GMC Dhule Bharti Exam Pattern And Syllabus 2024
GMC Dhule Bharti Exam Pattern And Syllabus: श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे मार्फत गट ड पदासाठीच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. उमेदवार देणार असलेल्या ऑन-लाईन परीक्षेच्या विविध पैलूंचा तपशील आणि संबंधित बाबीसंबंधात महत्वाच्या सूचना या पुस्तिकेत आहेत. परीक्षेची तयारी करण्यात मदत व्हावी म्हणून उमेदवारास या पुस्तिकेचे नीट अध्ययन करण्यास सुचविले जात आहे. परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे यांच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील. कृपया प्रवेशपत्रावर दर्शविलेल्या तपशीलाची उमेदवारांनी काळजीपूर्वक दखल घ्यावी. उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केला असल्यास आणि अर्ज केलेल्या सर्व पदांची परीक्षा एकाच सत्रात असल्यास उमेदवारांस एकच प्रवेशपत्र देण्यात येईल असे उमेदवार त्या पदांसाठी एकदाच परीक्षा देतील आणि त्यांनी अर्ज केलेल्या सर्व पदांच्या गुणवत्ता यादीत त्यांचा विचार केला जाईल. त्यांच्या प्रवेशपत्रावर पदक्रमांक निर्देशित केले जातील. उमेदवार त्या निर्देशित पदक्रमांकाशी संबंधित पदांच्या परीक्षेसाठी पात्र असतील. पदक्रमांकाशी संबंधित पदांची सूची खालीलप्रमाणे..तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:
GMC Dhule Group D Bharti Syllabus 2024
POST CODE | POST NAME | POST CODE | POST NAME |
01 | LABORATORY ATTENDANT(BHGMCD) | 15 | BARBER(SRD) |
02 | PEON(BHGMCD) | 16 | WASHERMAN(SRD) |
03 | SECURITY GUARD(BHGMCD) | 1/ | PEONfSRD) |
04 | ATTENDANT(BHGMCD) | 18 | CHOUKIDAR(SRD) |
05 | DUFTERY(BHGMCD) | 19 | LABORATORY ATTENDANT*SRD) |
06 | POST MORTEM ATTENDANT(BHGMCD) | 20 | GARDNER(SRD) |
07 | ANIMAL HOUSE ATTENDANT(BHGMCD) | 21 | LADY WARD BOY.WARD AYAHA’LADY AYAHA(SRD) |
08 | SWEEPER(BHGMCD) | 22 | OUT PATIENT DEPARTMENT SERVANTfSRD) |
09 | TAILOR(SRD) | TS | SECURITY GUARD/WATCHMAN{SRD) |
10 | DENTAL ATTENDANT(SRD) | 24 | H-AJ COOK(SRD) |
11 | LIFTMAN(SRD) | 25 | COOK’S MATESfSRD) |
12 | HOSTEL SERVANT/MESS SERVANTfSRD) | 26 | COOK(SRD) |
13 | WARD BOY(SRD) | 27 | X-RAY ATTENDANT(SRD) |
14 | STRETCHER-8EARER(SRD) | 28 | SWEEPER(SRD) |
GMC Dhule Group D Exam Pattern
अनुक्रमांक | प्रश्नावलीचे नाव | प्रश्न संख्या | अधिकतम अंक | माध्यम | अवधि |
---|---|---|---|---|---|
1 | इंग्रजी भाषा | 25 | 50 | इंग्रजी | |
2 | मराठी भाषा | 25 | 50 | मराठी | 120 मिनिटे |
3 | सामान्य ज्ञान | 25 | 50 | मराठी | |
4 | बुद्धिमापन चाचणी | 25 | 50 | मराठी | |
एकूण | – | 100 | 200 | – | 120 मिनिटे |
Timing For GMC Dhule Group D Exam 2024
- परीक्षेचा अवधि 120 मिनिटे आहे. उमेदवारांस परीक्षा केंद्रावर साधारणतः 180 मिनिटे उपस्थित रहावे लागेल ज्यामध्ये नोंद होणे (logging in), प्रवेशपत्र गोळा करणे, सूचना देणे इ. साठी लागणा-या कालावधीचासुद्धा समावेश आहे.
