चालू घडामोडी २०२५ पेपर २७ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! August 4, 2025 by User User 6 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on August 04, 2025 By MahaBharti Exam Team चालू घडामोडी जुलै २०२५ पेपर २७ सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 20 1. खालील विधाने वाचा व अचूक पर्याय निवडा. अ) भारतावरील चीनच्या आक्रमणाच्या पार्श्वभुमीवर कम्युनिस्ट पक्षात फूट पडली. ब) भारत धार्जिण्या कम्युनिस्टांना उजवे तर चीन धार्जिण्या कम्युनिस्टांना डावे असे संबोधले जाऊ लागले. क) महाराष्ट्रात उजव्या कम्युनिस्टांचे नेते कॉ. रणदिवे तर डाव्या कम्युनिस्टांचे नेते कॉ.डांगे होते. ड) कालांतराने डावे कम्युनिस्ट काँग्रेसच्या जवळ गेले, उजवे कम्युनिस्ट मात्र कायम काँग्रेसच्या विरोधात राहिले. A. सर्व विधाने सत्य आहेत B. विधाने ब आणि ड असत्य आहेत. C. विधाने क आणि ड असत्य आहेत D. विधाने ब आणि क असत्य आहेत. 2 / 20 2. घटकराज्यातील मान्यताप्राप्त पक्ष असा दर्जा प्राप्त होण्यासाठी खालीलपैकी महत्वाच्या अटी पुढीलप्रमाणे. अ) तो पक्ष 5 वर्षापासून सतत राजकीय कार्य करत असावा. ब) पक्ष प्रमुख उच्च राजघराण्याशी संबंधित असावा. क) अस्तित्वात असलेल्या लोकसभेत 25 पैकी 1 व विधानसभेत दा 30 पैकी 1 सभासद निवडून गेलेला असावा. ड) लोकसभेत पक्षाची एक स्त्री-उमेदवार निवडून गेलेली असावी. A. केवळ विधान अ बरोबर आहे. B. वरीलपैकी एकही नाही. C. बवक ही विधाने बरोबर आहेत. D. अवक ही विधाने बरोबर आहेत. 3 / 20 3. भारतातील राजकीय पक्षांच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या. अ) किमान 5 राज्यात राज्य स्तरीय पक्ष म्हणून मान्यता मिळवणाऱ्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली जाते. ब) एकूण वैध मतांतील राज्यात 8% मते मिळविणाऱ्या पक्षाला राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता दिली जाते. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त. A. एकही नाही B. दोन्ही C. केवळ ब D. केवळ अ 4 / 20 4. खालील विधाने पहा : अ) राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळवण्यासाठी, निवडणूक आयोगाने, सध्याच्या अटींबरोबरच, 2005 साली अजून एक अट ठेवली, ज्याद्वारे एखाद्या पक्षाला कमीत कमी चार राज्यांमध्ये राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता मिळायला हवी. ब) कमीत कमी 8 राज्यांमध्ये, एकूण मतदानाच्या 4% मते मिळायला हवीत, अशी आधीची अट होती. A. अ आणि ब दोन्ही बरोबर नाहीत B. अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत C. ब बरोबर आहे D. अ बरोबर आहे 5 / 20 5. योग्य कथन ओळखा. अ) भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाली. ब) संयुक्त राष्ट्र व राष्ट्रकुल सचिवालयाच्या सहकार्याने इतर राष्ट्रांतील निवडणूकीसाठी भारताचा निवडणूक आयोग तज्ञ व निरीक्षक उपलब्ध करून देतो. A. फक्त अ B. फक्त ब C. अ आणि ब दोन्ही D. अ आणि ब दोन्ही नाही. 6 / 20 6. 2017 च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी महाराष्ट्रात हे राज्य निवडणुक आयुक्त होते. A. नंदलाल गुप्ता B. निला सत्यनारायण C. जगेश्वर सहारिया D. डी.एन. चौधरी 7 / 20 7. अयोग्य कथन ओळखा. A. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हे 6 व्होल्ट बॅटरीवर चालू होते आणि ते कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही परिस्थितीत उपयोगात येवू शकते. B. एक बॅलट युनिट सोळा उमेदवारांपर्यंत सेवा पुरवू शकते. C. एक नियंत्रण युनिट 48 उमेदवारांना प्राप्त मतांची नोंद ठेवू शकते. D. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये नियंत्रण युनिट व बॅलट युनिट चा समावेश असतो. 8 / 20 8. आम आदमी पक्षाच्या (आप) संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अ) आपची स्थापना 2012 मध्ये झाली. ब) 2013 च्या दिल्ली विधानसभा निवडणूकीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून आप पुढे आला. क) 20.15 च्या दिल्ली विधानसभा निवडणूकीत आपने 70 पैकी 68 जागा जिंकल्या. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त? A. फक्त क B. अ आणि क C. फक्त अ D. ब आणि क 9 / 20 9. अयोग्य कथन ओळखा : A. पहिले मुख्य निवडणूक आयुक्त, सुकुमार सेन यांची नियुक्ती 25 जानेवारी, 1950 रोजी करण्यात आली. B. भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी, 1950 रोजी करण्यात आली. C. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 324 नुसार भारतीय निवडणूक आयोग या संवैधानिक संस्थेची निर्मिती करण्यात आली. D. 1 ऑक्टोबर, 1993 पासून भारताच्या निवडणूक आयोग त्रिसदस्यीय झाला, त्यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्तांचा समावेश होता. 10 / 20 10. 'संपत कुमारन' समितीने ज्या अनेक निवडणूक सुधारणा सुचविल्या होत्या त्यातील महत्वाची सुधारणा म्हणजे : A. मुख्य निर्वाचन आयुक्त अँग्लो-इंडियन असावा B. राज्यप्रशासनातील मुख्य सचिव दर्जाचा अधिकारी राज्यातील प्रमुख निर्वाचन अधिकारी म्हणून नेमावा. C. उद्योगपती वर्गातून निर्वाचन आयुक्ताची नेमणूक व्हावी D. राज्याचा राज्यपाल मुख्य निर्वाचन आयुक्त नेमावा 11 / 20 11. पुढीलपैकी कोणते विधान राजकीय पक्ष व हितसंबंधी गटांच्या परस्पर संबंधाबद्दल बिनचुक वर्णन करणारे आहे ? अ) हितसंबंधी गट त्या त्या विशिष्ट सामाजिक गट वा हितसंबंधाशी संबंधित मुद्दे व मागण्या उपस्थित करतात. राजकीय पक्ष या मागण्यांचा योजना व धोरणे निश्चित करण्यासाठी व राजकीय भूमिका घेण्यासाठी वापर करतात. ब) हितसंबंधी गट व दबाव गट राजकीय पक्षांचे मार्गदर्शन म्हणून भूमिका बजावतात व पक्षांसाठी राजकीय भरतीचे कार्य करतात. क) हितसंबंधी गटांनी प्रगटीकरण केलेल्या मागण्यांचे सुसूत्रीकरण करताना राजकीय पक्षांना विविध व बऱ्याच वेळा परस्पराविरोधी हितसंबंधामधील तोल राखावा लागतो. ड) हितसंबंधी गट राजकीय पक्षांचा वापर स्वतःच्या उद्दिष्टय पूर्तीसाठी करून घेतात. A. अ व ब B. वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर आहेत. C. ब व क D. अ, ब व क 12 / 20 12. एन.टी. रामाराव यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अ) ते तेलगु चित्रपटाचे सुप्रसिद्ध नायक होते. ब) ते तेलगु देसम या पक्षाचे संस्थापक होते. क) ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. ड) राज्यपाल रामलाल यांना बढती मिळाली. A. ब आणि क विधाने बरोबर आहेत. B. अ, ब, क विधाने बरोबर आहेत C. ब, क, ड विधाने बरोबर आहेत. D. वरील सर्व विधाने बरोबर आहेत. 13 / 20 13. "एका विशिष्ट पक्षाच्या भ्रष्ट आणि अकार्यक्षम शासनाला संधी देण्यापेक्षा अनेक पक्षाच्या आघाडी सरकारचा योग्य पर्याय. अ) उत्तम शासन व संतुलित आर्थिक व्यवस्थापनासाठी ब) राजकीय स्थैर्यासाठी क) ते अधिक जबाबदार व पारदर्शी असेल. ड) ते अधिक लोकशाही व संघीय स्वरूपाचे असे. A. अ, ब, ड योग्य पर्याय आहेत. B. क, ड योग्य पर्याय आहेत. C. अ, ब योग्य पर्याय आहेत. D. ब, क, ड योग्य पर्याय आहेत. 14 / 20 14. 