चालू घडामोडी २०२५ पेपर २० सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! 0 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on July 05, 2025 By MahaBharti Exam Team चालू घडामोडी जुलै २०२५ पेपर २० सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 20 1. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? A. विधान परिषदेतील सदस्यांची कमाल संख्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या एक तृतीयांश असते. B. भारतीय राज्यघटनेने विधान परिषदेतील सदस्यांची किमान संख्या 40 निश्चित केलेली आहे. C. विधान परिषदेच्या संरचनेमध्ये बदल करण्याचा अधिकार राष्ट्रपतीस आहे. D. जम्मू-काश्मीर राज्याच्या राज्यघटनेनुसार जम्मू आणि काश्मिरच्या विधान परिषदेत 36 सदस्य आहेत. 2 / 20 2. कोणत्या राज्यात विधीमंडळाची द्विगृही सभागृहे आहेत ? अ) बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश ब) राजस्थान, गुजरात, गोवा क) हरियाणा, केरळ, जम्मू व काश्मीर ड) मध्य प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल A. अ बरोबर B. यापैकी नाही. C. ब आणि क बरोबर D. क बरोबर 3 / 20 3. खालील विधाने विचारात घ्या. अ) विधानसभेत कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 सभासद असावेत. ब) महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या 279 आहे. क) सिक्रीम राज्याच्या विधान सभेची सदस्य संख्या 32 आहे. A. अ आणि क B. ब आणि क C. अ आणि ब D. अ, ब आणि क 4 / 20 4. पुढील दोन विधानांपैकी कोणते पोग्य आहे? अ) विधीमंडळातील एक सदस्य एकाच दिवशी ताराचिन्ह करून तोंडी उत्तरासाठी असलेल्या प्रश्नांच्या सुचिमध्ये जास्तीत जास्त दोन प्रश्न दाखल करू शकतो. ब) दोन पेक्षा अधिक प्रश्न असल्यास ते पुढच्या दिवशी घेतले जातात. A. दोन्हीही B. न अ न ब C. फक्त अ D. ब 5 / 20 5. विधानसभेच्या अध्यक्षाबाबत (सभापती) खालील विधाने विचारात घ्या. अ) त्याचे विधानसभेचे सदस्यत्व संपुष्टात आले तर त्यास आपले पद रिक्त करावे लागते. ३) आपल्या पदाचा, स्वतःच्या सहीनिशी लेखी राजीनामा, राज्यपालास संबोधून कोणत्याही वेळी देता येईल. क) विधानसभेच्या हजर राहुन मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने ठराव पारित करून त्यांना पदावरून दूर करता येईल. ४) पदावरून दूर करण्यासंबंधीचा ठराव, तो मांडण्याचा उद्देश कळविल्यापासून निदान एक महिन्याची नोटीस देण्यात आल्याशिवाय मांडला जाणार नाही. A. अ, ब आणि ड B. अ,ब आणि. क C. ब. आणि क D. फक्त अ 6 / 20 6. महाराष्ट्र विधिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? A. विधान परिषदेत प्रलंबित असलेले जे विधेयक विधानसभेने मंजूर केलेले नसेल ते विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होत नाही. B. जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडून मंजूर होवून विधान परिषदेत प्रलंबित असेल ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होते. C. विधिमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहांची सत्र समाप्ती झाल्याकारणाने रद्द होत नाही. D. यापैकी एकही नाही 7 / 20 7. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अ) 6 फेब्रुवारी, 1956 रोजी पुणे येथे भरलेल्या विरोधी पक्षांच्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी एस्.