Changes in NMMS Exam 2023
‘एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षेत बदल
Changes in NMMS Exam 2023– State Examination Council Commissioner Shailaja Darade informed about the application process of NMMS examination through a press release. The admit cards for the examination are available from October 10 through the website https://www.mscepune.in/ and https://nmmsmsce.in. Students of class VIII can take this exam. The objective of the scheme is to identify the bright students from economically weaker sections and provide financial support to them to get the best education, prevent students from dropping out of higher education due to economic weakness. This year Major Changes has been done by NMMS, In it, the income limit of the parents has been increased from one and a half lakh rupees to three and a half lakh rupees and the students who are eligible for the scholarship will get a scholarship of one thousand rupees per month for five years instead of four and twelve thousand rupees per year. Know More details about Changes in NMMS Exam 2023 at below
NMMS Scholarship Exam Pattern And Syllabus 2022-23
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) १८ डिसेंबर रोजी होणार आहे. यंदा या परीक्षेत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:
त्यात पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा दीड लाख रुपयांवरून साडेतीन लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली असून शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना चारऐवजी पाच वर्षे दरमहा एक हजार या प्रमाणे दर वर्षी बारा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळेल.
राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी एनएमएमएस परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेची माहिती प्रसिद्धपत्रकाद्वारे दिली. परीक्षेचे प्रवेश अर्ज १० ऑक्टोबरपासून https://www.mscepune.in/ आणि https://nmmsmsce.in या संकेतस्थळाद्वारे उपलब्ध करण्यात आले आहेत. आठवीतील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. आर्थिक दुर्बल घटकांतील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे, आर्थिक दुर्बलतेमुळे विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणातील गळती रोखणे या योजनेचे उद्दिष्ट आहे. विनाअनुदानित शाळा, केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, सैनिकी शाळा आदी शाळांतील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते.
विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी ३१ ऑक्टोबपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येईल. ५ नोव्हेंबपर्यंत विलंब प्रवेश अर्ज, तर १० नोव्हेंबपर्यंत अतिविलंब प्रवेश अर्ज भरता येईल. परीक्षेत बौद्धिक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणी हे दोन पेपर असतील. यंदा या परीक्षेतील पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा आणि शिष्यवृत्तीचा कालावधी वाढल्याने विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढण्याची अपेक्षा आहे.