Mahabhumi Exam Important Document List – महत्त्वाच्या कागदपत्रांची यादी डाउनलोड करा !!

Mahabhumi Exam Important Document List

भूमी अभिलेख परीक्षा २०२२ साठी आवश्यक असलेल्या सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांची यादी डाउनलोड करा

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Mahabhumi Exam Important Document List– Students Maharashtra Bhumi Abhilekh Exam was already Finished. Many candidates have applied for this exam. This exam was conducted By IBPS from 28th to 30th November across various exam centers. As Per latest information MahaBhumi Exam Result will be declared on 15th December 2022. Due to many vacant posts in the department this recruitment Process will be carried out very fast. And Appoitment letter will ve given soon to the selected candidates. As soon as result is OUT Bhumi Abhilekh Document verification will be started. So its very Important for you to be ready with all Important documents required For Bhumi Abhilekh Exam 2022. We have given you a List of Documents required for Bhumi Abhilekh Exam 2022. Download Mahabhumi Exam Important Document List from below Link :

🔔Bhumi Abhilekh Result Out Check Here

Bhumi Abhilekh Exam Cut Off, Merit List -Check Official Cut Off

bhulekh.mahabhumi.gov.in Documents

मित्रांनो, महाराष्ट्र भूमी अभिलेख परीक्षा यशस्वीपणे पार पडली. या परीक्षेसाठी अनेक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ही परीक्षा IBPS द्वारे 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. ताज्या माहितीनुसार महाभूमी परीक्षेचा निकाल 15 डिसेंबर 2022 रोजी जाहीर केला जाईल. विभागातील अनेक रिक्त पदांमुळे ही भरती प्रक्रिया अतिशय वेगाने पार पडेल. आणि निवड झालेल्या उमेदवारांना लवकरच नियुक्ती पत्र दिले जाईल. निकाल लागताच भूमि अभिलेख दस्तऐवज पडताळणी सुरू होईल. त्यामुळे भूमी अभिलेख परीक्षा २०२२ साठी आवश्यक असलेल्या सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांसह तयार राहणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आम्ही तुम्हाला भूमी अभिलेख परीक्षा २०२२ साठी आवश्यक कागदपत्रांची यादी दिली आहे. महाभूमी परीक्षा महत्त्वाच्या कागदपत्रांची यादी खालील लिंकवरून डाउनलोड करा:

List Of Documents Required For Maha BHulekh Exam 2022-23

पडताळणी कामी आवश्यक कागदपत्रे –
सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
• माध्यमिक शालांत परिक्षा प्रमाणपत्र
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील सर्व्हेक्षक व्यवसाय प्रमाणपत्र (ITI Surveyor)
किंवा
मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका प्रमाणपत्र
(Diploma in Civil Engineering)
किंवा
मान्यताप्राप्त विद्यापिठाकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदवी प्रमाणपत्र
(Bachelor of Civil Engineering / B. Tech. (Civil Engineering)
• माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील सर्व्हेक्षक अभ्यासक्रमाशी समकक्ष असणारे संरक्षण विभागाकडून दिलेले ट्रेड प्रमाणपत्र (Trade Certificate equivalent to civil trade “Surveyor”.)

•टंकलेखन / संगणक टंकलेखन प्रमाणपत्र मराठी किमान ३० श.प्र. मि. इंग्रजी किमान ४० श.प्र.मि.
संगणक हाताळणे बाबत प्रमाणपत्र (MS-CIT or etc. as per GR) (टंकलेखन व संगणक बाबत अर्हता धारण न करणाऱ्या उमेदवारांनी नियुक्ती दिनांकापासून २ वर्षांच्या आत सदर अर्हता धारण करणे आवश्यक राहील.)
• माजी सैनिक उमेदवारांचे संरक्षण खात्याकडील सेवानिवृत्तीबाबत कागदपत्रे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे नाव नोंदविल्याबाबत नोंदणीपत्र / प्रमाणपत्र.
प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त उमेदवारांचे सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र.
• अनुसुचीत जाती व अनुसुचीत जमाती प्रवर्गातील उमेदवार वगळता इतर सर्व मागासप्रवर्ग तसेच खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांचे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate). (सदर प्रमाणपत्र आर्थिक वर्ष २०२०-२१ किंवा २०२१-२०२२ करीताचे असावे.)
खेळाडू उमेदवारांचे, ते ज्या विभागातील रहिवाशी आहेत त्या विभागाच्या विभागीय उपसंचालक यांचेकडून क्रिडा प्रमाणपत्राची योग्यता व खेळाडू कोणत्या संवर्गाकरीता पात्र ठरतो याबाबत प्रमाणित केलेले प्रमाणपत्र.

• अंशकालीन उमेदवाराने जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये नोंद केल्याबाबतचे प्रमाणपत्र.
अनाथ उमेदवारांच्या बाबतीत महिला व बाल विकास विभागाकडील दि. ०६/०६/२०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अनाथ प्रमाणपत्र.
शासकीय / निमशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनी त्यांचे विभागातील सक्षम प्राधिकाऱ्याच्या पुर्व परवानगीबाबत कागदपत्रे. तसेच सध्या ज्या शासकीय / निमशासकीय सेवेत आहेत त्या कार्यालयाकडील ना मागणी / ना विभागीय चौकशी प्रमाणपत्र.
• महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापन) नियम, २००५ अन्वये विहित नमुन्यातील लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापन.

Download List Of Documents Required For Bhumi Abhilekh Bhukarmapak Exam 2022

Mahabhumi Exam Important Document List

१) शासन निर्णय सा.प्र.वि. क्रमांक प्रशासन २०००/प्र.क्र.५/२००१/३२, दि. २०/०७/२००२ व दि. १९/०३/२००३ शासन निर्णयानुसार उपरोक्त पदांकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र. मातंसं २०१५/प्र.क्र.२७७/३९ दिनांक ०४/०२/२०१३, सामान्य प्रशासन विभाग (माहिती तंत्रज्ञान) शासन पुरकपत्र दिनांक ०८/०१/२०१८ व दिनांक १६/०७/२०१८ मध्ये नमुद केल्याप्रमाणे संगणक हाताळणे / वापराबाबतचे प्रमाणपत्र त्यांच्या नियुक्तीच्या दिनाकांपासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील. अन्यथा त्यांची सेवा समाप्त होईल.

२) उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा. (डोमिसाईल प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक) अर्जदाराने महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे शासनाने प्राधिकृत केलेल्या सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

३) निवड झालेल्या उमेदवाराने जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून शासकीय सेवा करण्याकरीता शारीरीक क्षमतेचे वैद्यकिय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

४) महाराष्ट्र शासनाने माध्यमिक शालांत परीक्षेशी समकक्ष ठरवलेली परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांस महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून / शासनाकडून अशा परीक्षेची समकक्षता पडताळणी करुन घेतल्यानंतरच नियुक्ती दिली जाईल.

५) निवड यादीतील उमेदवाराने नियुक्तीपूर्वी मूळ शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, अनुभवाचा दाखला, जात प्रमाणपत्र, सन २०२०-२१ (चालू वित्तीय वर्षाचे) साठी वैध असलेला नॉन क्रिमीलेअर दाखला (आवश्यक त्या प्रवर्गासाठी). तसेच समांतर आरक्षणांतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सक्षम प्राधिकारी यांचेकडील प्रमाणपत्र त्याचप्रमाणे इतर आवश्यक ती प्रमाणपत्रे कागदपत्रांच्या मूळ प्रती तसेच त्यांच्या छायांकित प्रती छाननीसाठी तपासणीसाठी नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे सादर करणे आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्रे कागदपत्रे यांची छाननी नियुक्ती प्राधिकारी यांचे स्तरावर केली जाईल. व तद्नंतरच नियुक्तीस पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येतील. उमेदवाराने प्रमाणपत्र मिळणेकरीता सादर केलेल्या अर्जाच्या पावत्या ग्राहय धरल्या जाणार नाहीत. छाननी अंती वरील प्रमाणपत्रे (कागदपत्रामध्ये त्रुटी आढळल्यास / माहिती खोटी आढळल्यास नियुक्ती दिली जाणार नाही/ नियुक्ती रद्द होईल.

६) सदर पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीस १ वर्षाचा परिविक्षाधीन कालावधी लागू राहील. (परिविक्षा कालावधी जास्तीत जास्त १ वर्षापर्यंत वाढविता येईल). या पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीस परिविक्षाधीन कालावधीत, विहीत केलेले भूमि अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी, औरंगाबाद येथील प्रशिक्षण पूर्ण करणे, या पदासाठी विहीत सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण करणे आणि परिविक्षाधीन कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील. जर त्याने/तिने विहीत प्रशिक्षण पूर्ण केले नाही अथवा सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण केली नाही अथवा परिविक्षाधीन कालावधी समाधानकाररित्या पूर्ण केला नाही अथवा त्या पदावर काम करण्यास योग्य नसल्याचे आढळून आल्यास तो / ती सेवा समाप्तीस पात्र राहील.

७) शासन निर्णय क्र. पंअक- १००९/प्र.क्र.२००/२००९/१६अ, दि. २७/१०/२००९ नुसार अंशकालीन उमदेवार म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य या योजने अंतर्गत शासकीय कार्यालयामध्ये तीन वर्षापर्यंत दरमहा मानधनावर काम केलेल्या व रोजगार व मार्गदर्शन केंद्रामध्ये या अनुभवाची नोंद केलेले पदवीधर/पदविकाधारक अंशकालीन उमेदवार.

८) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. राक्रीधो-१-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, दिनांक १ जुलै, २०१६, शासन शुध्दीपत्रक क्र. राक्रीधो-१-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुरो-२, दिनांक १०.१०.२०१७, तसेच शासन शुध्दीपत्रक क्र. राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, दि. ११ मार्च,२०१९, आणि तद्नंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार, प्राविण्य प्राप्त खेळाडू व्यक्तीचे आरक्षण तसेच वयोमर्यादेतील सवलती संदर्भात कार्यवाही करण्यात येईल.