एम्. जोशी होते. ब) द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 डिसेंबर, 1956 रोजी झाली. क) 1957 च्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीने पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड यश प्राप्त केले होते. A. क B. ब C. अ D. वरीलपैकी एकही नाही 8 / 20 8. खालील विधान वाचून अचूक पर्याय निवडा. विधी मंत्रालयाने तयार केलेला मसुदा कच्चा असल्याचे कारण देत प्रतिबंधात्मक स्थानबद्धता वाढविणारे विधेयक में 1975 मध्ये सभापतींना विरोधकांनी रद्द करण्याची आवश्यकता पटवून दिली. अशा उदाहरणांचे वर्णन कशा प्रकारे केले जाते? A. आत्यंतिक विधीवाद B. कार्यकारी मंडळाची सक्रियता C. प्रशासकीय सक्रियता D. विधीमंडळाची सक्रियता 9 / 20 9. पुढील कोणते विधाने योग्य आहे? अ) कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, केरळ या दक्षिणी राज्यांपैकी केवळ दोन राज्यात विधान परिषद आहे. ब) विधान परिषदेत कमीत कमी 60 सदस्य असू शकतात. A. अ व ब दोन्ही B. केवळ अ C. अ व ब दोन्ही नाहीत D. केवळ ब 10 / 20 10. विधानसभा सदस्य हा सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरू शकत नाही, जर तो सदस्य... A. ज्या राजकीय पक्षाचा सदस्य म्हणून निवडून आला असेल, अशा राजकीय पक्षाचे सदस्यत्त्व त्याने स्वच्छेने सोडून दिले तर. B. पक्षाने दिलेल्या निर्देशाविरूद्ध जाऊन तो मतदानापासून दूर राहिला तर. C. ज्या राजकीय पक्षातर्फे सभागृहात निवडून आला होता, त्या पक्षाने जर त्याला पक्षातून काढून टाकले तर. D. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्त्याने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला तर. 11 / 20 11. खालील विधाने विचाराच्या: अ) राज्यघटनेत दुरुस्ती करणार विधेयक केवळ मंत्रीच संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडू शकतो. ब) जर अशा दुरुस्तीमुळे राज्यघटनेच्या संघराज्यीय स्वरूपात बदल होणार असेल तर त्या दुरुस्तीला भारतातील सर्व राज्यांच्या विधिमंडळाची मान्यता लागते. क) राष्ट्रपती घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देण्याचे राखून ठेवू शकत नाही, तसेच पुनर्विचारासाठी संसदेकडे परतही पाठवू शकत नाही. वरीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहे/त? A. फक्त क B. फक्त ब C. वरील सर्च D. अ आणि क 12 / 20 12. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? A. सर्व अर्थ (धन) विधेयके (अनुच्छेद-110) ही वित्त विधेयके असतात परंतु सर्व वित्त विधयके (अनुच्छेद-117) ही अर्थ (धन) विधेयके नसतात. B. वित्त विधेयक (अनुच्छेद-117(3)) हे राज्यसभेद्वारा फेटाळले अथवा दुरुस्त केले जावू शकत नाही. C. वित्त विधेयका (अनुच्छेद-117(3)) बाबत दोन्ही सभागृहामध्ये मतभेद असल्यास कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रपती दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावू शकतो. D. वरीलपैकी एकही नाही. 