Dharmaday Ayukta Recruitment Exam Syllabus PDF: धर्मादाय आयुक्तालय भरती २०२६ अभ्यासक्रम, लेखी परीक्षा पॅटर्न

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Dharmaday Ayukta Recruitment Exam Pattern and Syllabus 

Dharmaday Ayukta Recruitment Exam Syllabus PDF: The Dharmaday Ayukta Recruitment 2026 announced by Maharashtra State offers 179 Stenographer vacancies for both English and Marathi sections. As per the official notification, the exam pattern includes a written test, shorthand skill test, and document verification. The syllabus covers General Knowledge, Current Affairs, Marathi & English Grammar, Reasoning, and Computer Knowledge. For the Stenographer skill test, candidates must achieve 100 wpm in shorthand and 40 wpm typing speed for English, while for Marathi stenographers it is 100 wpm shorthand and 30 wpm typing speed. Aspirants preparing for the Dharmaday Aayuktalay Maharashtra Bharti 2026 should focus on language skills, computer basics, and accuracy in shorthand to secure success.

🔔धर्मदायी आयुक्त महाराष्ट्र अंतर्गत 179 रिक्त पदांकरिता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर -Dharmaday Ayukta Exam Time Table Download

धर्मादाय आयुक्तालय भरती २०२६ अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये १७९ स्टेनोग्राफर पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरती परीक्षेची परीक्षा पद्धती लेखी परीक्षा, शॉर्टहँड कौशल्य चाचणी व कागदपत्र पडताळणी अशी असेल. अभ्यासक्रम मध्ये सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी व इंग्रजी व्याकरण, तर्कशक्ती, तसेच संगणकाचे मूलभूत ज्ञान यांचा समावेश आहे. स्टेनोग्राफर कौशल्य चाचणी साठी इंग्रजीमध्ये शॉर्टहँड गती १०० शब्द प्रति मिनिट व टायपिंग गती ४० शब्द प्रति मिनिट तर मराठीत शॉर्टहँड १०० शब्द प्रति मिनिट व टायपिंग गती ३० शब्द प्रति मिनिट आवश्यक आहे. उमेदवारांनी धर्मादाय आयुक्तालय महाराष्ट्र भरती २०२६ साठी भाषेचे ज्ञान, संगणक कौशल्य व शॉर्टहँड सराव यावर भर द्यावा. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

 

परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित बुध्दीमत्ता चाचणी व विषयज्ञान या /विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. सदर परीक्षेचा दर्जा हा संबंधित पदाकरीता विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार तसेच संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या कौशल्य तपासणीस पूरक राहील.

विधि सहायक या पदाकरिता परीक्षेचे गुण २०० व परीक्षेचा कालावधी दोन तास राहील. जे उमेदवार किमान ४५% गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांमधुन निवडसुची तयार करुन निवडसुचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल. विधि सहायक पदाकरीता परीक्षेचा अभ्यासक्रम सोबत जोडण्यात येत आहे.

निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या पदांकरिता परीक्षेचे गुण २०० व परीक्षेचा कालावधी दोन तास राहील. जे उमेदवार किमान ४५% गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांमधुन निवडसूची तयार करुन निवडसुचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल. निरीक्षक व वरिष्ठ लिपिक पदाकरीता परीक्षेचा अभ्यासक्रम सोबत जोडण्यात येत आहे.

परंतु लघुलेखक उच्चश्रेणी, व लघुलेखक निम्नश्रेणी, या संवर्गाचे परीक्षेचे गुण १२० व परीक्षेचा कालावधी एक तास राहील. तसेच व्यावसायीक चाचणीसाठी ८० गुणांची असेल, व जे उमेदवार परिक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करतील असे उमेदवारांनाच व्यावसायीक चाचणी देता येईल. परीक्षा व व्यावसायीक चाचणी यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करुन निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल. लघुलेखक उच्चश्रेणी, व लघुलेखक निम्नश्रेणी पदाकरीता परीक्षेचा अभ्यासक्रम सोबत जोडण्यात येत आहे..

Dharmaday Ayukta Maharashtra Exam Pattern

धर्मादाय आयुक्तालय भरती २०२६ – पदनिहाय परीक्षा पद्धती

पदाचे नावएकूण गुणपरीक्षा कालावधीकौशल्य / व्यावसायिक चाचणीकिमान पात्रता गुणनिवड प्रक्रिया
विधि सहायक२००२ तासलागू नाही४५%लेखी परीक्षा गुणवत्तेनुसार
निरीक्षक२००२ तासलागू नाही४५%लेखी परीक्षा गुणवत्तेनुसार
वरिष्ठ लिपिक२००२ तासलागू नाही४५%लेखी परीक्षा गुणवत्तेनुसार
लघुलेखक उच्चश्रेणी१२० (लेखी)१ तास८० गुणांची कौशल्य चाचणी (शॉर्टहँड + टायपिंग)लेखी परीक्षेत ४५%लेखी + कौशल्य चाचणी
लघुलेखक निम्नश्रेणी१२० (लेखी)१ तास८० गुणांची कौशल्य चाचणी (शॉर्टहँड + टायपिंग)लेखी परीक्षेत ४५%लेखी + कौशल्य चाचणी

Dharmaday Ayukta Recruitment Exam Syllabus 2026

Table of Contents