Ahilyanagar Kotwal Bharti Syllabus: अहिल्यानगर जिल्हयातील अहिल्यानगर उपविभागातील अहिल्यानगर तालुक्यातील सजेतील महसूल सेवक (कोतवाल) या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता अर्हता धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीनेच https://nagar govbharti.org या संकेत स्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहेत.महसूल सेवक (कोतवाल) भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहीरात https://nagar.govbharti.org या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहीती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. तसेच या भरतीचे लेखी परीक्षा माहिती व परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम येथे देण्यात आला आहे.
Below is the latest syllabus and exam pattern for ahmednagar kotwal Bharti : Ahmednagar Mahsul Sevak exam is going to be conducted for 100 questions, written exam will be held to select candidates so read all details given below about ahilyanagar kotwal Bharti Syllabus
Ahilyanagar Mahsul Sevak Bharti Exam Pattern 2025
महसूल सेवक (कोतवाल) | लेखी परिक्षेसाठी गुण : 100

लेखीपरिक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व कार्यक्रम
1) लेखी परिक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल. (प्रश्न संख्या 50)
2) महसूल सेवक (कोतवाल) पदाची लेखी परीक्षा सामान्यज्ञानावर आधारीत असेल.
3) उमेदवारांना शैक्षणिक व इतर संबंधित मूळप्रमाणपत्रे तपासणीसाठी उपलब्ध करुन द्यावी लागतील. अन्यथा अंतिम निवडीसाठी विचार केला जाणार नाही.
1. उमेदवारास लेखी परीक्षेत किमान 40 गुण मिळवणे आवश्यक असेल.
2. लेखी परिक्षेत गुणवत्तेनुसार पात्र ठरणा-या उमेदवाराची तात्पुरती कागदपत्रे तपासणीकामी निवड यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. तसेच कागदपत्रे तपासणी अंती अंतिम निवड यादी संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
i. लेखी परिक्षा, कागदपत्रे छाननी, इ. करिता प्रवेशपत्र, कार्यक्रम, विविध सूचना या केवळ संकेत स्थळावरुनच उपलब्ध करण्यात येतील. पोस्टाद्वारे पाठविण्यात येणार नाहीतii. तसेच परिक्षेपूर्वी संकतेस्थळावरुन प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहिल. सदर प्रवेशपत्रावरच उमेदवारास परिक्षेकरीता प्रवेश दिला जाईल यांची नोंद घ्यावी.
निवडीसाठी कार्यपद्धती, अटी, शर्ती. –
1. लेखी परिक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवडीसाठी उमेदवारांना शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रे तपासणीसाठी उपलब्ध करुन द्यावी लागतील. अन्यथा अंतिम निवडीसाठी विचार केला जाणार नाही.
लेखी परीक्षेअंती पात्र उमेदवारांचे जाहिरातीनूसार आवश्यक पात्रता व ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती यांच्या आधारे मूळ कागदपत्र पडताळणी करण्याकरिता अंतरिम स्वरुपात यादी जाहीर करण्यात येईल. ज्या उमेदवारांची जाहिरातीनूसार आवश्यक पात्रता व ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती, परिक्षा शुल्क, मूळ कागदपत्रांच्या आधारे परीपुर्ण सिद्ध होईल अशाच उमेदवारांचा विचार भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्या करीता करण्यात येईल. जाहिरातीत नमूद केलेली संपुर्ण अर्हता, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती व मूळ कागदपत्र तपासणीच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे यामध्ये तफावत आढळल्यास उमेदवारांची उमेदवारी भरतीच्या कुठल्याही टप्प्यावर रद्द होऊ शकेल अथवा अशा उमेदवारांचे मागीतलेले सामाजिक आणि/किंवा समांतर आरक्षण अथवा प्रक्रिया शुल्क इ. सारख्या सवलती नामंजूर करण्यात येतील याची कृपया नोंद घ्यावी.
- उमेदवार शारिरीक दृष्ट्या सक्षम असल्या बाबतचे अधिक्षक, ग्रामिण रुग्णालय यांचे अथवा वरिष्ठ वैद्यकीय अधिका-याचे प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहिल व उमेदवाराची पात्रता वैद्यकीय तपासणी अंतीच निश्चित करण्यात येईल.
- उमेदवारांचे चारित्र्य निष्कलंक असल्या बाबतचे संबांधित पोलीस स्टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहिल.
- कोणत्याही राजकिय पक्षाशी संबंध न ठेवणेबाबतचे रुपये 100 च्या स्टँप पेपरवरील प्रतिज्ञापत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहिल.
- महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र. केओटी-6073/30004/ल, दिनांक 28/02/1974 नुसार महसूल सेवक (कोतवाल) म्हणून नेमणूक करतांना इतर सर्व निकष समान असतील तर त्या सजेतील पुर्वीच्या कोतवालांच्या वारसांना इतर उमेदवारांपेक्षा प्राधान्य देण्यात येईल. तसेच कोतवालांच्या वारसाव्यतिरिक्त इतर दोन उमेदवारांचे अंतिम गुण सारखे असल्यास उमेदवारांचा गुणवत्ताक्रम सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय दिनांक 13 जुन 2018 मधील नमुद निकषावर लावला जाईल.
- उमेदवाराने अर्ज केलेल्या सजेतील गावातील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक.
- उमेदवार कोणत्याही एकाच सजेतील स्थानिक/कायमचा रहिवासी असु शकतो सबब उमेदवाराने अशाच एका सजेत अर्ज करावा.
- प्रत्येक सजेत केवळ एक पद उपलब्ध आहे व ते शासकीय निकषांनुसार आरक्षित करण्यात आलेले आहे. अर्ज करताना उमेदवाराने आरक्षण तपासूनच अर्ज करावा.