चालू घडामोडी २०२५ पेपर २४ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

22
Created on By MahaBharti Exam Team
chalu ghdamodi

चालू घडामोडी जुलै २०२५ पेपर २४

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

1. भारतीय संविधानातील अधिकृत भाषेसंबंधी पुढीलपैकी दिलेल्या तरतुदींमधून अयोग्य विधान शोधा.
अ) अनुच्छेद 345 नुसार घटकराज्ये त्या राज्यात वापरात असणारी एक अथवा अनेक भाषा किंवा हिंदी त्यांची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारण्यास सक्षम आहेत.
ब) अनुच्छेद 347 संघराज्याला घटकराज्याच्या अधिकृत भाषा ठरवण्याच्या निर्णयामधे हस्तक्षेप करण्यास सक्षम करतो.

2 / 20

2. विभागीय परिषदांसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बिनचूक नाहीत ?
अ) विभागीय परिषदा ह्या घटनात्मक संस्था आहेत.
ब) 1956 च्या राज्यपुनर्रचना कायद्यानुसार त्यांची निर्मिती झाली आहे.
क) केंद्रीय गृहमंत्री हा विभागीय परिषदांचा अध्यक्ष असतो.
ड) भारतात एकूण सात विभागीय परिषदा देशातील एकूण सात विभागांसाठी निर्माण करण्यात आल्या आहेत.

3 / 20

3. भारतीय संघराज्यवादासंबंधी न्यायालयाने लावलेल्या अर्थाबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? (विशेषतः एम.आर. बोमाई वि. भारत सरकार खटल्याच्या संदर्भात)

4 / 20

4. पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?
अ) भारतीय राज्यघटनेचे 42 वे कलम राज्य शासनांना ग्राम पंचायत स्थापन करण्याचे निर्देश देते.
ब) भारतीय राज्यघटनेच्या 247 कलमांतर्गत पंचायत राज व्यवस्था पर्यावरण संरक्षण व प्रदूषण नियंत्रणामध्ये आपली महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे.

5 / 20

5. केंद्रीय दक्षता आयोगासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या.
अ) केंद्र शासनातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी 1964 मध्ये केंद्र सरकारने केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना केली.
ब) सन 2003 पर्यंत दक्षता आयोगाला न घटनात्मक न बिगर घटनात्मक स्वरूप प्राप्त झाले नव्हते.
क) केंद्रीय दक्षता आयोगात केंद्रीय दक्षता आयुक्त हे आयोगाचे अध्यक्ष व तीन पेक्षा अधिक नाही असे दक्षता आयुक्त सदस्य म्हणून कार्यरत असतात.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने गैर लागू आहे/आहेत ?

6 / 20

6. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद क्रमांक 210 नुसार घटकराज्यांतील विधीमंडळांचे कामकाज पुढीलपैकी कोणत्या भाषा/भाषांतून चालवता येते ?
अ) घटकराज्याच्या अधिकृत भाषेमधूनच केवळ
ब) घटकराज्याची अधिकृत भाषा / अधिकृत अनेक भाषा
क)हिंदी
ड)इंग्रजी

7 / 20

7. कोणत्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने 'मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे ही एकमेकांना पुरक आहेत आणि कोणा एकाचा दुसऱ्यासाठी त्याग करण्याची गरज नाही' असा दृष्टीकोण स्विकारला होता ?

8 / 20

8. संसदेच्या कामकाजाच्या भाषेबाबत कोणते विधान खरे नाही ?
अ) संसदेचे कामकाज हिंदीतून चालवण्यात येते.
ब) संसदेचे कामकाज हिंदीतून किंवा इंग्रजीतून चालवण्यात येते.
क) संविधानाच्या प्रारंभी संसदेचे कामकाज हिंदीतून किंवा इंग्रजीतून चालवता येत होते.
ड) सभापती/अध्यक्ष त्यांच्या अनुज्ञेने सदस्य आपल्या मातृभाषेत भाषण करू शकतो.

9 / 20

9. खालीलपैकी कोणता विषय राज्यसूचीमध्ये समाविष्ट नाही.

10 / 20

10. भारतीय संविधानातील अधिकृत भाषेसंबंधीच्या विधानांविषयीचे अयोग्य विधान शोधा :
अ) विविध घटक राज्यांसाठी अधिकृत भाषा भारतीय संविधानाने स्पष्ट केल्या आहेत.
ब) अनुच्छेद 345 नुसार घटक राज्य, त्या राज्यात वापरात असणारी एक अथवा अनेक भाषा किंवा इंग्रजी यांना अधिकृत भाषा म्हणून स्वीकारू शकते.
क) अनुच्छेद 347 नुसार केंद्र शासन अधिकृत भाषा निवडीच्या संदर्भातील घटकराज्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करू शकते.

11 / 20

11. 1993 च्या 'मानवी हक्क संरक्षण' कायद्यामध्ये 2006 सालच्या सुधारणा कायद्याद्वारे झालेल्या दुरुस्त्यांबाबत खालीलपैकी कोणती बरोबर आहे.