- इंग्रजी भाषेच्या प्रश्नावली व्यतिरिक्त इतर प्रश्नावल्या मराठी भाषेत असतील. सर्व प्रश्नावलींना सामायिक वेळ दिलेला आहे.
- दिलेल्या 120 मिनिटांच्या कालावधीत उमेदवार कोणत्याही प्रश्नावलीतील कोणताही प्रश्न सोडवू शकतात.
- सर्व प्रश्नांना बहुपर्याय असतील. प्रश्नासाठीच्या पाच उत्तरांपैकी, फक्त एकच अचूक उत्तर असेल.
- उमेदवारास सर्वाधिक अचूक उत्तराची निवड करावयाची आहे आणि उमेदवारास वाटत असलेल्या योग्य / अचूक पर्यायावर माउस-क्लिक’ करावयाचा आहे.
- उमेदवाराने क्लिक केलेला पर्याय ठळकपणे दर्शविला जाईल आणि त्यास उमेद%E2%80%8Cवाराचे त्या प्रश्नाचे उत्तर म्हणून गणले जाईल.
- उमेदवाराने दर्शविलेल्या चुकीच्या उत्तरासाठी कोणताही दंड नाही. परंतु उमेदवाराने कोणत्याही प्रश्नाचे उत्तर अंदाजाने देऊ नये असा सल्ला दिला जात आहे.
- परीक्षेसाठीचा सूचक अभ्यासक्रम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कृपया ध्यानात घ्या की या पुस्तिकेत दिलेले प्रश्नांचे प्रकार हे उदाहरणादाखल आहेत आणि सर्वसमावेशक नाहीत.
- प्रत्यक्ष परीक्षेत तुम्हाला यापैकी काही किंवा सर्व प्रकारांचे अधिक काठीण्य पातळीचे प्रश्न आढळतील, शिवाय या ठिकाणी नमूद न केलेल्या इतर प्रकारांवरही प्रश्न आढळतील. काही नमुना प्रश्न खाली दिले आहेत
GMC Dhule Exam Syllabus 2024
अ क्र | विषय | तपशील |
1 | मराठी | समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार- नाम, सर्वनाम, क्रियाविशेषण, क्रियापद, विशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार, म्हणी, वाक्यप्रचारांचे अर्थ व उपयोग, शब्दसमुहाबद्दल एक शब्द |
2 | इंग्रजी | Vocabulary, synonyms & antonyms, proverbs, tense & kinds of tense, question tag, use the proper form of the verb, spot the error, verbal comprehension passage, etc., spellings, sentence structure, one-word substitutions, phrases Article, Prepositions, Spelling, Punctuation, Expression, Simple Sentence structure, Grammar, Use of Idioms and Phrases & their meaning |
3 | सामान्य ज्ञान | दैनंदिन घटना, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र इ., चालू घडामोडी ( भारतातील व महाराष्ट्रातील), क्रीडा व साहित्य विषयक ( भारतातील व महाराष्ट्रातील), भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यघटना, न्यायमंडळ शैक्षणिक व आरोग्य शिक्षण विषयक माहिती अधिकार अधिनियम, 2005, संगणक माहिती तंत्रज्ञान, जीएसटी आर्थिक सुधारणा व कायदे (खरेदी प्रक्रिया) |
4 | बौद्धिक चाचणी | उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न |
1) गट ड पदासाठीच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षेसंबंधीत माहिती पुस्तिका व नमुना प्रश्नपत्रिका
2) गट ड पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षाचे उमेदवारांना साठी सूचना
3) लेखनिकाचे आवश्यक्ता असल्यास खालील सूचना वाचावी व सोबत जोडलेले घोषणापात्र भरून देण्यात यावे