BMC Agnishamak Physical Exam Details – फायरमन शारीरिक परीक्षा माहिती

BMC Agnishamak Physical Exam Details

शारीरिक व मैदानी चाचणी संपूर्ण माहिती जाणून घ्या

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

BMC Agnishamak Physical Exam Details Brihan Mumbai Municipal Corporation (BMC) Fireman Exam Notification 2023 has been Out !! BMC is going to conudct Physical Exam For Fireman and Interview. This One is the Big Recruitment in Maharashtra State. Those acndidates who are serching for Fireman Physical Exam Details 2022 can check all detail information here like What will be the Physical Criteria for BMC BMC Agnishamak Physical Exam ? What will be Qualifying criteria For MCGMC Fire Brigade Department Exam 2022-23? Check each and every details and dont’ forget to Follow MahaBharti.in/exam for More exam Update related to BMC Agnishamak Physical Exam Details :

BMC Fireman Physical Exam Details

Applicants need to pass Fire Department Physical Fitness Test in order to get Fireman Post in Brihan Mumbai Mahanagarpalika Exam. Those who fail in the BMC  Fireman  Physical Fitness Test shall not proceed to the further recruitment Process. So read each details carefully before proceeding :

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) फायरमन परीक्षेची अधिसूचना २०२३ प्रसिद्ध झाली आहे !! BMC फायरमन आणि मुलाखतीसाठी शारीरिक परीक्षा घेणार आहे. ही महाराष्ट्र राज्यातील मोठी भरती आहे. जे उमेदवार फायरमन शारीरिक परीक्षा 2022 चे तपशील शोधत आहेत ते येथे सर्व तपशीलवार माहिती तपासू शकतात जसे की BMC BMC अग्निशमक शारीरिक परीक्षेसाठी शारीरिक निकष काय असतील? MCGMC फायर ब्रिगेड विभाग परीक्षा 2022-23 साठी पात्रता निकष काय असतील? प्रत्येक तपशील तपासा आणि बीएमसी अग्निशमक शारीरिक परीक्षेच्या तपशीलांशी संबंधित अधिक परीक्षा अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करायला विसरू नका:

बृहन मुंबई महानगरपालिका परीक्षेत फायरमन पद मिळविण्यासाठी अर्जदारांना अग्निशमन विभागाची शारीरिक तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. जे बीएमसी फायरमन शारीरिक तंदुरुस्ती चाचणीत अनुत्तीर्ण होतात त्यांना पुढील भरती प्रक्रियेत पुढे जाता येणार नाही. म्हणून पुढे जाण्यापूर्वी प्रत्येक तपशील काळजीपूर्वक वाचा:

BMC Fireman Selection Process 2023

  1. उच्च गुणवत्ताधारक मागासप्रवर्गाच्या उमेदवारांची खुला पदांवर नेमणूक करण्यात येईल.
  2. निवड झालेल्या उमेदवारांमधून रिक्त असलेल्या पदांच्या उपलब्धतेनुसार अग्निशमन शल्य चिकित्सक यांच्याकडे वैदयकीय तपासणीस पाठविण्यात येईल. वैदयकीय तपासणीत पात्र झालेल्या उमेदवारांना मुंबई अग्निशमन दलाच्या प्रशिक्षण केंद्रावर, मुंबई अग्निशमन दलाच्या पाठयक्रमानुसार 6 महिन्यांचे प्रशिक्षण प्रशिक्षणाच्या नियमावलीनुसार देण्यात येईल. प्रशिक्षणादरम्यान अग्निशामक उमेदवारास दरमहा रु. 3000/- (रुपये तीन हजार फक्त) इतके पाठयवेतन देण्यात येईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचा-यांची सदर पदासाठी निवड झाल्यास तो ज्या खात्यात कार्यरत होता त्या खात्यामार्फत प्रशिक्षण कालावधीसाठी त्याचे वेतन काढण्यात येईल.
  3. प्रशिक्षण कालावधीमध्ये तीन चाचणी परिक्षा व अंतिम मैदानी व लेखी परिक्षा घेण्यात येईल. एकत्रित सर्व परिक्षा मिळून सरासरी 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अनुत्तीर्ण झाल्यास शेवटची संधी म्हणून प्रशिक्षण कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविण्यात येईल व वाढीव प्रशिक्षण कालावधीत घेण्यात येणा-या एक चाचणी व अंतिम लेखी व मैदानी परिक्षेत एकत्रित 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे अन्यथा सदर उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल व पुन्हा संधी दिली जाणार नाही. प्रशिक्षण वाढविण्यात आलेल्या उमेदवाराला त्याच्या वाढीव प्रशिक्षण कालावधीत कोणतेही पाठयवेतन देण्यात येणार नाही व त्यांना वाढीव प्रशिक्षण विनापाठयवेतन करावे लागेल.
  4. भरतीच्या निवडीच्या वेळची गुणवत्ता / निवड यादीत प्राप्त केलेले गुण 50 टक्के व प्रशिक्षण कालावधीत प्राप्त केलेले गुण 50 टक्के ( गुणांची बेरीज करुन ) यासह सेवाज्येष्ठता तयार करुन उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल. तसेच त्यांचे आरक्षण भरतीच्या गुणवत्ता यादीतील आरक्षणानुसारच राहील.
  5. शारिरीक मानके, शैक्षणिक अर्हतांचे निकष व भरती प्रक्रियेतील विविध चाचण्या पूर्ण करणा-या उमेदवारांचीच (पात्र उमेदवारांची ) कार्यालयीन नोंद ठेवण्यात येईल व भरती प्रक्रियेत अपात्र ठरणा-या उमेदवारांची कोणत्याही प्रकारची नोंद ठेवण्यात येणार नाही.
  6. अग्निशामक पदाच्या भरती प्रक्रीयेत पात्र होण्यासाठी मैदानी चाचणीत किमान 50 टक्के गुण (म्हणजेच 120 गुणांपैकी किमान 60 गुण) प्राप्त करणे आवश्यक आहे. मैदानी चाचणीत 50 टक्क्यांपेक्षा कमी गुण प्राप्त करणारे उमेदवार भरतीसाठी अपात्र होतील.

BMC Agnishamak Exam Criteria 

  1. अग्निशामक पदाच्या भरती प्रक्रीयेत पात्र होण्यासाठी मैदानी चाचणीत किमान 50 टक्के गुण (म्हणजेच 120 गुणांपैकी किमान 60 गुण) प्राप्त करणे आवश्यक आहे. मैदानी चाचणीत 50 टक्क्यांपेक्षा कमी गुण प्राप्त करणारे उमेदवार भरतीसाठी अपात्र होतील.
  2. भरतीच्या ठिकाणी महानगरपालिका वैद्यकीय परिक्षकांनी प्रमाणित केलेली उंची, कोणत्याही उमेदवाराला प्रशासनाकडे अपील करण्याचा अधिकार असणार नाही.
  3. उमेदवारांना निवडीच्या वेळी खालीप्रमाणे व्यावसायिक चाचणी दयावी लागेल

BMC Agnishamak Exam Marks | MCGMC Fire Brigade Exam Details

  1. पुरुष / महिला उमेदवारांची 200 गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.

मैदानी चाचणी                             – 120 गुण

प्रमाणपत्र चाचणी                         – 80 गुण

Total  ————————– 120 गुण

BMC Agnishamak Physical Exam Criteria 2023

शारीरिक पात्रता – पुरुष (BMC Male Fireman Physical Criteria)

अ) उंची किमान 172 सें. मी.

आ) छाती – 81 सें.मी. (साधारण) 86 सें.मी. ( फुगवून )

इ) वजन किमान 50 कि.ग्रॅम

 

शारीरिक पात्रता – महिला (BMC Female Fireman Physical Criteria)

अ) उंची – किमान 162 सें.मी.

आ) वजन –  किमान 50 कि. ग्रॅम

 

मैदानी चाचणी- पुरुष उमेदवारांसाठी (BMC Agnishamak Male Ground Test Details )

अ) 3 मिनीटांमध्ये 800 मीटर्स अंतर धावणारे उमेदवार पुढील चाचणीस पात्र होतील.

ब) 19 फुट उंचीवरुन जंपिंग शिटमध्ये उडी न मारणारे उमेदवार अपात्र होतील.

क) जमिनीपासुन 33 फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या (46.4 वरील उंचीच्या) अॅल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरावे लागेल.

( आरंभ रेषेपासून शिडी 20 फूट अंतरावर असेल . )                             ——————————————(40 गुण)

वेळ (सेकंदांमध्ये गुण
20 सेकंद किंवा 20 सेकंदापेक्षा कमी 40 गुण
20.1 सेकंद ते 30 सेकंदांपर्यंत 25 गुण
30.1 सेकंद ते 40 सेकंदांपर्यंत 10 गुण
40 सेकंदापेक्षा जास्त शून्य गुण

ड) 50 कि.ग्रॅम वजनाची मानवाकृती खांदयावर घेऊन दिलेल्या मार्गाने 60 मीटर अंतर धावणे.————– 40 गुण

वेळ (सेकंदांमध्ये गुण
20 सेकंद किंवा 20 सेकंदापेक्षा कमी 40 गुण
20.1 सेकंद ते 30 सेकंदांपर्यंत 20 गुण
30.1 सेकंद ते 40 सेकंदांपर्यंत 10 गुण
40 सेकंदापेक्षा जास्त शून्य गुण

इ) 20 फुट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व उतरणे (रस्सीवर चढतेवेळी फक्त हाताचा वापर करणे बंधनकारक राहील. पायाचा वापर करता येणार नाही केल्यास शून्य गुण मिळेल) सदर रस्सी पुर्ण चढल्यास 30 गुण, 31⁄2 चढल्यास 20 गुण, 1⁄2 चढल्यास 10 गुण तसेच अर्ध्यापेक्षा कमी अंतर चढल्यास शून्य गुण दिले जातील…………….(30 गुण)

ई) 20 पुलअप्स काढणे…………………………………….(10 गुण)

(प्रत्येक पुल-अप्सला अर्धा गुण याप्रमाणे 20 पुल अप्स पूर्ण केल्यास 10 गुण देण्यात येतील . )

मैदानी चाचणी – महिला उमेदवारांसाठी -BMC Aginshamak Female Ground Test Details

अ) 4 मिनीटांमध्ये 800 मीटर्स अंतर धावणारी उमेदवार पुढील चाचणीस पात्र होतील.

ब) 19 फुट उंचीवरुन जंपिंग शिटमध्ये उडी न मारणारी उमेदवार अपात्र होतील.

क) जमिनीपासुन 33 फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या (46.4′ वरील उंचीच्या) अॅल्युमिनियम)

एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरावे लागेल.

( आरंभ रेषेपासून शिडी 20 फूट अंतरावर असेल . )      ——————————————(40 गुण)

वेळ (सेकंदांमध्ये गुण
30 सेकंद किंवा 30 सेकंदापेक्षा कमी 40 गुण
30.1 सेकंद ते 40 सेकंदांपर्यंत 30 गुण
40.1 सेकंद ते 50 सेकंदांपर्यंत 20 गुण
50.1 सेकंद ते 60 सेकंदांपर्यंत 10 गुण
60 सेकंदापेक्षा जास्त शून्य गुण

ड) 40 कि.ग्रॅम वजनाची मानवाकृती खांदयावर घेऊन दिलेल्या मार्गाने 60 मीटर——————————————(40 गुण)

वेळ (सेकंदांमध्ये गुण
25 सेकंद किंवा 25 सेकंदापेक्षा कमी 40 गुण
25.1 सेकंद ते 35 सेकंदांपर्यंत 20 गुण
35.1 सेकंद ते 45 सेकंदांपर्यंत 10 गुण
45 सेकंदापेक्षा जास्त शून्य गुण

इ) गोळा फेक (4 कि. ग्रॅ.) – BMC Agnishaman Vibhag Gola Fek Details

अंतर गुण
6 मीटर व त्यापेक्षा जास्त 10 गुण
5 मीटर ते 6 मीटरपेक्षा कमी 07 गुण
4 मीटर ते 5 मीटरपेक्षा कमी 04 गुण
4 मीटर पेक्षा कमी शून्य गुण

ई) लांब उडी

अंतर गुण
15 फूट व त्यापेक्षा जास्त 15 गुण
12 फूट ते 15 फूटापेक्षा कमी 10 गुण
9 फूट ते 12 फूटापेक्षा कमी 05 गुण
9 फूटापेक्षा कमी शून्य गुण

फ) पुश अप (जोर काढणे)…………………………………(15 गुण)

(प्रत्येक पुश-अपला एक गुण याप्रमाणे 15 पुश अप पूर्ण केल्यास 15 गुण देण्यात येतील.) टिप- पुरुष व महिला उमेदवारांना वरील मैदानी चाचणी करतांना कोणत्याही टप्यावर दुखापत झाल्यास ही सर्व जबाबदारी संबंधित उमेदवाराची असेल. सदर उमेदवार मैदानी चाचणीच्या त्याच टप्प्यावर अपात्र करण्यात येतील. त्यांना कोणतीही पुन्हा संधी दिली जाणार नाही व ते महानगरपालिकेकडे कोणताही दावा करु शकणार नाही यांची नोंद घ्यावी.

प्रमाणपत्र चाचणी (पुरुष व महिला)  – Certificate Test For BMC BMC Agnishamak Exam 2023

अ) राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर व राज्य शासनाचे महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी व राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांच्या कडील अग्निशामक…..(25 गुण )

दुय्यम अधिकारी व तत्सम मान्यताप्राप्त अभ्यासक्रम प्रमाणपत्रधारकास (अग्निशामक प्रशिक्षण पाठयक्रम 10 गुण, दुय्यम अधिकारी पाठयक्रम व तत्सम प्रमाणपत्रधारकास 15 गुण देण्यात येतील)

ब) एन. सी. सी. चे प्रमाणपत्र………………………(20 गुण)

‘सी’ प्रमाणपत्र…10 गुण,  ‘ ‘ब’ प्रमाणपत्र 06 गुण

अ’ प्रमाणपत्र…04 गुण  किंवा शालेय पातळीवरील M.C.C. प्रमाणपत्र

क) 1. अर्ज सादर करण्याच्या दिनांकाला हलके वाहन चालविण्याचा वैध परवाना (Light Motor Vehicle Licence) असल्यास- (05 गुण)

  1. अर्ज सादर करण्याच्या दिनांकाला जडवाहन चालक वैध परवाना असल्यास – (05 गुण)

ड) 1 ) नागरी सेवादलाच्या अग्निशमन अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र …..06 गुण     (10 गुण)

2) होमगार्डमध्ये कमीत कमी 03 वर्षे सेवा केल्याचे प्रमाणपत्र ………..04 गुण

इ) सरकारी / निमसरकारी संस्था यांच्याकडे समुद्रकिना-यावर जीवरक्षक म्हणून 01 वर्षे सेवा केलेली असल्यास किंवा मुंबई अग्निशमन दलात कंत्राटी जीवरक्षक म्हणून किमान सहा महिने सेवा असल्यास……………(15 गुण)

सर्वसाधारण अटी – Important Instructions For Appearing in BMC Agnishamak Physical Test 2023

  1. शारीरिक चाचणीस येताना उमेदवाराने कोणतेही उत्तेजक / मादक द्रव्य (Dope ) सेवन करु नये. उत्तेजक / मादक द्रव्य (Dope) सेवन केलेले आढळल्यास त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
  2. शारीरिक चाचणीच्या दिनांकात / वेळेत बदल करण्याची उमेदवाराची कोणतीही विनंती स्विकारार्ह असणार नाही.
  3. शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या पुरुष उमेदवारास मैदानी परिक्षेसाठी हाफ पॅन्ट व बनियन परिधान करणे आवश्यक राहील व महिला उमेदवारास मैदानी परिक्षेसाठी गोल गळयाचा टी शर्ट व फुल ट्रॅक पॅन्ट परिधान करणे आवश्यक आहे.
  4. मैदानी चाचणीमध्ये इजा होऊ नये म्हणून उमेदवाराने कॅनव्हासचे शूज / स्पोर्टस् शूजचा वापर करावा. 29. व्यावसायिक चाचणी दरम्यान उमेदवारास मार लागल्यास अथवा जीवघेणी दुखापत झाल्यास ती त्या
  5. उमेदवाराची जबाबदारी राहील. त्याबाबत नुकसान भरपाई दिली जाणार नाही. तसेच सदर निवड चाचणी कोणत्याही टप्प्यावर पूर्ण करु न शकल्यास त्या उमेदवारास पुढील चाचणीमध्ये कोणतेही गुण दिले जाणार नाही व त्यास त्याच टप्प्यावर अपात्र करण्यात येईल.
  6. सरळसेवा भरती अंतर्गत अग्निशामक या संवर्गाकरिता समांतर आरक्षणांतर्गत महिला उमेदवार प्राप्त न झाल्यास त्याच प्रवर्गातील पुरुष उमेदवार घेण्यात येतील.
  7. मुंबई अग्निशमन दलात सेवेच्या अनुषंगाने योग्यता व पात्रता तपासणीसाठी प्रशिक्षण कालावधीमध्ये देण्यात येणा-या वेगवेगळया प्रशिक्षण पध्दतीत अपात्र ठरल्यास त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल.
  8. खेळाडू आरक्षणाचा दावा करणा-या उमेदवारांनी शासन निर्णय क्र. राक्रीधो-2002/ प्र.क्र.68/क्रीयुसे- 2 दि.01.07.2016 व तद्नंतर सुधारित निर्णयानुसार गट ‘ड’ साठी क्रीडा विषयक विहित अर्हता धारण केल्याचे प्रमाणपत्र विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांनी प्रमाणित केलेले असावे. ते प्रमाणपत्र विधीग्राहय नसल्याचे निर्दशनास आल्यास त्यांची नियुक्ती कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल. 33. स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे नाम निदेर्शित शासन निर्देशानुसार उपलब्ध झाल्यास त्यांचा विचार प्राधान्याने करण्यात येईल.
  9. निवड झालेल्या उमेदवाराविरुध्द कोणताही गुन्हा नोंदविलेला नाही अथवा सिध्द झालेला नाही असे चारित्र्य
  10. प्रमाणपत्र संबंधित पोलीस स्टेशनकडून प्राप्त झाल्यानंतरच त्याची सदर पदावर नेमणूक केली जाईल.

🚒Download BMC Agnishamak Physical Exam Details PDF in Marathi

Leave a Comment