12 / 20

12. राष्ट्रीय अनुसूचित जमातीच्या आयोगासंदर्भात खालील विधानांपैकी अचूक विधान/विधाने कोणती ?
अ) हा आयोग 2004 मध्ये अस्तित्वात आला.
ब) अनुसूचित जमातीचे हक्क संरक्षण करण्यासाठी अनुसूचित जमातींचा स्वतंत्र राष्ट्रीय आयोग निर्माण करण्यात आला. 2003 च्या 89 व्या घटना दुरुस्तीनुसार अनुसूचित जाती आणि जमातींसाठीच्या राष्ट्रीय आयोगाचे विभाजन करून ही निर्मिती करण्यात झाली.
क) अनुसूचित जमातींसंदर्भात असलेल्या सर्व महत्त्वाच्या धोरणांसंदर्भात निर्णय घेताना केंद्र व राज्य शासनांना आयोगाचा सल्ला आवश्यक असतो.

13 / 20

13. चौकशी करतांना राज्य माहिती आयोगास खालील बाबींसंबंधी दिवाणी न्यायालयाचे आधिकार असतात.
अ) बोलावणे आणि समक्ष हजर राहण्यास भाग पाडणे.
ब) प्रतिज्ञापत्रावर पुरावे स्विकारणे.
क) कोणत्याही न्यायालयाकडून अथवा कार्यालयाकडून कोणतेही सार्वजनिक कागदपत्र मागविणे.
ड) साक्षीदारांची तपासणी करण्यासाठी समन्स बजावणे.

14 / 20

14. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या कामाबाबत खालील विधानांचा विचार करा.
अ) राज्यसरकारच्या नियंत्रणाखालील कोणत्याही तुरुंगाला किंवा संस्थेला पूर्वसूचना देऊन भेटी देणे.
ब) इलाज, सुधारणा आणि सरंक्षणासाठी डांबून किंवा तात्पुरत्या काळासाठी ठेवलेल्या व्यक्तिच्या परिस्थितीची पाहणी करणे.
क) सहवासियांच्या परिस्थितीचा अभ्यास करणे.
ड) मानवी हक्काच्या क्षेत्रात संशोधन करणे.

15 / 20

15. एस.आर.बोम्मई विरुद्ध भारत सरकार या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासंबंधात खालील विधाने विचारात घ्या.
अ) न्यायालयाने सांगितले की, राष्ट्रपतीने संसदेने मान्यता दिल्यानंतरच राज्य विधानसभा विसर्जित करावी.
ब) जर संसदेने घोषणेला मान्यता दिली नाही तर विधानसभा पुनर्जीवित करण्यात यावी.
क) राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या समर्थनार्थ योग्य ती सुसंबद्ध कारणे आहेत, ती सिद्ध करण्याची जबाबदारी केंद्राची आहे.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

16 / 20

16. स्वातंत्र्योत्तर भारतातील शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींसाठी पुढीलपैकी कोणती कारणे जबाबदार आहेत ?
अ) देशाच्या दुर्गम भागांमध्ये शाळांची उपलब्धता नसणे.
ब) शाळांमध्ये आवश्यक त्या सुविधांचा अभाव
क) इयत्ता चौथीच्या आसपास शाळा सोडण्याचे अतिरिक्त प्रमाण, विशेषतः मुलींमधी
ड) शैक्षणिक दर्जातील घसरण

17 / 20

17. 1992 च्या कायद्यातील तरतुदीनुसार 'राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने' अल्पसंख्यांक म्हणून कोणत्या धार्मिक समुदायास मान्यता दिली ?
अ)मुस्लिम
ब) ख्रिश्चन व पारसी
क) जैन व बौद्ध
ड) सिख व बौद्ध

18 / 20

18. भारतीय राज्यघटनेतील सातव्या परिशिष्टातील राज्य सूचीमध्ये नमूद केलेला/ले कोणता/ते विषय राष्ट्रीय राजधानी दिल्ली शासनाच्या कार्यक्षेत्रातून विशेषत्वाने वगळण्यात आला/ले ?
अ) सार्वजनिक सुरक्षा
क)जमीन
ब) पोलिस
ड) कर

19 / 20

19. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत
अ) डी.सी.वाधवा विरूद्ध राज्य (1987) या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने वटहुकूमाचे प्रख्यापन यावर टिप्पणी केली.
ब) एस.आर. बोम्मई विरूद्ध केंद्र सरकार (1994) या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने कलम 352 चा अर्थ लावला.
क) मिनर्वी मिल्स विरूद्ध केंद्र सरकार (1980) या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की 'मुक्त व निःपक्षपाती निवडणूका' हा घटनेच्या मूलभूत ढाच्याचा भाग आहे.
ाता मुद्दा होता ? रख्य 2018)
ड) केशवानंद भारती विरूद्ध केरळ राज्य (1973) या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने 'मूलभूत ढांचा' ही संकल्पना मांडली.

20 / 20

20. खाली दोन वाक्ये दिली आहेत. त्यापैकी पहिले प्रतिपादन (अ) म्हटले आहे आणि दुसरे कारण (र) म्हटले आहे. दोन्ही वाक्यांचे परीक्षण करा आणि खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडा.
प्रतिपादन अ : नियोजन आयोग ही घटनात्मक संस्था नाही आणि वैधानिक संस्थाही नाही.
कारण र : केंद्रीय कॅबिनेट च्या कार्यकारी ठरावानुसार नियोजन आयोगाची स्थापना झाली आहे.

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 27%

0%


Available for Amazon Prime