एलिमेंटरी परीक्षा, शासकीय रेखाकला परीक्षेचे वेळापत्रक जाहीर – Elementary Exam 2025 Date
Elementary Exam 2025 Dates
Elementary Exam 2025 Date – महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाकडून शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.यानुसार या दोन्ही महत्त्वाच्या परीक्षा २४ ते २७ सप्टेंबर दरम्यान आयोजित केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना आता परीक्षेच्या तयारीसाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. यंदा प्रथमच नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत या परीक्षांचे आयोजन होत आहे. परीक्षेसाठी केंद्र नोंदणी, शाळांची नोंदणी आणि विद्यार्थ्यांची नावनोंदणी अशी संपूर्ण प्रक्रिया https://www.msbae.org.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे.त्यानुसार यंदा ही शासकीय रेखाकला परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे २०२५ सिल्याबस बघण्यासाठी येथे क्लिक करा.
संबंधित सर्व केंद्रप्रमुखांनी शासकीय रेखाकला परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे नावनोंदणी करताना दोन्हीपैकी (एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट) एकाच परीक्षेसाठी नावाची ऑनलाइन नोंदणी करावी. शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रांची नोंदणी, विद्यार्थ्यांची नोंदणी व परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळावर भरावे, याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांना कळवावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App