चालू घडामोडी २०२५ पेपर २३ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! July 21, 2025 by User User 38 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on July 21, 2025 By MahaBharti Exam Team चालू घडामोडी जुलै २०२५ पेपर २३ सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 20 1. 1996 आणि 2006 मध्ये भारतासाठी लिंगसंबंधित विकास निर्देशांकाचे परिगणन केले होते. दोन्ही वर्षांमधे सर्वाधिक दर असलेली केवळ तीनच राज्ये / केंद्रशासित प्रदेश होते. ही राज्य /केंद्रशासित प्रदेश कोणते ? A. केरळ, चंदिगड आणि गोवा B. चंदिगड, दिल्ली आणि महाराष्ट्र C. गोवा, केरळ आणि आंध्र प्रदेश D. दिल्ली, गोवा आणि कर्नाटक 2 / 20 2. भारतीय संविधानातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या विकासासाठी खालीलपैकी कोणत्या घटनात्मक तरतूदी करण्यात आल्या आहेत ? अ) लोकसभा आणि विधानसभेत राखीव जागेची तरतूद. ब) राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये राखीव जागेची तरतूद. क) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती करिता विशेष आयोगांची राष्ट्रपतीद्वारे नेमणूक करण्याची तरतूद. ड) गृह निर्माण योजनेची तरतूद. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? A. अ, ब आणि क B. अ, ब आणि ड C. अ आणि ब फक्त D. अ फक्त 3 / 20 3. भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला 'A' दर्जाचे प्रमाणपत्र देणाऱ्या जगभरातील राष्ट्रीय मानवी हक्क संस्थांची संघटना मध्ये स्थापन झाली. सुरवातीला तिला राष्ट्रीय मानवी हक्क संस्थांची आंतरराष्ट्रीय समन्वय समिती' असे संबोधले जात होते. A. 1995 B. 2001 C. 1993 D. 2005 4 / 20 4. वित्त आयोगाबाबतचे योग्य विधाने : अ) भारतीय आर्थिक संघराज्यवादाचे समतोल साध्य करण्यासाठीचे कार्य करणारे साधन. ब) एक चेअरमन आणि इतर तीन सदस्यांचा समावेश असलेला आयोग. क) आयोगाच्या सदस्यांची पात्रता राष्ट्रपतींकडून ठरविली जाते. ड) कलम 280 च्या तरतुदीनुसार निर्मिती. A. अ आणि ड B. अ, ब आणि क C. ब, क आणि ड D. ब आणि क 5 / 20 5. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती काही व्यक्तिंच्या समितीच्या शिफारसीवरून राष्ट्रपतीद्वारा केली जाते ? खालीलपैकी कोण या समितीचा भाग (सदस्य) असत नाही ? अ) पंतप्रधान ब) गृहमंत्री क) लोकसभेतील विरोधी पक्ष नेता ड) राज्यसभेतील विरोधी पक्ष नेता ई) लोकसभेचा सभापती फ) राज्यसभेचा अध्यक्ष A. फक्त फ B. फक्त ब C. फक्त ब आणि ड D. फक्त ई आणि फ 6 / 20 6. पुढीलपैकी अयोग्य विधान शोधा. अ) मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही वैधानिक संस्था आहे. ब) हा आयोग गृह खात्या अंतर्गत काम करतो. क) ह्या आयोगाला इतर मागासवर्गातील व्यक्तींच्या तक्रारीमध्ये लक्ष देऊन सोडवण्यासाठीचे अधिकार देण्याएवढे सक्षम करण्यात आलेले नाही. ड) या आयोगाची स्थापन 1990 साली झाली. A. ब, ड B. ब, क C. क, ड D. अ,ब,क 7 / 20 7. खालील विधाने विचारात घ्या. अ) राज्य मानवी हक्क आयोग केवळ राज्यसूचीतील विषयाबाबतच्या मानवी हक्क उल्लंघनांची चौकशी करू शकतो. ब) राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक आणि पदच्युती राज्यपाल करतो. A. विधान ब बरोबर अ चुकीचे आहे. B. दोन्ही विधाने बरोबर आहेत. C. दोन्ही विधाने चुकीची आहेत. D. विधान अ बरोबर ब चुकीचे आहे. 8 / 20 8. खालीलपैकी कोण ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका घेत नाहीत ? अ) भारत निर्वाचन आयोग ब) घटक राज्य शासन क) राज्य निवडणूक आयोग ड) केंद्रशासन A. अ, ब, क पर्याय योग्य आहेत. B. अ आणि ड पर्याय योग्य आहेत. C. अ, ब आणि ड पर्याय योग्य आहेत. D. ब आणि ड पर्याय योग्य आहेत. 9 / 20 9. घारतीय राष्ट्रीय महिला आयोगाने विविध कक्षांची स्थापना केली आहे. पुढीलपैकी कोणते कक्ष आयोगाने स्थापन केलेले आहेत? अ) अनिवासी भारतीय कस ब) ईशान्य भारत कस क) पश्चिम भारत कस ड) महिला सुरक्षा कक्ष इ) महिला कल्याण कस A. ब. ड B. अ, ब,ड, इ C. अ. क. ड D. अ, ब, क, ड र 10 / 20 10. खालील विधाने विचारात घ्या. अ) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. ब) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांना गैरवर्तनाच्या कारणावरून पंतप्रधान बडतर्फ करू शकतात. क) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा 62 वर्षे जे आधी असेल तो निर्धारित केलेला आहे. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ? A. ब आणि क B. फक्त क C. फक्त अ D. अ आणि ब 11 / 20 11. 'राष्ट्रीय विकास परिषदेत' पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश असतो ? अ) पंतप्रधान ब) अध्यक्ष, वित्त आयोग क) केंद्रीय कॅबीनेट मंत्री ड) राज्यांचे मुख्यमंत्री A. फक्त अ आणि क B. फक्त ब आणि क C. फक्त अ, क आणि ड D. फक्त ब आणि ड 12 / 20 12. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा विषयी पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? अ) ती एक वैधानिक यंत्रणा आहे. ४) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद क्रमांक 315 अंतर्गत तिची स्थापना करण्यात आली आहे. क) यांमध्ये एक अध्यक्ष आणि पाच सदस्य यांचा समावेश होतो. ड) सरकारी कर्मचाऱ्यांना कौटुंबिक निवृत्ती वेतन, अपघात/इजा संबंधीचे दावे याविषयी सरकारला हा आयोग सल्ला देतो. A. अ, ब, क B. अ, ब, क, ड C. ब. क D. ब, क, ड 13 / 20 13. अनुसूचित जातींसाठीच्या राष्ट्रीय आयोगाची कार्ये कोणती आहेत ? अ) अनुसूचित जातींसाठीच्या कायदेशीर सुरक्षा उपायांशी संबंधित सर्व बाबींची तपासणी व परीक्षण करणे. ब) संसदेला अहवाल सादर करणे. क) अनुसूचित जातींच्या सामाजिक व आर्थिक विकासाच्या नियोजन प्रक्रियेत सल्ला देणे. A. वरीलपैकी सर्व B. अ, क C. ब, क D. अ, ब 14 / 20 14. भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? A. निर्वाचन आयोग हा मुख्य निवडणूक आयुक्त आणि आणखी दोन निवडणूक आयुक्त यांनी मिळून बनलेला असेल. B. यापैकी एकही नाही. C. निर्वाचन आयोग हा मुख्य निवडणूक आयुक्त आणि संसद वेळोवेळी निश्चित करील तेवढ्या संख्येचे अन्य निवडणूक आयुक्त यांचा मिळून बनलेला असेल. D. निर्वाचन आयोग हा मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती वेळोवेळी निश्चित करतील तेवढ्या संख्येचे अन्य निवडणूक आयुक्त यांचा मिळून बनलेला असेल. 15 / 20 15. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या बाबतीत अचूक उत्तरे निवडा. अ) केंद्रीय लोकसेवा आयोगाचा सदस्य पद सोडल्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदासाठी पात्र असतो. ब) केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष ए. आर. किडवई यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती 1979 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरली. क) अनुपस्थितीमुळे किंवा इतर काही कारणांमुळे अध्यक्ष कामे करण्यास अक्षम असतो तेव्हा राष्ट्रपती UPSC च्या एका सदस्याला हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त करू शकतो. ड) UPSC ने निवड केल्याने उमेदवाराचा त्या पदावर अधिकार निर्माण होतो. A. वरील सर्व B. अ, ब, आणि क C. ब आणि क D. अ आणि ड 16 / 20 16. भारताच्या निवडणूक आयोगासंदर्भात दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? A. यापैकी नाही. B. त्यांचा कालावधी सहा वर्षाचा असतो किंवा वयाच्या 65 वर्षांपर्यंत असतो यातील जो अगोदर पूर्ण होईल तो. C. मुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. D. हा आयोग एक मुख्य निवडणूक आयुक्त व 3 निवडणूक आयुक्त मिळून बनलेला आहे. 17 / 20 17. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? अ) निती आयोगात निती (NITI) म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफार्मिंग इंडिया. ब) 1 जानेवारी 2015 रोजी त्याची स्थापना झाली. क) पंतप्रधान या निती आयोगाचे अध्यक्ष असतात. A. कोणतेही नाही B. अ C. ब D. क 18 / 20 18. भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ? A. जर एखाद्या बाबतीत मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर निर्वाचन आयुक्त यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले तर त्या बाबींचा निर्णय बहुमताने घेतला जातो. B. मुख्य निर्वाचन आयुक्त हे केवळ समानातील प्रमुख आहेत. C. केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षितता आहे, पंरतू इतर निर्वाचन आयुक्तांना तशी सुरक्षितता नाही. D. मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान अथवा दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश समान आहे. 19 / 20 19. वित्त आयोगासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. अ) भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 280 हे वित्त आयोगास निम-न्यायालयीन दर्जा प्रदान करते. ब) आयोगाच्या सदस्यांची नेमणूक पंतप्रधानाच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाद्वारे केली जाते. क) आयोगाचे सदस्य पुनर्नेमणूकीसाठी पात्र असतात. ड) त्यात एक अध्यक्ष आणि अन्य दोन सदस्य असतात. A. क आणि ड B. अ आणि क C. ब आणि क D. अ आणि ब 20 / 20 20. खालील विधाने विचारात घ्या: अ) राज्य निवडणुक आयोगाच्या स्वातंत्रतेची ग्वाही देण्यासाठी असे निश्चित करण्यात आले आहे की ज्या आधारावर आणि पद्धतीने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदाबरून दूर केले जाते त्याच आधारावर आणि पद्धतीने राज्य निवडणुक आयुक्तांनाही पदावरून दूर केले जाईल. ब) अनुच्छेद 329 अंतर्गत, मतदार संघाच्या परिसीमा निश्चिती अथवा जागांचे वाटप या संबंधित अनुच्छेद 243-K अन्वये तयार करण्यात आलेल्या कोणत्याही कायद्याची वैधानिकता तपासण्याचा अधिकार उच्च न्यायालयांना आहे. A. दोन्हीही विधाने चुकीची आहेत. B. विधान अ बरोबर आहे. C. दोन्हीही विधाने बरोबर आहेत. D. विधान ब बरोबर आहे. टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. Your score isThe average score is 24% LinkedIn Facebook 0% Restart quiz