13 / 20 13. महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अ) कामकाजासाठी गणसंख्या सभागृहाच्या एकूण सभासद संख्येच्या (एक दशांश) आवश्यक असते, ब) कामकाजासाठी गणसंख्या १२ (बारा) सभासद असते. A. दोन्ही विधाने असत्य B. विधान अ सत्य, ब असत्य C. दोन्ही विधाने सत्य D. विधान अ असत्य, ब सत्य 14 / 20 14. खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे? A. परिषदेच्या अध्यक्षास पाय पेक्षा जास्त नाहीत इतके सदस्य 'अंदाज समितीवर' प्रतिनिधीत्व करण्यासाठी नामनिर्देशित करावे लागतात. B. विधान परिषदेच्या अध्यक्षास पाच पेक्षा जास्त नाही इतके सदस्य 'सार्वजनिक उपक्रम' समितीवर प्रतिनिधीत्व करण्यासाठी नामनिर्देशित करावे लागतात. C. विधान परिषदेच्या अध्यक्षास पाच पेक्षा जास्त नाहीत इतके सदस्य 'पंचायती राज' समितीवर नामनिर्देशित करावे लागतात. D. वरीलपैकी एकही नाही 15 / 20 15. राज्यसभेतील सभागृहाचे नेता याविषयी पुढील विधानांतून अयोग्य विधान/ने कोणते/ती शोधा. A. जर पंतप्रधानच राज्यसभेचे सदस्य असतील तर ते स्वतःच सभागृहाचे नेता म्हणून काम पाहतात. B. सर्वसाधारणपणे पंतप्रधान राज्यसभेचे सदस्य असणाऱ्या मंत्र्यांची सभागृहाचे नेते म्हणून नेमणूक करतात. C. राज्यसभेतील सभागृह नेते हे राज्यसभा अध्यक्ष दीर्घकाळ सुट्टीवर असताना सभागृहाचे अध्यक्षपद भूषवण्यासाठी महत्वाचे असतात. 16 / 20 16. महाराष्ट्राच्या विधान सभेच्या सभापतीबाबत खालील विधाने विचारान घ्या : अ)जर तो विधान सभेचा सदस्य राहिला नाही तर त्यास आपले पद सोडावे लागते. ब)सभागृहातील कामकाज चालविण्यासाठी आणि त्याचे नियमन करण्यासंबंधातील त्याच्या वर्तनाबाबत केवळ उच्च न्यायालयातच आव्हान देता येते. क)तो स्वतः कामकाज सल्लागार समितीचा अध्यक्ष असतो. ड)तो राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवितो. A. अ, क B. ब, क, ड C. अ, ब, क D. ब, ड 17 / 20 17. भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे? अ) बिहार ब) कर्नाटक क) तेलंगणा ड) मध्यप्रदेश A. फक्त अ, ब, क B. फक्त अ, ब, ड C. फक्त अ, क, ड D. फक्त ब, क, ड 18 / 20 18. शिक्षक मतदार संघातून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या आमदाराबाबत कोणते विधान चुकीचे आहे? A. प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना मतदानाचा अधिकार नाही. B. पात्र शिक्षकांना मतदार यादीत अंतर्भूत होण्याकरिता किमान तीन वर्षे अध्यापनाचा अनुभव आवश्यक असतो. C. निवडणुकीस उमेदवार म्हणून उभे राहण्यासाठी मतदार यादीत उमेदवाराचे नाव असणे आवश्यक आहे. D. ही निवडणुक शिक्षक नसणारा पण लढू शकतो. 19 / 20 19. महाराष्ट्र विधान परिषदेच्या इतिहासातील इतक्यातील सर्वाधिक चमत्कारिक परिस्थिती कोणती होती? अ) विरोधी पक्षाने त्याच्या नेत्यासह सत्ताधिश पक्षाशी हातमिळवणी केली. ब) विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाला निमंत्रित करण्यासाठी विरोधी पक्ष नेता नव्हता. क) सभागृहाच्या अध्यक्षाला अविश्वासाचा ठराव संमत झाल्याने पदत्याग करावा लागला. ड) सभागृहातील सर्व तिन्ही सत्तापदे अध्यक्षपद उपाध्यक्षपद,विरोधी पक्षनेता-एकाच राजकीय पक्षाने धारण केली. A. केवळ ब आणि क B. वरील सर्व C. केवळ व आणि ड D. ब, क आणि ड 20 / 20 20. विधान परिषदेत विशेषाधिकाराचा प्रश्न उपस्थित करण्याचा अधिका पुढील निबंधास अधीन असेल. अ) एका बैठकीत दोन पेक्षा अधिक प्रश्न उपस्थित करण्यात येणार नाहीत. ब) प्रश्न नुकत्याच घडलेल्या विशिष्ट बाबीपुरताच मर्यादित असेल. A. विधान ब बरोबर परंतु अ चूक आहे B. अ आणि ब दोन्ही विधाने चूक आहेत C. विधान अ बरोबर आहे परंतु, ब चूक आहे. D. अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत. टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. Your score isThe average score is 0% LinkedIn Facebook 0% Restart quiz