चालू घडामोडी २०२५ पेपर २६ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

6
Created on By MahaBharti Exam Team
chalu ghdamodi

चालू घडामोडी जुलै २०२५ पेपर २६

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

1. राष्ट्राच्या विकास प्रक्रियेत सेवाक्षेत्राचा वाटा मोलाचा असल्यामुळे सेवाक्षेत्राचा सुदृढ विस्तार आणि विकास करण्यासाठी कोणते उपाय सांगता येतील ?
अ) पायाभूत सामाजिक क्षेत्रातील गुंतवणूकीला प्राधान्य देणे.
ब) वित्तीय क्षेत्रात सुधारणा करणे.
क) राष्ट्रीय सेवाक्षेत्र धोरण निश्चिती व अंमलबजावणी करणे.
ड) कामगार कायदे लवचिक नसणे.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

2 / 20

2. पुढील दोन वाक्यांचा विचार करा. पहीले विधान आहे व दुसरे त्याचे कारण दिले आहे.
अ) स्वामी नारायण तीर्थ विद्यापीठ नांदेड येथे स्थापन झाले.
ब) 14 जानेवारी 1994 पासून मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणून झाले.

3 / 20

3. शिक्षणाचा हक्क अधिनियम, 2009 संदर्भात खालील विधाने पहा आणि योग्य पर्याय निवडा.
अ) प्रत्येक मुलाला माध्यमिक शिक्षणाचा मुलभूत हक्क आहे असे हा अधिनियम सुचवतो.
ब) शिक्षण हे समाधानकारक आणि समानतेच्या दर्जाचे असावे.
क) अनौपचारिक शाळांमधेही ते देता येईल.

4 / 20

4. पुढील दोन विधानांतील कोणते बरोबर आहे. ?
अ) सन 1951, 1961 व 1971 च्या जनगणनेकरिता साक्षरता दर 5 वर्षे व अधिक वयांच्या लोकांसाठी काढण्यात आला होता.
ब) सन 1981, 1991 व 2001 च्या जनगणनेकरिता साक्षरता दर 7 वर्षे व अधिक वयांच्या लोकांसाठी काढण्यात आला.

5 / 20

5. खालील विधाने वाचा.
अ) उच्च शिक्षण संस्थांना औद्योगिक विकासाठी जोडून देणे.
ब) भारतातील उच्च शिक्षण संस्थांना परदेशी उच्च शिक्षण संस्थांबरोबर जोडून देणे.
क) उच्च शिक्षण संस्थांना स्थानिक समुदायांशी जोडून देऊन त्यांच्यापुढील विकासाच्या मार्गातील आव्हानांना सामोरे जाणारे सुयोग्य तंत्रज्ञान देणे.
ड) भारतातील सर्व उच्च शिक्षण संस्थांना इंटरनेटच्या माध्यमातून परस्परांशी जोडून देणे.
उन्नत भारत अभियानाच्या ध्येयासंदर्भात वरीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत ?

6 / 20

6. उच्च शिक्षणावरील वाढता खर्च नियंत्रित करण्यासाठी शासनाने कोणते मार्ग अवलंबिले आहेत ?
अ) दूर शिक्षणपद्धतीचा स्विकार व प्रसार.
ब) उच्च शिक्षण क्षेत्रात खाजगी प्रयत्नांना उत्तेजन.
क) उच्च शिक्षणावरील शासकीय खर्चाच्या कपातीचे धोरण.
ड) औपचारिक शिक्षणाला उत्तेजन.
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

7 / 20

7. खालील विधाने विचारात घ्या.
अ) कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2004 साली सुरू झाली.
ब) या योजनेअंतर्गत विद्यालयांमध्ये 60% जागा अनु.जाती, अनु.जमाती, इतर मागास जाती आणि अल्पसंख्यांक मुलींसाठी राखीव आहेत.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?

8 / 20

8. मौलाना आझाद राष्ट्रीय शिष्यवृत्ती विषयी पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

9 / 20

9. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) सच्चर आयोग हा अल्पसंख्यांकांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी नेमला होता.
ब) राष्ट्रीय मुक्त शाळा संस्थेशी मदरशांना जोडण्याचा प्रस्ताव आहे.
क) मदरशांमधून प्राप्त केलेली शैक्षणिक पात्रता ही अलिगढ मुस्लिम विद्यापीठ प्रवेशाकरता ग्राह्य धरते.