खेळाडू उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वीच वरील नमूद शासन निर्णयातील तरतूदीनुसार संबंधीत विभागाचे विभागीय उपसंचालक यांचेकडून खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करुन घेणे आवश्यक आहे. त्यामुळे खेळाडू उमेदवाराने अर्जासोबतच विभागीय उपसंचालक यांनी क्रीडा प्रमाणपत्र योग्य असल्याबाबत व खेळाडू कोणत्या संवर्गासाठी पात्र ठरतो याबाबत प्रमाणित केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील. तसेच एकापेक्षा जास्त खेळाची प्राविण्य प्रमाणपत्रे असणाऱ्या खेळाडू उमेदवाराने एकाच वेळेस सर्व खेळांची प्राविण्य प्रमाणपत्र • प्रमाणित करण्याकरीता संबंधित उपसंचालक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे.

Bhumi Abhilkeh Exam Female Reservation |mahabhumi exam important document list in marathi

शासन निर्णय महिला व बालकल्याण क्र. ८२/२००१ /म.से.आ.- २०००/प्र.क्र.४१५/ का.२, दि. २५.०५.२००१ मधील तरतूदीनुसार महिलांसाठी आरक्षण राहील. अनुसूचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गातील उमेदवार वगळता इतर सर्व मागासप्रवर्ग तसेच खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांनी वर्ष २०२०-२१ या कालावधीकरीता वैध असलेले (अर्थात ३१/०३/२०२१ पर्यंत वैध असलेले) उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र (Non-creamny layer Certificate) तपासणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. शासन निर्णय महिला व बालविकास विभाग क्र. संकीर्ण-२०१७ /प्र.क्र. १९१/१७/कार्या-२, दि. १५.१२.२०१७ नुसार नमूद सुधारणा नुसार जाहिरातीमध्ये अर्ज करावयाच्या अंतिम दिनांकापासून उमेदवाराचे मागील तीन आर्थिक वर्षाचे सरासरी उत्पन्न नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी ग्राहय धरले जाईल. उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र (Non-creamy layer Certificate) तपासणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.

Mahabhumi Exam EWS Document Details

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (ई.डब्ल्यू.एस.)- खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (ई.डब्ल्यू.एस.) वर्गातील उमेदवारांकरीता सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय क्र. राआधी- ४०१९/प्र.क्र.३१/१६-अ, दि. १२/०२/२०१९ अन्वये विहित करण्यात आलेले कागदपत्रे / पुरावा (परिशिष्ट- क) आणि स्वयंघोषणापत्र ( परिशिष्ट-ड) पडताळणीच्यावेळी आवश्यक राहील. तसेच आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या / उमेदवाराच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. ८ लाखाच्या आत असले पाहिजे व ती व्यक्ती किंवा तिचे कुटुंबीय महाराष्ट्र राज्यात दि. १३/१०/१९६७ रोजी किंवा त्यापूर्वीचे रहिवासी असणे आवश्यक राहील.

सदर प्रवर्गातील उमेदवारांकरीता वय, परीक्षा फी व इतर अनुज्ञेय सवलती ह्या इतर मागास प्रवर्गास राज्य शासनाने वेळोवेळी लागू केलेल्या नियमानुसार राहतील.

विहित वयोमर्यादेतील शासकीय/निमशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनी त्यांचा अर्ज त्यांचे विभागातील सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीने विहित मार्गाने विहित मुदतीत अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन भरावा. सदर पदाकरीता अर्ज भरण्यासाठी तसेच परीक्षेस बसण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याच्या पुर्व परवानगीची प्रत उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे व ती कागदपत्रे छाननीवेळी सादर करणे आवश्यक राहील.

सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना क्र.एसआरव्ही-२०००/प्र.क्र.१७/२००० / १२, २८ मार्च २००५ व शासन परीपत्रक एसआरव्ही- २०००/प्र.क्र.१७/२०००/१२, ०१ जुलै २००५ व महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम २००५ अन्वये विहित केल्यानुसार शासनाने गट अ, ब, क, ड मधील सेवा प्रवेशासाठी प्रतिज्ञापन नमुना “अ” आवश्यक अर्हता म्हणून विहित नमुन्यातील लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापन बंधनकारक आहे. सदर प्रतिज्ञापन कागदपत्र छाननीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. प्रतिज्ञापनाचा नमुना परिशिष्ट “अ” प्रमाणे आहे.

ऑनलाईन अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे परीक्षेस बोलाविण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला आहे असे नाही, निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार विहित अर्हता धारण न करणारा आढळल्यास, खोटी माहिती पुरविली असल्याचे आढळल्यास, एखादया अर्जदाराने त्याच्या निवडीसाठी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष दबाव आणल्यास अथवा गैरप्रकाराचा अवलंब केल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. तसेच

Leave a Comment