20 मार्च 2015 च्या अधिकृत यादीप्रमाणे महाराष्ट्र विधानपरिषदेतील एकूण 78 सदस्यांची पक्षनिहाय संख्या खालीलप्रमाणे आहे : .....भारतीय जनता पार्टी .....राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी .....शिवसेना .....भारतीय राष्ट्रीय काँग्रेस A. 20, 26, 8, 11 B. 22, 27, 10, 8 C. 28, 21, 12, 7 D. 12, 28, 7, 21 15 / 20 15. भारतात खुल्या व निःपक्ष वातावरणात निवडणूका घेण्यासाठी खालीलपैकी कोणती समस्या कारणीभूत आहे ? अ) खोटे मतदान करणे. ब) दहशतीसाठी गुंडांना उभे करणे. क) मतदान केंद्र ताब्यात घेणे. ड) निवडणूकीत काळ्या पैशाचा वापर. A. केवळ विधान क बरोबर आहे. B. केवळ विधान अ बरोबर आहे. C. ब आणि क विधाने बरोबर आहेत. D. वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत. 16 / 20 16. 1993 ला टी.एन.शेषन मुख्य निवडणूक आयुक्त असतांना निवडणूक आयोग त्रिसदस्यीय असल्याचे घोषित करून दोन अतिरिक्त आयुक्त नेमले होते. अ)एम.एस.गिल ब) जे.एम. लिंगडोह क) डि.व्ही.जी. कृष्णमुर्ती ड) व्ही.एस. संपथ A. ब आणि ड योग्य पर्याय आहेत. B. अ आणि ब योग्य पर्याय आहेत. C. क आणि ड योग्य पर्याय आहेत. D. अ आणि क योग्य, पर्याय आहेत. 17 / 20 17. 2009 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये, खालील राजकीय पक्षांची सर्वात जास्त ते सर्वात कमी मतांची टक्केवारी, यानुसार मांडणी करायची झाल्यास, खालीलपैकी कोणता पर्याय योग्य ठरेल ? A. INC, NCP, BJP, SS B. NCP, INC, BJP, SS C. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP), शिवसेना (SS), भारतीय जनता पार्टी (BJP), D. INC, SS, NCP, BJP 18 / 20 18. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत खालील विधाने विचारात घ्या. अ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना 9 मार्च 2006 मध्ये झाली. ब) 2012 च्या नाशिक महापालिका निवडणूकीत या पक्षाने 63 जागा जिंकल्या. क) 2009 च्या विधानसभा निवडणूकीत या पक्षाने 13 जागा जिंकल्या होत्या. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त? ड) 2014 च्या विधानसभा निवडणूकीत या पक्षाने 3 जागा जिंकल्या. A. अ, ब आणि क B. अ आणि ब C. अ आणि क D. ब, क आणि ड 19 / 20 19. महाराष्ट्रातील कामगार चळवळींची पिछेहाट होण्याची कारणे कोणती? अ) कामगारांचे दारीद्रय ब) कामगार संघटना मधील स्पर्धा क) उद्योगपतींचे प्रतिकूल धोरण ड) शासनाचे चळवळी वरील नियंत्रण वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? A. अ आणि ब फक्त B. अ फक्त C. अ, ब आणि ड D. अ, ब आणि क 20 / 20 20. 2004 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकामध्ये काँग्रेसला 145 जागा मिळाल्या व त्यांच्या मित्रपक्षांना 74 जागा मिळाल्या. ही बेरीज देखील बहुमतापेक्षा कमी होती त्यावेळी कोणत्या राजकीय पक्षाच्या 'बाहेरून' पाठिंब्याच्या जोरावर संयुक्त पुरोगामी आघाडीने अल्पमतातील सरकार स्थापन केले? अ) भारतीय कम्युनिस्ट पक्ष ब) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष क) तृणमूल काँग्रेस ड) राष्ट्रीय जनता दल A. अ आणि ब B. अ आणि क C. ब आणि ड D. क आणि ड टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. Your score isThe average score is 28% LinkedIn Facebook 0% Restart quiz