10 / 20

10. खालील विधाने पहा.
अ) राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना संशोधनात्मक अभ्यासासठी आर्थिक मदत देते.
ब) मनुष्य बळ विकास मंत्रालय ही योजना राबवणारी अग्रभागी संस्था आहे.
क) संशोधनात्मक अभ्यास एम.फिल आणि पी.एच.डी. साठी करता येऊ शकेल.
वरीलपैकी कोणती विधान/विधाने बरोबर आहेत ?

11 / 20

11. 'कामराज प्लॅन/योजना' म्हणजे काय ?

12 / 20

12. गॅट्स (GATS) करारानुसार उच्चशिक्षणाचा अंतर्भाव सेवा क्षेत्रात केल्यामुळे कोणते परिणाम संभवतात ?
अ) परदेशातील विद्यापीठांना देशातील उच्चशिक्षण क्षेत्रात प्रवेश मिळणार नाही.
ब) एक सदस्यराष्ट्राला दुसऱ्या सदस्य राष्ट्रामध्ये सेवेवर आधारित व्यवसाय, धंदा, संस्था सुरू करण्याची मुभा असेल.
क) भारतात आपल्या शाखा काढण्याचा अधिकार परदेशातील शिक्षण संस्था/विद्यापीठाला मिळू शकेल.
ड) या शिक्षण संस्थांवर भारत सरकारचे फारसे नियंत्रण असणार नाही.

13 / 20

13. शिक्षण हा सेवाक्षेत्रामधील अत्यंत महत्त्वाचा घटक असून सेवा क्षेत्रात शिक्षणाची भुमिका कोणती ?
अ) भांडवल, श्रम आणि संयोजन यामध्ये सकारात्मक, विकासाभिमुख बदल घडवून आणणे.
ब) सेवा क्षेत्रातील अन्य उत्पादक सेवांचा पुरवठा करण्यासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करणे.
क) अपारंपारिक उर्जास्रोताबाबत जनजागृती करणे.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

14 / 20

14. उच्च शिक्षणातील शैक्षणिक स्वायत्ततेचा प्रश्न हा पुढील बाबींशी निगडीत आहे.
अ) खाजगी शिक्षण संस्थांना पूर्णपणे मोकळीक देणे.
ब) प्राध्यापकांची शैक्षणिक पात्रता व नियतकार्य आणि दायित्व यांचे स्वरूप ठरविण्याचे स्वातंत्र्य.
क) प्रवेश परीक्षा संबंधीचे नियम व निकष निश्चित करण्याचे स्वातंत्र्य.
ड) शासनाने उच्च शिक्षणाचे फक्त नियमन व सनियंत्रण करणे.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

15 / 20

15. खालील विधाने पहा.
अ) शिक्षण हे घटनेच्या सातव्या परिशिष्टातील समवर्ती सूचीत अंतर्भूत आहे.
ब) उच्च शिक्षणात एकसमानता रहावी म्हणून केंद्र सरकार संस्थांना अनुदान देते.
क) अभिमत विद्यापीठांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळत नाही.

16 / 20

16. शिक्षण क्षेत्राने देशासमोरील आव्हाने पेलण्यास शिक्षक प्रशिक्षणात गुणवत्ता व दर्जा सुधारण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत ?
अ) समाजातील अधिक बुद्धीमान युवांना शैक्षणिक सेवाक्षेत्राकडे आकृष्ट करून घेणे.
ब) प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी कार्यप्रणाली विकसित करणे.
क) शिक्षक प्रशिक्षणासाठी सोईसुविधांची निर्मिती करणे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

17 / 20

17. उच्च व तंत्र शिक्षणाचा दर्जा सुधारणेशी कोणत्या समित्या संबंधित आहेत ?
अ) अनिल काकोडकर समिती
ब) राम ताकवले समिती
क) अरूण निगवेकर समिती
ड) मुणगेकर जाधव समिती

18 / 20

18. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य नाही ?
अ) सन 2008-09 मध्ये एकूण 18 केंद्रीय विद्यापीठे स्थापन केली गेली त्या राज्यांत ज्यात पूर्वी असे विद्यापीठ नव्हते.
ब) इंदिरा गांधी आदिवासी विद्यापीठ 2008-09 मध्येच अमरकंटक मध्यप्रदेश येथे स्थापन झाले जे अद्याप पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवतात परंतू संशोधन करीत नाही.

19 / 20

19. अयोग्य कथन ओळखा.

20 / 20

20. योग्य कथने ओळखा :
अ) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली.
ब) भारतीय जनता पार्टीची स्थापना 1980 मध्ये झाली.
क) राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 मध्ये झाली.
ड) भारतीय साम्यवादी पक्षाची स्थापना 1930 मध्ये झाली.

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 23%

0%


Available for Amazon Prime