चालू घडामोडी २०२५ पेपर २५ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! July 28, 2025 by User User 44 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on July 28, 2025 By MahaBharti Exam Team चालू घडामोडी जुलै २०२५ पेपर २५ सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 20 1. शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्तींच्या शिक्षणासंबंधी पुढील विधाने वाचून त्यापैकी अयोग्य विधान शोधा. A. अपंग लोकांसाठीच्या राष्ट्रीय निधीमधून प्रत्येक वर्षी 500 नव्या शिष्यवृत्ती देण्यात येतात. B. राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना, अपंग विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण, वैद्यकीय मदतीसह घेण्यासाठी शिष्यवृत्ती योजना आहे. C. दीनदयाळ अपंगत्व पुनर्वसन योजनेअंतर्गत विशेष शाळा सुरू करण्यासाठी बिगर शासकीय संघटनांना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण खाते आर्थिक सहाय्य देत आहे. D. माध्यमिक स्तरावर अपंगांना शिक्षणात समाविष्ट करणारी योजना सुरू करण्यात आली असून ही योजना पूर्वीच्या अपंग मुलांना एकात्मिक शिक्षण या योजनेऐवजी सुरू करण्यात आली आहे. 2 / 20 2. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? अ) सन 1964 साली नियुक्त झालेल्या मुदलियार आयोगाने प्रथम 15 वर्षाच्या त्रिस्तरीय अभ्यासक्रमाबाबत शिफारशी केल्या. (1) पहिली ते दहावी प्राथमिक व माध्यमिक (2) अकरावी व बारावी उच्च माध्यमिक (3) पदवी शिक्षण तीन वर्षीय ब) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आयोगाने विद्यापीठ स्तरीय अभ्यासक्रमाबाबत शिफारशी केल्या. A. एकही नाही B. फक्त ब C. फक्त अ D. दोन्हीही 3 / 20 3. खालील बाबींचा विचार करा. अ) राष्ट्रीय साक्षरता मोहीम आता साक्षर भारत म्हणून ओळखली जाते. ब) प्रमुख भर प्रौढ साक्षरतेवर आहे. क) प्रधान लक्ष्य 15 वर्षावरील प्रौढ गटाच्या कार्यान्वित (Functional) साक्षरतेवर आहे. ड) व्यावसायिक कार्यक्रमांपेक्षा मुळ शैक्षणिक कार्यक्रमांवर अधिक भर देणे हे सहउद्दिष्ट आहे. वरील कोणती विधाने बरोबर आहेत ? A. अ आणि क B. अ आणि ब C. ब आणि क D. क आणि ड 4 / 20 4. खालीलपैकी कोणते विधान बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काशी संबंधित आहे ? अ) बालक म्हणजे 6 ते 14 वयोगटातील सर्व मुले व मुली. ब) मोफत म्हणजे निःशुल्क शिक्षण होय. क) प्राथमिक शिक्षण म्हणजे इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंतचे शिक्षण. ड) प्राथमिक शिक्षण म्हणजे इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतचे शिक्षण. A. अ, ब, ड विधाने योग्य आहेत. B. अ, क, ड विधाने योग्य आहेत. C. अ, ब, क विधाने योग्य आहेत. D. ब, क, ड विधाने योग्य आहेत. 5 / 20 5. योग्य कथने ओळखा : अ) ऑक्टोबर, 1947 मध्ये महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ब) ही परिषद 'वर्धा शैक्षणिक परिषद' म्हणून सुद्धा ओळखली जाते. क) ह्या परिषदेत मोफत व सक्तीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, कला कौशल्यावर आधारित शिक्षण यांना महत्व देण्यात आले. A. फक्त अ, ब B. वरीलपैकी सर्व C. फक्त ब, क D. फक्त अ, क 6 / 20 6. 