JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

BMC Head Clerk Promotion Exam Syllabus | बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्य लिपिक परीक्षा 2026; सविस्तर सिलेबस आणि Exam Pattern जाहीर

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

BMC Head Clerk Promotion Exam Pattern and Syllabus 2026

BMC Head Clerk Promotion Exam Syllabus: बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सामान्य प्रशासन विभागामार्फत “मुख्य लिपिक (अर्हताधारक)” संवर्गातील रिक्त पदे पदोन्नतीने खात्यांतर्गत परीक्षा घेऊन भरण्यासाठी विहित अर्हता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनाम लिपिक) व तत्सम संवर्गातील कर्मचा-यांकडून दि. १६.०९.२०२६ ते ०६.१०.२०२६ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यातआले आहे. मुख्य लिपिक (अर्हताधारक) पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार असून परीक्षेत एकूण 100 प्रश्न आणि 100 गुण असतील. परीक्षेसाठी 100 मिनिटांचा कालावधी देण्यात येईल. अभ्यासक्रमात महानगरपालिका प्रशासन नियमावली व कार्यपद्धती, मराठी भाषा व्याकरण, इंग्रजी भाषा व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांचा समावेश आहे. महानगरपालिका प्रशासन नियमावली व कार्यपद्धती या विभागासाठी 70 प्रश्न, तर मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञानासाठी अनुक्रमे 10, 10 आणि 10 प्रश्न असतील. परीक्षेत नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नसून, विभाग ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ या प्रत्येक विभागात किमान 50 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. इंग्रजी व्याकरणाची परीक्षा इंग्रजी भाषेतून, तर इतर विषयांची परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येईल. ही परीक्षा केवळ पात्रता परीक्षा असून परीक्षेतील गुणांच्या आधारे अंतिम निकाल तयार करण्यात येईल. अधिक माहिती तुम्ही खाली तपासू शकता .

मुख्य लिपिक पदोन्नती परीक्षा 2026 – BMC Head Clerk Promotion Exam Pattern

मुख्य लिपिक (अर्हताधारक) पदासाठी पात्र कर्मचाऱ्यांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑनलाइन परीक्षा संगणकावर घेण्यात येणार आहे. परिपत्रकानुसार परीक्षेचा एकूण कालावधी 100 मिनिटे असून प्रश्नपत्रिकेसाठी एकूण 100 गुण असतील.

मुख्य लिपिक परीक्षा पॅटर्न

विभागविषयप्रश्नसंख्याएकूण गुणउत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुण
अमहानगरपालिका प्रशासन नियमावली आणि कार्यपद्धती707035
बमराठी भाषा व्याकरण10105
बइंग्रजी भाषा व्याकरण10105
कसामान्य ज्ञान10105
एकूणएकूण10010050

मुख्य लिपिक परीक्षा कालावधी

संपूर्ण 100 प्रश्नांची परीक्षा सोडविण्यासाठी परीक्षार्थींना 100 मिनिटांचा कालावधी देण्यात येईल. परीक्षार्थी या 100 मिनिटांच्या कालावधीत कोणत्याही विभागातील प्रश्न सोडवू शकतात.

मुख्य लिपिक पदोन्नती परीक्षा – अभ्यासक्रम ।  BMC Head Clerk Promotion Exam Syllabus

विभाग ‘अ’ – महानगरपालिका प्रशासन नियमावली आणि कार्यपद्धती

या विभागासाठी एकूण 70 प्रश्न असून त्यांना 70 गुण असतील. या विभागात खालील विषयांचा समावेश आहे:

  1. मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888
  2. मुंबई महानगरपालिका (सेवा) नियम, 1989
  3. मुंबई महानगरपालिका निवृत्ती वेतन नियम, 1953
  4. भविष्य निधि अधिनियम, 1925
  5. बृहन्मुंबई महानगरपालिका सेवा (वर्तणूक) नियम, 1999
  6. जल आकार नियम
  7. खात्यांतर्गत चौकशीचे मॅन्युअल
  8. प्रमुख अधिकारी (चौकशी) यांचे मॅन्युअल
  9. वेतन प्रदान अधिनियम, 1936
  10. कामगार भरपाई अधिनियम, 1923
  11. किमान वेतन अधिनियम, 1948
  12. उपदान प्रदान अधिनियम, 1972
  13. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005
  14. वेळोवेळी जारी करण्यात आलेली कार्यालयीन परिपत्रके

विभाग ‘ब’ – मराठी भाषा व्याकरण

प्रश्नसंख्या: 10   |
एकूण गुण: 10   |
उत्तीर्ण गुण: 5

मराठी भाषा व्याकरण या विषयाची प्रश्नपत्रिका उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता 12वी) स्तराच्या समकक्ष राहील.

विभाग ‘ब’ – इंग्रजी भाषा व्याकरण

प्रश्नसंख्या: 10   |
एकूण गुण: 10   |
उत्तीर्ण गुण: 5

इंग्रजी भाषा व्याकरण या विषयाची प्रश्नपत्रिका देखील उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता 12वी) स्तराच्या समकक्ष राहील. या विषयाची परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल.

विभाग ‘क’ – सामान्य ज्ञान

सामान्य ज्ञान विभागासाठी एकूण 10 प्रश्न असून त्यासाठी 10 गुण असतील. या विभागात प्रामुख्याने खालील विषयांचा समावेश आहे:

  • जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969
  • इतर सामान्य ज्ञान

मुख्य लिपिक परीक्षा – महत्त्वाचे नियम

  • परीक्षा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ (MCQ) ऑनलाइन स्वरूपात संगणकावर घेण्यात येईल.
  • परीक्षेचा एकूण कालावधी 100 मिनिटे असेल.
  • प्रश्नपत्रिकेत एकूण 100 प्रश्न असून एकूण 100 गुण असतील.
  • परीक्षेत नकारात्मक गुणपद्धती (Negative Marking) लागू नाही.
  • विभाग ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ या प्रत्येक विभागात किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे.
  • यापूर्वीच्या परीक्षेत मिळालेली कोणतीही सूट विचारात घेतली जाणार नाही.
  • सर्व परीक्षार्थींना संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडविणे अनिवार्य राहील.
  • इंग्रजी भाषा व्याकरणाची परीक्षा इंग्रजी भाषेतून घेतली जाईल.
  • इंग्रजी वगळता इतर विषयांची परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येईल.
  • 100 मिनिटांच्या कालावधीत परीक्षार्थी आपल्या सोयीनुसार कोणत्याही विभागातील प्रश्न सोडवू शकतात.

मुख्य लिपिक परीक्षा – निवड प्रक्रिया

मुख्य लिपिक (अर्हताधारक) संवर्गातील पदासाठी विहित अर्हता, अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे बाह्य संस्थेमार्फत अंतिम निकाल तयार करण्यात येईल. ही परीक्षा केवळ पात्रता परीक्षा (Qualifying Examination) म्हणून घेतली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी प्रत्येक विभागात किमान निर्धारित गुण मिळवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

मुख्य लिपिक परीक्षा 2026 – थोडक्यात

परीक्षेचे स्वरूपतपशील
परीक्षेचा प्रकारऑनलाइन बहुपर्यायी वस्तुनिष्ठ परीक्षा
एकूण प्रश्न100
एकूण गुण100
परीक्षा कालावधी100 मिनिटे
नकारात्मक गुणांकननाही
विभागनिहाय पात्रताप्रत्येक विभागात किमान 50%
परीक्षेचा उद्देशकेवळ पात्रता परीक्षा
इंग्रजी व्याकरणाचे माध्यमइंग्रजी
इतर विषयांचे माध्यममराठी

Table of Contents