JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Document List For Latur DCC Bank Exam – लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आवश्यक कागदपत्रांची यादी डाउनलोड करा

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Important Document List For Latur DCC Bank Exam

Document List For Latur DCC Bank Exam: The Latur District Central Co-operative Bank Ltd., an official announcement has been made regarding the recruitment process for the positions of Clerk, Multipurpose Support Staff (Subgrade/Peon), and Driver following the online examinations held on March 28, 2026. Shortlisted candidates are required to attend the mandatory interview and document verification process scheduled from June 26, 2026, to June 29, 2026, and further call letters and detailed instructions have been dispatched to their registered email addresses and published on the bank’s official website.

Candidates who have applied for the straight-line recruitment based on the advertisement dated December 18, 2025, must submit this completed verification list to the Executive Director at the Head Office in Latur. You are required to present all original documents along with two sets of photocopies (certified true copies).

Before submission, ensure the top of the form is accurately filled out with your Applied Post (अर्ज केलेले पद), Application Number (अर्ज क्र.), Seat Number (बैठक क्र.), Contact Number, Email ID, and the Submission Date.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडने २८ मार्च २०२६ रोजी घेतलेल्या ऑनलाइन परीक्षांनंतर लिपिक, बहुउद्देशीय सहाय्यक कर्मचारी (सब-ग्रेड/शिपाई) आणि चालक या पदांच्या भरती प्रक्रियेबाबत अधिकृत घोषणा केली आहे. निवड झालेल्या उमेदवारांनी २६ जून २०२६ ते २९ जून २०२६ या कालावधीत आयोजित मुलाखत आणि कागदपत्र पडताळणी प्रक्रियेस अनिवार्यपणे उपस्थित राहणे आवश्यक आहे; यासंदर्भातील पुढील सूचना आणि ‘कॉल लेटर्स’ (बोलावणे पत्रे) उमेदवारांच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यांवर पाठवण्यात आली असून बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरही ती प्रसिद्ध करण्यात आली आहेत. बँकेच्या सरळसेवा नोकरभरतीसाठी दिनांक १८.१२.२०२५ रोजीच्या वेबसाईटवरील विस्तृत जाहिरातीस अनुसरून आवश्यक कागदपत्रांच्या प्रमाणीत सत्य प्रती खालील यादीप्रमाणे मुळ प्रमाणपत्र व दोन छायांकीत प्रती व इतर माहिती सादर करावी !! 

दि. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., लातूर सरळसेवा नोकर भरती अनुषंगाने बँकेच्या लिपीक (लेखनीक), शिपाई / Subgrade (Multipurpose support Staff), व वाहन चालक (Driver) पदांकरीता ऑनलाईन परिक्षा दि. २८.०३.२०२६ रोजी घेणेत आलेली असून पात्र होणाऱ्या गुणांचे गुणानुक्रमे नमुद पदसंख्येच्या १ः३ प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी (परिक्षेचा बैठक क्रमांक) बँकेच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करणेत आलेली आहे. महाराष्ट्र शासन निर्देश दि. ३०.११.२०२५ व दि. ०८.०५.२०२६ रोजीचे शासन निर्णयानुसार लातूर जिल्ह्यातील मुळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांकरीता ७०% पदे राखीव असून उर्वरीत ३०% पदे जिल्ह्याबाहेरील उमेदवारांकरीता राखीव प्रमाणे खालील तपशिलानुसार Normalization प्रमाणे Cut-off निश्चित करणेत आलेला आहे. तेंव्हा सर्व पात्र उमेदवारांना त्यांच्या अधिकृत ईमेल आयडीवर व बँकेच्या वेबसाईटवर मुलाखत पत्र व कागदपत्र पडताळणी सुचना पॅनल नुसार दि. २६.०६.२०२६ ते दि. २९.०६.२०२६ या कालावधीत मुलाखत घेण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.

कागदपत्रांची यादी

Important Document List For Latur DCC Bank Exam

लिपीक (लेखनीक), शिपाई / Subgrade (Multipurpose support Staff), व वाहन चालक (Driver) पदांचे कागदपत्र पडताळणी व मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची मुलाखत दि.२६.०६.२०२६ ते २९.०६.२०२६ या कालावधीत बँकेचे मुख्यालय, व बँक शाखा गुळ मार्केट या ठिकाणी पॅनल १ ते ४ नुसार या ठिकाणी आयोजित करणेत आलेली आहे. मुलाखत पत्रात नमुद उमेदवारांना कागदपत्र / प्रमाणपत्र पडताळणी पुरविणेत येणाऱ्या चेकलिस्ट (Check List) प्रमाणे सादर करणे अनिवार्य आहे. उमेदवारांच्या बायोमॅट्रीक नोंदीची सत्यता, पडताळणी मुलाखतीच्या वेळी करणेत येणार आहे खालील बाबींची उमेदवारांनी दक्षता घेणेत यावी.

१. ऑनलाईन परिक्षेच्या वेळी ज्या बोटांचे ठसे दिलेली असतील त्याच बोटांच्या ठशांचे आधारे मुलाखतीवेळी उमेदवारांची सत्यता पडताळणी करणेत येणार आहे.

२. उमेदवारांच्या बोटांवर कसल्याही थर (शाई, मेंहेंदी अथवा रंग इ.) असेल तर काढून टाकावा. मुलाखतीच्या पुर्वी सदर थर पुर्णपणे गेलेला आहे याची खात्री करून घ्यावी. कागदपत्र पडताळणी वेळी उमेदवाराने आवश्यक मुळ कागदपत्रे / गुणपत्रक / प्रमाणपत्र सादर न केल्यास सदर उमेदवारास कागदपत्रे पुनः सादर करणेस कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. मुळ कागदपत्रे / प्रमाणपत्र म्हणून छायांकित (Xerox) / मोबाईल / ऑनलाईन या द्वारे पडताळणी करीता ग्राह्य धरली जाणार नाहीत. असे उमेदवार मुलाखतीस पात्र राहणार नाहीत.

Table of Contents