चालू घडामोडी २०२५ पेपर १९ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! 7 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on July 02, 2025 By MahaBharti Exam Team चालू घडामोडी जुलै २०२५ पेपर १९ सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 20 1. मुख्यमंत्र्यांची भूमिका आणि कार्ये याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ? A. राज्यपाल राज्याच्या प्रशासनासंबंधी अथवा विधिनियमाच्चा प्रस्तावासंबंधी जी माहिती मागवतील ती ते देतात. B. एखाद्या मंत्र्यास राजीनामा देण्यास सांगू शकतात अथवा ते त्या मंत्र्यास बडतर्फ करू शकतात. C. घटनात्मकदृष्ट्या विधिमंडळ सदस्य नसणाऱ्यास मुख्यमंत्री बनण्यात कोणताही अडथळा नाही. D. ते राज्याचे मंत्री आणि राज्यपाल यामधील संपर्काचा एकमेव पाएं म्हणून कार्यरत असतात. 2 / 20 2. महाराष्ट्राच्या राज्यापालाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? A. त्यांना राज्यघटनेच्या अनुच्छेद 371 (2) अन्वये विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आली आहे. B. ते अँग्लो इंडियन जमातीमधील किमान दोघास विधान सभेवर नामनिर्देशित करु शकतात. C. ते राज्यघटनेच्या अनुच्छेद 31 A खाली सक्तीने खाजगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधांचे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकत नाहीत. D. ते अँग्लो इंडियन जमातीमधील एकास विधान परिषदेवर नामनिर्देशित करु शकतात. 3 / 20 3. अ) या पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये संसदेच्या दीन्हें सभागृहांच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो. ब) ते राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावर राहू शकतात. क) या पदाच्या निवडणुकीसाठी किमान 20 मतदार हे प्रस्तावक आणि 20 मतदार हे अनुमोदक असणे आवश्यक असते. पर्यायी उत्तरे A. यापैकी एकही नाही B. ब C. अ D. क 4 / 20 4. कोणता देश हा भारताच्या सागरी उत्पादनांची सर्वात मोठी बाजारपेठ आहे? A. अमेरिका B. चीन C. युक्रेन D. रशिया 5 / 20 5. मुंबईमध्ये नोंदणी झालेल्या मतदाराला आसाम मधील लोकसभा माता संघामधून निवडणूक लढविता येते का? अ) त्याला निवडणुक लढविता येणार नाही. ब) मालाममधील त्याच मतदारसंघामध्ये त्याचा जन्म झाला असेल तर ती निवडणूक लढविता येईल. A. अ हे बरोबर उत्तर आहे. B. क हे बरोबर उत्तर आहे. C. ब हे बरोबर उत्तर आहे. D. वरीलपैकी कोणतेही उत्तर बरोबर नाही. 6 / 20 6. लोकसभेच्या विसर्जनाचे परिणाम : अ) लोकसभेमध्ये प्रलंबित असलेली सर्व विधेयके रद्द होतात. ब) लोकसभेने मंजूर केलेली परंतु राज्यसभेत अनिर्णिय अवस्थेत प्रलंबित असलेली विधेयके रद्द होतात. क) राष्ट्रपतीने पुनर्विचारासाठी परत पाठविलेली विधेयके रद होतात. ड) प्रलंबित आश्वासने रद्द होत नाहीत आणि ते नवीन लोकसभेच्या शासकीय आश्वासन समितीद्वारे विबाराधीन राहतात. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ? A. अ आणि ब B. अ, ब आणि क C. अ, ब आणि ड D. अ, क आणि ड 7 / 20 7. एप्रिल मध्ये भारताची सागरी अन्न निर्यात १७.१ टक्के वाढून किती अब्ज डॉलर झाली आहे? A. ०.५६ B. ०.५८ C. ०.५७ D. ०.५९ 8 / 20 8. भू-संसाधन खाते हे भारत सरकारच्या......भाग आहे. A. ग्रामीण विकास मंत्रालयाचा B. खाण मंत्रालयाचा C. पंचायती राज मंत्रालयाचा D. कृषि मंत्रालयाचा 9 / 20 9. योग्य कथन/कथने ओळखा. अ) सभागृहातील संबंधित खात्याचे मंत्री ज्या प्रश्नांना लेखी उत्तरे देतात, त्याला 'तारांकित प्रश्न' म्हणतात. च) स्थगन प्रस्तावाला 'निंदा व्यंजक ठराव' असेही म्हटले जाते. A. कथन अ चुकीचे, ब बरोबर B. कथन अ बरोबर, ब चुकीचे C. कथन अ व ब दोन्ही बरोबर D. कथन अ व दोन्ही चुकीचे 10 / 20 10. विधान अ): भारतात राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात. विधान ब): राज्यसभा लोकांपेक्षा राज्यांचे प्रतिनिधित्व करते. A. अ बरोबर आहे पण ब चूक आहे. B. अ चूक आहे पण ब बरोबर आहे. C. अ आणि ब बरोबर आहेत. ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण आहे. D. अ आणि ब बरोबर आहेत. पण ब हे अ चे स्पष्टीकरण नाही. 