देशातील युवकांसाठी खुशखबर! नोकरी लागल्यास सरकार 15,000 रुपये देणार! पूर्ण माहिती
ELI Scheme 2025 Important Details
ELI Scheme 2025 Important Details – Employment Linked Incentive (ELI Scheme) योजना ही केंद्र सरकारद्वारे जुलै 2025 मध्ये मंजूर केली गेली आहे. याचा उद्देश ग्रामीण, शहरी, औद्योगिक व सर्व क्षेत्रांमध्ये किमान 3.5 कोटी नवीन रोजगार निर्माण करणे हा आहे (1.92 कोटी पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या युवकांसाठी आणि बाकीच्या नोकऱ्यांसाठी) केंद्र सरकारने पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची योजना जाहीर केली आहे. एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेन्टिव्ह स्कीम (ELI Scheme) या नावाने ही योजना ओळखली जाणार आहे. येत्या 1 ऑगस्ट 2025 पासून ही योजना देशभर लागू होणार आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकार पहिल्या नोकरीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना एकूण 15,000 रुपये प्रोत्साहन भत्ता देणार आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारने ₹99,446 कोटींचं बजेट मंजूर केलं आहे. यामुळे देशातील कौशल्ययुक्त तरुणाईला रोजगार मिळवण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे, तसेच देशातील औद्योगिक क्षेत्रालाही चालना मिळणार आहे. (ELI Scheme) ELI स्कीमनुसार, 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 या कालावधीत ज्या तरुणांनी पहिल्यांदाच नोकरी स्वीकारली आहे आणि ज्यांचं PF (EPF) खातं पहिल्यांदा सुरू झालं आहे, अशा उमेदवारांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये 1 लाख रुपयांपर्यंत पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.
ELI स्कीमनुसार, 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 या कालावधीत ज्या तरुणांनी पहिल्यांदाच नोकरी स्वीकारली आहे आणि ज्यांचं PF (EPF) खातं पहिल्यांदा सुरू झालं आहे, अशा उमेदवारांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये 1 लाख रुपयांपर्यंत पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
यासाठी काही अटी लागू आहेत:
– कंपनी EPFO मध्ये नोंदणीकृत असावी
– जर कंपनीत 50 पेक्षा कमी कर्मचारी असतील, तर 2 नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती आवश्यक
– 50 पेक्षा अधिक कर्मचारी असल्यास, किमान 5 नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती आवश्यक
– हे कर्मचारी किमान 6 महिने सलग कंपनीत कार्यरत असावेत
अर्ज करण्याची गरज नाही :
सर्वात खास बाब म्हणजे, यासाठी वेगळा अर्ज करावा लागणार नाही. EPF खाते सुरू झाल्यानंतर आणि त्यात नियमित योगदान झाल्यानंतर, सरकारकडून थेट खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे. (ELI Scheme)
ELI योजना तरुणांसाठी नोकरीच्या संधी वाढवण्यासाठी आणि औद्योगिक क्षेत्रात रोजगार निर्मितीला गती देण्यासाठी एक मोठा पाऊल आहे. 1 ऑगस्ट 2025 नंतर पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या तरुणांनी यासाठी कोणतीही प्रक्रिया न करता थेट फायदा घेता येणार आहे.