रेल्वेमध्ये 3366 पदांची जम्बो भरती उद्या पासून सुरु !

रेल्वे भरती सेल, पूर्व रेल्वे (Railway Recruitment Cell, Eastern Railway) ने अप्रेंटिस पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती (Recruitment) प्रक्रियेद्वारे एकूण 3366 पदांची भरती केली जाईल. ज्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करावयाचा आहे ते RRC ER च्या अधिकृत साइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

नोंदणी प्रक्रिया 4 ऑक्‍टोबर 2021 पासून सुरू होणार असून, 3 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत आहे. अर्जदारांनी लक्षात घ्यावे, की शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. निवडलेल्या उमेदवारांची यादी 18 नोव्हेंबर 2021 रोजी प्रदर्शित केली जाईल.

रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवाराने सरकारी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह दहावीची परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. पदांशी संबंधित अधिक शैक्षणिक पात्रता अधिकृत वेबसाइटवर तपासून घ्यावी. उमेदवाराची वयोमर्यादा 15 वर्षे ते 24 वर्षे यादरम्यान असावी. याशिवाय आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. अर्ज करताना सूचना काळजीपूर्वक वाचा, कारण फॉर्ममध्ये काही त्रुटी असल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

हे शुल्क असेल

अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्जाचे शुल्क म्हणून 100 रुपये भरावे लागतील. तर SC, ST, PWAD आणि महिलांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / इंटरनेट बॅंकिंग आदींद्वारे फी भरता येते. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

?Apply & All Details About Eastern Rail Recruitment 2021


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. Angad ganeshrao dalve says

    नवीन 2021 ची भरती

  2. Manisha Meshram says

    Kontya jaga ahet

  3. Shilpa Dagadu shinde says

    Kontya jaga aahet

  4. अभय नायबळ says

    कोणत्या जागा आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड