आशा स्वयंसेविका भरती पूर्ण माहिती, सॅलरी आणि पूर्ण माहिती- asha swayamsevika salary, Nivad Prakriya, Maharashtra

आशा स्वयंसेविका भरती पूर्ण माहिती, सॅलरी आणि पूर्ण माहिती- Asha Swayamsevika Training, Salary, Nivad Prakriya, Maharashtra

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Asha Swayamsevika Training, Salary, Nivad Prakriya, Maharashtra : ASHA is used to provide health facilities at the village level under the National Rural Health Mission. ASHA acts as an intermediary between the rural population and the health center. One ASHA per 1500 population in non-tribal areas and one ASHA per 1000 population in tribal areas. In order to convince the people of rural areas about the importance of hygiene, vaccination, they are trained to provide basic treatment for fever, burns and minor injuries. Also distribution of other pills like DOTS, Folic Acid and Chloroquin are done through ASHA. Similarly, in case of serious health conditions, ASHA is also responsible for informing the concerned system. Even though rural ASHAs are working on a volunteer basis, provision is made for them to be paid incentive pay/allowances for their performance. Through this, ASHA is provided only one kind of employment.

Asha Swayamsevika Training, Salary, Nivad Prakriya, Maharashtra

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रामस्तरावर आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी ASHA चा उपयोग होतो. ग्रामीण जनता व आरोग्य केंद्र यांच्यामध्ये ASHA या मध्यस्थीचे काम करतात. गैर-आदिवासी भागात 1500 लोकसंख्येमागे एक ASHA तर आदिवासी भागामध्ये 1000 लोकसंख्येमागे एक ASHA नियुक्त करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छता, लसीकरण यांचे महत्व पटवून देण्यासाठी त्याचप्रमाणे ताप, हगवण, लहान-मोठया जखमा यावरील प्राथमिक स्वरुपाचे उपचार करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येते. तसेच DOTS, Folic Acid आणि Chloroquin सारख्या इतरही गोळयांचे वाटप करण्याची कामे ASHA मार्फत केली जातात. त्याचप्रमाणे आरोग्यविषयक गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची माहिती संबंधित यंत्रणेला देण्याची जबाबदारीही ASHA वर असते. ग्रामीण भागातील ASHA या स्वयंसेवक पध्दतीने जरी काम करीत असल्या तरी त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना प्रोत्साहनपर वेतन/भत्ते देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे ASHA ना एक प्रकारचा रोजगारच उपलब्ध करुन दिला जातो.

आदिवासी क्षेत्र

१. आदिवासी क्षेत्रात प्रत्येक १००० लोकसंख्येमागे १ ASHA. २. आदिवासी क्षेत्रात कार्य करणा-या ASHA चे किमान ८ वी पर्यंत शिक्षण झालेले असावे. ३. आदिवासी क्षेत्रात काम करणा-या ASHA २०-४५ वयोगटातील असव्यात. ४. आदिवासी क्षेत्रात काम करणारी ASHA ही विवाहीत असावी. गैर-आदिवासी क्षेत्र:- १. गैर-आदिवासी क्षेत्रात प्रत्येक १५०० लोकसंख्ये मागे १ ASHA असते. २. गैर-आदिवासी क्षेत्रात कार्य करणा-या ASHA चे किमान १० वी पर्यंत शिक्षण झालेले असावे. ३. गैर-आदिवासी क्षेत्रात काम करणा-या ASHA २५ – ४५ वयोगटातील असव्यात. ४. गैर-आदिवासी क्षेत्रात काम करणारी ASHA ही विवाहीत असावी. नियुक्ती प्रक्रिया:- १. निवड केलेल्या उमेदवारांमधुन VHNSC ग्रामसभेला ३ नावे सुचित करतात. २. ग्रामसभेला सुचित केलेल्या ३ उमेदवारांमधुन एका उमेदवाराची ASHA म्हणुन नियुक्ती केली जाते. ३. ASHA ची नियुक्ती झाल्याचे नियुक्ती पत्र तालुका आरोग्य अधिका-यामार्फत निर्गमित केले जाते.