'शिक्षणाच्या अधिकाराने' भारतीय संविधानात बदल केले आहेत. पुढीलपैकी कोणता/कोणते बदल या अधिकारामुळे घडून आलेला /आलेले नाही ? अ) 14 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद असणाऱ्या अनुच्छेद क्र.21 (अ) चा समावेश करण्यात आला. ब) या अधिकारानुसार अनुच्छेद क्र.51 (अ) मध्ये एका मूलभूत कर्तव्याची भर पडलेली आहे. क) 'शिक्षण' हा विषय आता राज्यसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. A. ब B. अ C. अ, क D. अ, ब, क 7 / 20 7. व्यावसायिक शिक्षणसंस्थामधील रिक्त जागांचे विश्लेषण करण्यास्तव स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशींबाबत पुढील दोन विधानांपैकी काय खरे आहे ? अ) नव्या तंत्रशिक्षण संस्थांना परवानगी देऊ नये, केवळ सद्यस्थिती संस्थांना जागा वाढविण्यास अनुमती द्यावी. ब) हॉटेल व्यवस्थापन व कॅटरिंग तंत्रशिक्षण वगळूण इतर एमबीए अभ्यासक्रमातील प्रवेश क्षमता कमी करावी. A. दोन्हीही B. फक्त अ C. फक्त ब D. एकही नाही 8 / 20 8. 2018 या वर्षाकरता एन्.आय.आर.एफ्. ने विद्यापीठाची मानांकने जाहीर केली. खालील पहिल्या चार संस्थाकरता योग्य अनुक्रम काय आहे . अ) बनारस हिंदू विश्वविद्यालय ब) जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय क) अण्णा विश्वविद्यालय ड) भारतीय विज्ञान संस्था A. ड, ब, अ, क B. ब, अ, ड, क C. अ, ब, क, ड D. क, अ, ड, ब 9 / 20 9. पुढील विधानांचा अभ्यास करा : अ) पारंपारिक व सामाजिक गटांनी लोकशाही संस्थांच्या कार्यप्रणालीसाठी सामाजिक आधार उपलब्ध करून दिला आहे. ब) जात, भाषा, धर्म व प्रादेशिक अस्मितांनी आपल्या मागण्या मांडून सोयीची धोरणे व सोयी-सुविधा मिळविण्याच्या दृष्टीने दबाव देण्यासाठी लोकशाहीवादी राजकारणाचा वापर केला आहे. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त? A. अ व ब दोन्ही बरोबर आहेत. B. अ व ब दोन्ही बरोबर नाहीत. C. केवळ ब बरोबर आहे. D. केवळ अ बरोबर आहे. 10 / 20 10. केंद्र सरकारकडून सामाजिक विकासाच्या क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या व्यक्तिगत महिलांना स्त्रीशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात येतो. खाली नमूद केलेल्या सहा सुप्रसिद्ध स्त्री व्यक्तिमत्वांच्या नावे हा पुरस्कार अदा करण्यात येतो. अ) देवी अहिल्याबाई होळकर ब) कन्नगी क) माता जिजाबाई ड) राणी गैदिनलियो जेलियांग फ) राणी रुद्रम्मा देवी इ) राणी लक्ष्मी बाई सन 2007 मध्ये वरीलपैकी कोणता पुरस्कार अत्युष्कृष्ट प्रशासकीय कौशल्य, दर्जेदार नेतृत्व, आणि धैर्य यासाठी समाविष्ट करण्यात आला. A. वरीलपैकी नाही B. फ C. ब D. ड 11 / 20 11. सर्व शिक्षा अभियानासंदर्भात खालील विधानांचा विचार करा. अ) राजीव गांधी यांनी सुरू केले. ब) भारत शासनाचा कार्यक्रम. क) अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात सुरू करण्यात आले. ड) 'पढे भारत बढे भारत' या कार्यक्रमाचा एक उप-कार्यक्रम होता. A. ब आणि क पर्याय योग्य आहेत. B. अ आणि ब पर्याय योग्य आहेत. C. अ, ब, आणि ड पर्याय योग्य आहेत. D. ब, क आणि ड पर्याय योग्य आहेत. 12 / 20 12. खालील विधानांचा विचार करा. आरक्षण योजना स्वयंसेवी संस्थांना लागू केली जात आहे ज्यांना (राज्यसेवा मुख्य 2013) अ) भारताच्या कान्सॉलिडेटेड फंडमधून रु. 2 लाखापेक्षा अधिक ग्रांट मिळते. ब) ज्या 10 पेक्षा अधिक इसमांना नियमीतपणे रोजगार देतात. क) किमान 50% आवर्ती खर्च हा केंद्र शासनाच्या ग्रांट इन एड मधून होतो. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? A. अ आणि क B. अ आणि ब C. ब आणि क D. अ, ब आणि क 13 / 20 13. आंध्र प्रदेश मध्ये कोणत्या उच्च शैक्षणिक संस्थांची स्थापना 2014 नंतर झाली ? अ) ट्रायबल विद्यापीठ ब) महात्मा गांधी विद्यापीठ क) केंद्रीय विद्यापीठ ड) एन.आय.