List Of Documents Required For Lekha Koshagar Exam : लेखा कोशागर भरती २०२४ साठी अर्ज करताना उमेदवारांना आवश्यक प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे स्कॅन करून विहित फॉरमॅटमध्ये अपलोड करावी लागतील. यामध्ये शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, वय व जन्माचा पुरावा, टंकलेखन प्रमाणपत्र, MS-CIT किंवा तत्सम संगणक प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र आणि नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र अनिवार्य आहे, तसेच आर्थिक दुर्बल घटकांचे प्रमाणपत्रही आवश्यक आहे. विशेष परिस्थितीत, जसे की विवाहित महिलांच्या नावातील बदल, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य, अथवा महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील दाखला, यासाठी संबंधित पुरावे सादर करणे बंधनकारक आहे. छायाचित्र आणि स्वाक्षरी योग्य परिमाण आणि आकारात (८० KB ते २०० KB) स्कॅन करून वेगवेगळे अपलोड करणे गरजेचे आहे. सर्व प्रमाणपत्रे अर्ज करताना आणि परीक्षेच्या वेळी सादर करणे अनिवार्य असून कोणतीही विसंगती आढळल्यास उमेदवारास अपात्र ठरवले जाईल. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:
लेखा व कोषागार विभागातील कनिष्ठ लेखापाल भरतीसाठी परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम
Important Document List For Online Registration Of MahaKosh Exam 2024
छायाचित्र/ फोटो व स्वाक्षरी अपलोड करणे
(1) छायाचित्रः एका पांढऱ्या स्वच्छ कागदावर विहित आकाराचे छायाचित्र व्यवस्थित चिकटवावे, छायाचित्रावर स्वाक्षरी करू नये अथवा ते साक्षांकित करू नये, तसेच छायाचित्र स्टेपल अथवा पिनिंग करू नये, फक्त स्कॅनरवर ठेवून थेट स्कॅन करावा.
(ii) स्वाक्षरी : विहित आकार क्षमतेप्रमाणे काळ्या शाईच्या बॉलपेनने स्वच्छ कागदावर स्वाक्षरी करावी. उमेदवाराने स्वतः स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. अन्य कोणत्याही व्यक्तीने स्वाक्षरी केल्यास ती ग्राह्य धरण्यात येणार नाही.
- छायाचित्र व स्वाक्षरी वेगवेगळी स्कंन करावी. छायाचित्र व स्वाक्षरी एकत्रित स्कैन करु नये.
- छायाचित्र व स्वाक्षरी अपलोड (Upload of Photo/Signature) करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे
- छायाचित्राचा आकार (रुंदी ३.५ cm x उंची ४.५ cm)
- छायाचित्र अर्जाच्या दिनांकाच्या सहा महिन्याहून आधी काढलेले नसावे आणि ते ऑनलाईन परीक्षेच्या वेळी उमेदवाराच्या रुपाशी जुळणारे असावे, छायाचित्र रंगीत (कलर फोटो) व पासपोर्ट आकाराचे असणे आवश्यक आहे. हलक्या रंगाच्या, शक्यतो पांढऱ्या, पार्श्वभूमीच्या विरुद्ध घेतलेले असावे, टोपी आणि गडद चष्मा ग्राह्य नाहीत,
- छायाचित्राचे परिमाण १४० x १८० पिक्सेल असावे.
- छायाचित्राचा आकार ८० kb ते २०० kb दरम्यान असावा, स्कॅन केलेल्या प्रतिमेचा आकार २०० kb पेक्षा जास्त नसावा.
- अर्जदाराने काळ्या शाईच्या वॉलपेनने पांढऱ्या कागदावर स्वाक्षरी करावी. परिमाण १४० x १८० पिक्सेल असावे. फाईलचा आकार ८० kb ते २०० kb दरम्यान असावा. स्कॅन केलेल्या प्रतिमेचा आकार २०० kh पेक्षा जास्त नसावा,
Lekha Koshar Document List
लेखा कोशागर भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना खालील प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे स्कॅन करून विहित फॉरमॅटमध्ये अपलोड करावी लागतील. सर्व कागदपत्रांची साईज आणि फॉरमॅट योग्य राखणे अनिवार्य आहे.
अ. क्र. | प्रमाणपत्र/कागदपत्र | फाईल फॉरमॅट | किमान फाईल साईज (KB) | कमाल फाईल साईज (MB) |
---|---|---|---|---|
१ | एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र | १०० | २ | |
२ | वयाचा पुरावा | १०० | २ | |
३ | जन्म प्रमाणपत्र | १०० | २ | |
४ | शैक्षणिक अर्हता व संबंधित प्रमाणपत्रे | १०० | २ | |
५ | टंकलेखन प्रमाणपत्र | १०० | २ | |
६ | MS-CIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र | १०० | २ | |
७ | जात प्रमाणपत्र (राखीव प्रवर्गासाठी) | १०० | २ | |
८ | आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र | १०० | २ | |
९ | नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र | १०० | २ | |
१० | माजी सैनिक/दिव्यांग प्रमाणपत्र | १०० | २ | |
११ | खेळाडू/अनाथ/प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त यांचा पुरावा | १०० | २ | |
१२ | विवाहित महिलांच्या नावात बदल प्रमाणपत्र | १०० | २ | |
१३ | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र | १०० | २ | |
१४ | महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील दाखला | १०० | २ | |
१५ | मराठी भाषेच्या ज्ञानाचा पुरावा | १०० | २ | |
१६ | लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र | १०० | २ | |
१७ | आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य प्रमाणपत्र | १०० | २ | |
१८ | स्वातंत्र्यसैनिक/जनगणना कर्मचारी/निवडणूक कर्मचारी प्रमाणपत्र | १०० | २ |
छायाचित्र आणि स्वाक्षरीसाठी विशेष सूचना:
- छायाचित्र: पासपोर्ट साईज, पांढऱ्या पार्श्वभूमीसह, रंगीत, विहित साईजमध्ये (१४० x १८० पिक्सेल, ८० KB ते २०० KB).
- स्वाक्षरी: काळ्या शाईच्या बॉलपेनने स्वच्छ कागदावर स्वाक्षरी करून स्कॅन करावी. (१४० x १८० पिक्सेल, ८० KB ते २०० KB).
- छायाचित्र आणि स्वाक्षरी वेगवेगळी अपलोड करणे आवश्यक आहे.
महत्वाचे:
- सर्व प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे परीक्षेच्या वेळेस तसेच कागदपत्र पडताळणीसाठी सादर करणे बंधनकारक आहे.
- कागदपत्रांमधील कोणताही विसंगती आढळल्यास उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
List Of Documents Required For Verification Under Mahakosh Exam
कागदपत्रे पडताळणीवेळेस विहित कागदपत्रे / प्रमाणपत्रे सादर करणे :- सदर परिक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवडयादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकरिता बोलावण्यात येईल. कागदपत्र पडताळणीच्या वेळेस उमेदवारांना लागू असणारी खालील नमूद कागदपत्रे / प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती व छायांकित प्रती सादर करणे बंधनकारक राहिल