प्रशिक्षण Asha Swayamsevika Training Program 

१. ग्रामसभेद्वारा निवड झाल्यानंतर व तालुका आरोग्य अधिका-यामार्फत नियुक्ती पत्र मिळाल्यानंतर ASHA प्रशिक्षणासाठी पात्र ठरते. २. प्रशिक्षण हे ७+४+४+४+४ असे एकुण २३ दिवस अशा प्रकारे ५ सत्रात विभागलेले असते. ३. प्रथम ७ दिवसांचे प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर ASHA ला तिच्या कार्यकुशलतेवर आधारित प्रोत्साहनपर वेतन/भत्ते प्राप्त होत असतात. ४. प्रशिक्षणाला हजर राहील्यानंतरच ASHA प्रोत्साहनपर वेतन/भत्ता प्राप्तीसाठी पात्र ठरते.

प्रोत्साहनपर वेतन/भत्ते

१. ASHA ला दिले जाणारे प्रोत्साहनपर वेतन/भत्ता तिच्या कार्यकुशलतेवर अवलंबून असतो.

२. ASHA च्या कार्याची नोंद एका नोंदवहीत घेतली जात असुन तिच्या कार्यकुशलतेनुसार (दर्जानुसार) तिला प्रोत्साहनपर वेतन/भत्ते दिले जातात.

३. ASHA ला मिळणारे प्रोत्साहनपर वेतन/भत्ते हे महिन्यातुन एकदा होणा-या बैठकीच्यावेळी PHC स्तरावर दिले जातात.

४. ASHA ला दिले जाणारे प्रोत्साहनपर वेतन/भत्ते हे धनादेशाच्या स्वरुपात दिले जातात.

आशा स्वयंसेवकांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या काय आहेत?

साथीच्या रोगाबाबत जनजागृती आणि उपचारासाठी मदत करणे, कुटुंब कल्याण योजनेचा प्रचार करणे, माता आणि बालआरोग्याविषयी प्रबोधन करणे (उदाहरणार्थ, प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण, स्तनपान, लोहयुक्त गोळ्या देणे, योग्य आहार घेणे), जन्म आणि मृत्यू नोंदणीमध्ये मदत करणे, किरकोळ आजारांवर औषधं देणे अश्या जबाबदार्‍या आशा स्वयंसेवकांवर आहेत.

कोरोना साथीत घरोघरी जाऊन कुटुंबातील व्यक्तींना काही त्रास आहे का? वयोवृद्ध लोकं कोणत्या घरात राहतात, त्यांना कोणते आजार आहेत का? याचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं, होम क्वारंटाईन असलेला कोरोना रूग्णाला कोणती लक्षणं दिसतायेत याबाबत दररोज माहिती घेणं, आरोग्य केंद्रावर लोकांना तपासणीसाठी आणणे, लसीकरणासाठी जनजागृती करणे, लसीकरण केंद्रांवर मदतीचे काम करणे ही कामं आशा स्वयंसेवकांनी कोरोना काळात केली.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांचं सर्वेक्षण करण्याची जबाबदारी आशांवर सोपवण्यात आली आहे.

आशा स्वयंसेवकाचं शिक्षण आणि प्रशिक्षण काय असतं?

Asha Swayamsevika Eligibility

आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या आशा आमचं शिक्षण हे आठवी पूर्ण झालेलं असावं. त्याचबरोबर बिगर आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या आशांचे शिक्षण हे दहावी पूर्ण झालेलं असावं अशी शासनाची अट आहे.

  • आशा वर्कर
  • फोटो कॅप्शन,
  • आशा वर्कर, प्रातिनिधिक फोटो

आशा स्वयंसेविका ही विवाहित स्त्री असावी. त्याचबरोबर ती 20 ते 45 वयोगटातील असावी. या वर्गातील ज्या उमेदवारांकडून अर्ज केले जातात त्यातून तीन उमेदवारांची नावं ही ग्रामसभेला सुचित केली जातात आणि ग्रामसभेकडून या तीन उमेदवारांपैकी एका आशा स्वयंसेवकांची निवड केली जाते. ग्रामसभेद्वारे आशा स्वयंसेवकांची निवड झाल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारीकडून आशा स्वयंसेविका ला नियुक्ती पत्र देण्यात येते. त्यानंतर आशा स्वयंसेविकांना 23 दिवस प्रशिक्षण दिलं जातं.

Leave a Comment