टी A. फक्त अ, ब, क B. फक्त अ, क, ड C. फक्त अ, ब, ड D. वरील सर्व 14 / 20 14. भारतामध्ये उच्च शिक्षणासाठी 'एकूण नाव नोंदणी प्रमाणासंबंधी' खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? अ) भारतामध्ये उच्च शिक्षणाचे 'एकूण नाव नोंदणी प्रमाण' 12.4% आहे. ब) 'एकूण नाव नोंदणी प्रमाण' वेगवेगळ्या राज्यात 10 ते 33.7% ते या श्रेणीत आहे. क) उच्च शिक्षणाचे 'एकूण नाव नोंदणी प्रमाण' देशातील विविध धार्मिक समुदायानुसार बदलत जाते. ड) भारतातील उच्च शिक्षणासाठी असलेले एकूण नाव नोंदणी प्रमाण हे जगात सर्वात जास्त आहे. A. वरील सर्व B. ब, क, ड C. अ, ब, क D. अ, ब, क 15 / 20 15. खालील विधानांचा विचार करा. अ) सर्व शिक्षा अभियानाचा उद्देश सामाजिक, प्रांतिक, व लिंग या आधारावर असणाऱ्या अंतराला कमी करणे होय. ब) मुलांबी साध्यामिका व मानसिक क्षमता वाढविणे हे सर्व शिक्षा क) विद्यार्थ्यांना मुल्यधिष्ठीत शिक्षण प्रदान करणे सर्व शिक्षा अभियानाचे उद्देश आहे. ड) 6 ते 18 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण प्रदान करणे सर्व शिक्षा अभियानाचे ध्येय आहे. A. वरील सर्व विधाने बरोबर आहेत. B. अ, ब आणि क विधाने बरोबर आहेत. C. अ, क आणि ड विधाने बरोबर आहेत. D. अ, क आणि ड विधाने बरोबर आहेत. 16 / 20 16. सर्व शिक्षा अभियाना (SSA) संबंधी पुढील विधाने वाचा आणि त्याविषयी चुकीचे विधान पुढील विधानांतून शोधा. A. एस.सी/एस.टी आणि मुस्लिम अल्पसंख्यांक समुदायाशी संबंधित मुली आणि मुले यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. B. या मध्ये ऑटिझम (Autism) आणि रोग निवारक सहकार्य यासंबधी शिक्षकांच्या प्रशिक्षणाचाही समावेश करण्यात आला आहे. C. शिक्षेचा अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीचे हे प्रमुख साधन आहे आणि हा या स्वरूपाचा जगातील सर्वात मोठा उपक्रम आहे. D. हे अभियान राबविण्या मागचा हेतू प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणातील सामाजिक आणि लिंगावर आधारीत दरी कमी करणे हा आहे. 17 / 20 17. मुस्लिम मदरश्यातून दिल्या जाणाऱ्या परंपरागत शिक्षणावर उपाय म्हणून खालील उपायांवर भर दिलेला आहे. अ) विज्ञान, गणित, सामाजिक अध्ययन, हिंदी, इंग्रजी विषय शिकवणे. ब) नवीन शिक्षकांच्या नियुक्तीवर भर देणे. क) नवीन विषय शिकविण्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण ड) विज्ञान, गणित, सामाजिक विज्ञान, हिंदी, इंग्रजी या विषयांना अभ्यासक्रमात समाविष्ट करणे. A. बवक विधान योग्य आहेत. B. वरील सर्व विधाने बरोबर आहेत. C. केवळ अ विधान योग्य आहे. D. केवळ ब विधान योग्य आहे. 18 / 20 18. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये नमूद केल्यानुसार दहा गाभा घटकांमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो ? अ) श्रमप्रतिष्ठा ब) वैज्ञानिक दृष्टिकोण क) स्त्री-पुरुष समानता ड) पर्यावरण संरक्षण A. अ, ब, क B. अ, ब, ड C. ब, क, ड D. अ, क, ड 19 / 20 19. माध्यमिक शिक्षण आयोगाने (मुदलियार आयोग) माध्यमिक शिक्षणविषयक पुढीलप्रमाणे शिफारशी केल्या. अ) तीन वर्षाचे माध्यमिक व चार वर्षाचे उच्च माध्यमिक शिक्षण. ब) अध्यापनाचे माध्यम मातृभाषा अथवा प्रादेशिक भाषा. क) पदवी अभ्यासक्रम तीन वर्षाचा. ड) प्रत्येक राज्यात माध्यमिक शिक्षण मंडळ स्थापन करणे. A. केवळ अ विधान योग्य आहे. B. ब व क विधाने योग्य आहे. C. वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत. D. केवळ क विधान योग्य आहे. 20 / 20 20. विद्यापिठीय शिक्षणाविषयी गुणवत्ता सुधारण्यासाठी कोठारी आयोगाने केलेल्या शिफारशींपैकी महत्त्वपूर्ण शिफारस म्हणजे- अ) ग्रंथ व नियतकालिकांच्या खरेदीवर खर्च वाढवणे. ब) विद्यार्थी कल्याण योजना राबविणे. क) विद्यापीठातील प्रवेश बाहेरील संस्थेमार्फत करणे. ड) विद्यापीठात संशोधन करण्यावर भर. A. वरिलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत. B. केवळ अ, ब, क विधाने बरोबर आहेत. C. केवळ ब, क, ड विधाने बरोबर आहेत. D. केवळ अ, ब, ड विधाने बरोबर आहेत. टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. Your score isThe average score is 22% LinkedIn Facebook 0% Restart quiz