11 / 20 11. खालील विधाने विचारात घ्या: अ) अधिकृत विरोधी पक्ष व विरोधी पक्ष नेता यांना सर्वप्रथम 1977 मध्ये मान्यता देण्यात आली. ब) राज्यसभेच्या नेत्याची नेमणूक राज्यसभेच्या अध्यक्षाकडून होते. क) लोकसभा व राज्यसभेतील विरोधी पक्ष नेत्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला जातो. वरीलपैकी कोणते /कोणती विधाने बरोबर आहे/आहेत? A. अ आणि ब B. क फक्त C. ब आणि क D. अ फक्त 12 / 20 12. भारताची सागरी अन्न निर्यात किती देशांत विस्तार पावली आहे? A. १७५ B. १४५ C. १३० D. १५० 13 / 20 13. खालील विधाने विचारात घा. अ) सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशाने आपली कर्तव्ये पार पाडतांना केलेल्या वर्तणूकीबाबत राज्याच्या विधिमंडळात कोणतीही चर्चा करता येणार नाही. ब) विधिमंडळाच्या कार्यपद्धतीत एखादी तथाकथित नियमबाह्य गोष्ट पडली आहे या कारणास्तव राज्य विधिमंडळातील कोणत्याही कामकाजाच्या वैधानिकतेवर आक्षेप घेतला जाऊ शकतो. A. विधान ब बरोबर B. दोन्हीही विधाने बरोबर C. दोन्हीही विधाने चुकीची D. विधान अ बरोबर 14 / 20 14. पुढीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये यांच्या न्यायिक पुनर्विलोकांच्या अधिकारावर मर्यांदा घातली गेली ? A. 24 व्या B. 44 व्या C. 26 व्या D. 42 व्या 15 / 20 15. लक्षवेधी सूचनेच्या संदर्भात ...... ही योग्य विधान/ने आहेत. अ) निकडीच्या सार्वजनिक हिताच्या बाबीकडे मंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठीचा हा एक उपाय आहे. ब) ती मांडण्यासाठी 50 सदस्यांचे समर्थन आवश्यक असते. क) राज्यसभेला हा उपाय वापरण्याची परवानगी नसते. ड) 1952 पासून सुरू असलेली संसदीय प्रणालीतील नावीन्यपूर्ण पद्धती आहे. A. अ आणि ड B. अ फक्त C. ड फक्त D. अ, ब, क 16 / 20 16. ३१ मार्च २०२५ ला संपलेल्या वित्त वर्षात भारताने किती लाख मेट्रिक टन सागरी उत्पादनाची निर्यात केली आहे? A. १७.७७ B. १६.७० C. १८.८८ D. १६.८५ 17 / 20 17. राज्याच्या महाधिवक्त्याविषयी खालीलपैकी योग्य विधान/विधाने निवडा. अ) राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपालामार्फत केली जाते. ब) ते राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. क) त्यांना विधीमंडळ सदस्याप्रमाणे विशेषाधिकार व संरक्षण प्राप्त असते. ड) ते राज्य सरकारचे पूर्ण वेळ वकील नसतात. A. वरील सर्व B. अ, ब, क C. ब, क, ड D. अ, ब, ड 18 / 20 18. राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकारासंबंधी प्रतिपादित केलेल्या पुढील विधानांतील अयोग्य विधान कोणते? A. राष्ट्रपती या अधिकाराचा वापर मंत्रीपरिषदेच्या सल्ल्यानेच करतात B. घटनेच्या अनुच्छेद क्र. 72 नुसार या अधिकाराचा वापर करताना विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे मांडण्याची गरज. C. राष्ट्रपतींच्या या अधिकाराच्या वापराचे न्यायालयीन पुनर्विलोकन करता येत नाही. D. कोर्ट मार्शलद्वारा देण्यात आलेल्या शिक्षेस हा अधिकार लागू पडत नाही. 19 / 20 19. मंत्री परिषदेसंबंधी खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? A. अनुच्छेद 163 मध्ये नमूद केलेले आहे की, राज्यपालास सहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी एक मंत्रीपरिषद असेल. B. जरी विधानसभेचे विसर्जन झालेले असले तरीही राज्यपालास सल्ला देण्यासाठी नेहमीच मंत्रीपरिषद असेल. C. अनुच्छेद 164 अन्वये मंत्रीपरिषद ही सामुदायिकपणे विधानसभेस जबाबदार असेल आणि व्यक्तिगतरित्या मुख्यमंत्र्यास जबाबदार असेल. D. राज्यघटनेने औपचारिकरित्या असे कोणतेही अधिकार मंत्रीपरिषदेला दिलेले नाहीत. 20 / 20 20. महाधिवक्ता यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? A. मंत्रिमंडळाची इच्छा असेपर्यंत ते आपल्या पदावर राहतात. B. भारतातील कोणत्याही न्यायालयात सुनावणीचा त्यास अधिकार आहे. C. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हता प्राप्त असेल अशा व्यक्तीस नेमात येईल. D. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाचा विचार घेवून राज्यपाल नियुक्ती करतात. टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. Your score isThe average score is 29% LinkedIn Facebook 0% Restart quiz