निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल.
MPKV Group C Bharti Exam Pattern 2025
कागदपत्रे तपासणी: MPKV Document Verification Process
लेखी परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणा-या उमेदवारांची निवड समितीच्या सूचनेनुसार कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल. कागदपत्रे तपासणीच्या वेळेस उमेदवारांना लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील. जे उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाहीत किंवा गैरहजर राहतील असे उमेदवार भरती प्रक्रियेतून अपात्र ठरतील.
MPKV Rahuri Physical Exam Details
व्यावसायिक / शारिरिक चाचणी: लेखी परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त केले आहेत, अशा पात्र उमेदवारांची निवड समिती कडून ठरविलेल्या तारखेनुसार ८० गुणांची व्यावसायिक / शारिरिक चाचणी घेण्यात येईल. व्यावसायिक / शारिरिक चाचणीची तारीख जाहीर / कळविण्यात येईल. सदर तारखेस उमेदवाराने स्वः खर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहिर करणे लेखी परीक्षा व व्यावसायिक / शारीरिक चाचणी यामधील गुण एकत्रित करुन गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल व त्या आधारे सामाजिक / समांतर आरक्षण विचारात घेऊन रिक्त पदांच्या अनुषंगाने निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्यात येऊन ती वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येईल. निवड यादी व प्रतिक्षा यादी सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रानिम १२२२/प्र.क्र.५४/१३-अ, दिनांक ०४/०५/२०२२ मधील परिच्छेद १० मधील तरतुदीनुसार तयार करण्यात येईल.