अनुरेखक पदांसाठी परीक्षेचे स्वरुप, निवड पद्धती, अभ्यासक्र| DTP Maharashtra Tracer Bharti Syllabus and Exam Pattern

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

DTP Maharashtra Tracer Bharti Syllabus and Exam Pattern : The selection of candidates will be based on the total marks obtained in the online (written) examination and the professional test. However, the online exam will be conducted based on the assumed eligibility mentioned by the candidate in the application without any prior verification of documents. Therefore, the marks obtained in this exam do not guarantee any right to selection. The candidate’s eligibility will be confirmed only after a full document verification. If a candidate is found ineligible during this process, they will be excluded from the selection procedure. The selection committee reserves the full right to disqualify any candidate at any stage of recruitment due to lack of eligibility, and no complaints from the candidate will be entertained.

For the supervisor category, the online written exam will be out of 120 marks and the professional test out of 80 marks, making a total of 200 marks. The written exam will include Marathi, English, General Knowledge, and Intellectual Ability, each subject carrying 30 marks, totaling 120 marks. This exam will be based on the minimum educational qualification prescribed for the supervisor post and will be held for 90 minutes. The question paper will be objective and multiple-choice, with four options for each question, of which only one option is correct. In case of a tie in marks, the government’s issued instructions will be followed for decision-making.

Candidates scoring at least 45% in the written exam will be eligible to appear for the professional test, which will focus on technical skills such as AutoCAD and GIS related courses. The schedule for the professional test will be informed separately to eligible candidates.

उमेदवाराची अंतिम निवड ऑनलाइन (लेखी) परीक्षा आणि व्यवसायीक चाचणी परीक्षेत मिळालेल्या एकूण गुणांवर केली जाईल. मात्र, उमेदवारांनी अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार कोणत्याही कागदपत्रांची पूर्वतपासणी न करता ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेत मिळालेल्या गुणांवर उमेदवाराला निवडीबाबत कोणतेही हक्क राहणार नाही. पात्रता निश्चित करण्यासाठी संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी केली जाईल, आणि पात्र नसल्यास उमेदवाराला निवड प्रक्रियेतून वगळले जाईल. भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवल्याचे अधिकार निवड समितीकडे राखून ठेवण्यात आले आहेत, आणि याबाबत उमेदवाराच्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत.

अनुरेखक संवर्गासाठी, ऑनलाईन (लेखी) परीक्षा १२० गुणांची असून ती मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान व बौद्धिक चाचणी यांच्यासाठी (प्रत्येक विषयाला ३० गुण) होईल. परीक्षा ९० मिनिटांची असेल व वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी स्वरुपाची राहील. बहुपर्यायी प्रश्नांसाठी दिलेल्या चार पर्यायांपैकी एकच पर्याय योग्य असेल. समान गुण मिळाल्यास शासनाच्या सूचनांनुसार निर्णय घेतला जाईल.

परीक्षेत किमान ४५% गुण घेणाऱ्या उमेदवारांकडेच व्यवसायीक चाचणीसाठी संधी मिळेल, जी तांत्रिक अभ्यासक्रमांवर (जसे की ऑटोकॅड आणि जीआयएस) आधारित असेल. व्यवसायीक चाचणीचे वेळापत्रक पात्र उमेदवारांना स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. दि. ०४.०५.२०२२ रोजी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, ऑनलाईन व व्यवसायीक परीक्षेत मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे शिफारस / निवडसूची तयार होऊन गुणवत्ता मुताबक उमेदवारांची शिफारस केली जाईल.

According to the government’s General Administration Department’s decision dated 04.05.2022, the final recommendation/selection list will be prepared based on the total marks obtained in the online exam and professional test. The candidates will be recommended/selected based on their merit in the list.

DTP Maharashtra Tracer Exam Pattern 

ऑनलाईन परीक्षा आयोजनाचे वेळी अंतर्भूत विषयानुषंगाने अनुरेखक संवर्गासाठी एकूण १२० गुणांची (प्रत्येकी २ गुणांचा एक प्रश्न याप्रमाणे ६० प्रश्न) ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. त्यापैकी मराठी इंग्रजी + सामान्यज्ञान + बौद्धिक चाचणी यासाठी प्रत्येक विषयास अनुक्रमे ३०-३०-३०-३० गुण याप्रमाणे १२० गुणांची विषयानुषंगाने ४ (चार) गट असलेली ९० मिनिटांची परीक्षा घेण्यात येईल. इंग्रजी विषयाची परीक्षा इंग्रजी भाषेमध्ये तर मराठी, सामान्यज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयांची परीक्षा मराठी भाषेमध्ये घेण्यात येईल. यामध्ये गट अ मराठी ३० गुण (२२.३० मिनिटे), गट ब इंग्रजी ३० गुण (२२.३० मिनिटे), गट क सामान्यज्ञान ३० गुण (२२.३० मिनिटे), गट ड बौध्दिक चाचणी ३० गुण (२२.३० मिनिटे) असे चार गट असणार आहेत. उमेदवारास प्रश्नपत्रिकेत नमूद केल्यानुसारच्या गटनिहाय विशिष्ट क्रमाने प्रश्न सोडविणे अनिवार्य राहील. प्रथम गटातील प्रश्न त्या गटासाठी निर्धारित वेळेपूर्वी सोडविल्यास व निर्धारित वेळेपूर्वी तो गट सादर केल्यानंतर क्रमानुसार पुढील गट निवडता येईल. तसेच, सादर केलेल्या गटासाठी निर्धारित वेळेमधील उर्वरीत वेळ पुढील गटासाठीच्या निर्धारीत वेळेमध्ये समाविष्ट होईल. याप्रमाणे क्रमानुसार प्रत्येक गटातील प्रश्न सोडविल्यानंतरचा उर्वरीत वेळ पुढील गटासाठी उपलब्ध होईल. (जसे की, गट अ साठी निर्धारीत वेळ २२.३० मिनिटे आहे, परंतु, २० व्या मिनिटास गटातील प्रश्न सोडवुन गट सादर केल्यानंतर त्यातील उरलेली २.३० मिनिटे पुढील गटासाठी (उदा. गट-ब साठी) २२.३० + २.३० २५ मिनिटे एवढा कालावधी उपलब्ध होईल) तसेच, निर्धारीत वेळेपूर्वी गटातील सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी निर्धारीत वेळ संपली किंवा गट सादर करण्यापूर्वीच निर्धारित वेळ संपल्यास गट सिस्टीमकडुन आपोआप सादर होईल. एका गटातील प्रश्न सोडवून गट उमेदवाराने सादर केल्यानंतर / सिस्टीमद्वारे सादर झाल्यानंतर पुन्हा त्या गटामध्ये जाता येणार नाही. प्रस्तुतची प्रकिया सर्व गटांसाठी लागू राहील व अंतिमतः जरी सर्व गटांची उत्तरे सादर केली तरी, परीक्षेचा संपूर्ण वेळ संपल्यानंतरच उमेदवारास परीक्षा कक्ष सोडता येईल.

DTP Maharashtra Tracer Exam Syllabus 

DTP Maharashtra Tracer Exam Pattern and Syllabus

 


Available for Amazon Prime