EWS उमेदवारांसाठी ३०० पदांची नवीन भरती प्रक्रिया! – EWS Goa Bharti

EWS Goa Bharti –  Goa EWS Bharti 2026, Goa Government Jobs, Economically Weaker Section Goa, Goa Staff Selection Commission Recruitment, Medical Engineering Seats Goa, Goa Job Vacancy 2026.  In a major boost for youth belonging to the Economically Weaker Section (EWS) in Goa, the state government is set to roll out massive opportunities in both public sector employment and higher education. According to official government sources, hundreds of vacancies and academic seats have been reserved to support eligible candidates from the economically backward strata this year.

Massive Recruitment Drive: 300+ Government Jobs
The EWS Department of Goa will soon spearhead a massive recruitment drive aimed at filling approximately 300 government positions. These vacancies are specifically reserved for EWS category candidates, providing a golden opportunity to secure stable, high-profile government jobs in various state departments.

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (इडब्लूएस) उमेदवारांसाठी कर्मचारी भरती आयोगामार्फत यावर्षी सुमारे ३०० सरकारी नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. याशिवाय वैद्यकीय, अभियांत्रिकीसह अन्य व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये या प्रवर्गासाठी ३५० जागा उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती सरकारी सूत्रांकडून मिळाली आहे. गोवा घटक राज्य दिनापर्यंत म्हणजेच ३० मे १९८७ पूर्वी जे नागरिक गोव्याचे रहिवासी होते, केवळ त्यांना आणि त्यांच्या मुलांनाच ‘इडब्लूएस’ आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार गोव्यात इडब्ल्यूएस योजना लागू करण्याच्या निकषांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव आहे. पात्र आणि केवळ मूळ गोमंतकीयांनाच या आरक्षणाचा फायदा व्हावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

 

५ हजार नोकरभरती प्रक्रिया

सरकारी नोकऱ्या आणि व्यावसायिक शिक्षण प्रवेशासाठी इडब्ल्यूएस योजनेचा सर्वाधिक वापर केला जातो. विविध सरकारी विभागांकडून यावर्षी ५ हजार नोकऱ्यांच्या भरतीचे प्रस्ताव कर्मचारी भरती आयोगाकडे सादर करण्यात आले आहेत. यापैकी १५०० पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध होऊन ‘सीबीटी’ (संगणक आधारित) परीक्षा देखील झाली आहे. या १५०० पैकी १२५ पदे इडब्ल्यूएससाठी राखीव होती. उर्वरित ३५०० पदांच्या भरतीमध्ये इडब्ल्यूएस प्रवर्गासाठी आणखी ३०० च्या आसपास पदे राखीव असतील.

EWS Goa Bharti

घटनादुरुस्तीनंतर कायदा लागू झाल्यामुळे ईडब्ल्यूएससाठी १० टक्के जागा राखून ठेवणे बंधनकारक आहे. एससी, एसटी, ओबीसी आणि दिव्यांगांप्रमाणेच या प्रवर्गालाही आरक्षणाची तरतूद आहे. दरम्यान, ‘नीट’ परीक्षा रद्द झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला काहीसा विलंब होण्याची शक्यता आहे. ईडब्ल्यूएसच्या या नव्या निकषांमुळे राज्यातील काही जणांना लाभ होईल, तर काहींना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वैद्यकीय, अभियांत्रिकीच्या ३५० जागांवर प्रवेश

* बारावीचे निकाल लागल्यामुळे आता व्यावसायिक महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज भरून घेतले जात आहेत.

* यंदा वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि नर्सिंग या सर्व अभ्यासक्रमांमध्ये मिळून इडब्ल्यूएससाठी ३५० जागा उपलब्ध असतील.

* सर्वसाधारण गटात गुण असूनही प्रवेश न मिळणाऱ्या आर्थिक मागास विद्यार्थ्यांना या आरक्षणाचा मोठा फायदा होतो.

 

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड