बंपर भरती! – ई-कॉमर्स कंपन्या 7 लाख लोकांना नोकर्‍या देणार! – E-Commerce Companies Vacancies 2023

E-Commerce Companies Flipkart Amazon and Ecom Express will give Jobs to 3 Lakh People

E-Commerce Companies will give Jobs to 7 Lakh People: Gig Jobs in India is currently underway in the country. In the meantime, people across the country are shopping in large numbers. E-commerce companies as well as many shops have started selling to attract citizens. In view of this, temporary recruitment is being done in many places to meet the demand of the customers. So far, more than 400,000 such gig jobs have been created, according to Business Standard. Another 300,000 such jobs are expected to be created this season.

 

देशात सध्या सणासुदीची धामधूम (Gig Jobs in India) सुरु आहे. या दरम्यान देशभरात नागरिक मोठ्या प्रमाणावर खरेदी करत असतात. नागरिकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्या तसेच कित्येक दुकानांमध्ये सेल सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी कित्येक ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपाची नोकर भरती होत आहे. आतापर्यंत अशा प्रकारचे तब्बल 4,00,000 गिग जॉब्स तयार झाले असल्याची माहिती बिझनेस स्टँडर्डने दिली आहे. या हंगामामध्ये असे आणखी 3 लाख जॉब्स तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

यावर्षी गिग जॉब्समध्ये तब्बल 40 टक्क्यांची वाढ होणार असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. 2022 सालच्या फेस्टिव्ह सीझनमध्ये डिसेंबरपर्यंत असे 4,00,000 गिग जॉब्स तयार झाले होते. मात्र यावर्षी ऑक्टोबर महिन्यातच हा आकडा गाठला गेला आहे. यंदा आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्डकप देखील भारतात होत आहे. या माध्यमातून देखील सुमारे एक लाखांहून अधिक गिग जॉब्स तयार झाले आहेत. डिलिव्हरी, ट्रान्सपोर्टेशन, हॉस्पिटॅलिटी आणि इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये नोकऱ्या तयार झाल्या आहेत.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

गिग जॉब्स वाढीमध्ये ई-कॉमर्स साईट्सचा मोठा (Gig Jobs in India) वाटा असल्याचं स्पष्ट झालं आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास एकट्या अमेझॉनने आतापर्यंत भारतात एक लाखांहून अधिक सीझनल नोकऱ्या तयार केल्याचं म्हटलं होतं. यासोबतच फ्लिपकार्टनेही एक लाख नवीन नोकऱ्या तयार केल्याचं स्पष्ट केलं आहे. या दोन्ही कंपन्यांचे मोठे सेल सध्या सुरू आहेत. तसंच दिवाळी अन् नाताळच्या आसपास देखील पुन्हा मोठ्या सेलची घोषणा होण्याची शक्यता आहे.

 


ई-कॉमर्स कंपन्या येत्या फेस्टिव्हल सीजनमध्ये आपली विक्री वाढविण्यासाठी बंपर नोकर भरती करणार आहेत. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन सारख्या अनेक ई-कॉमर्स कंपन्या देशातील जवळपास ३ लाख लोकांना नोकऱ्या देणार आहेत. RedSeer च्या अहवालानुसार, फेस्टिव्ह सीजन पाहता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे बहुतेक नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपात केल्या जातील. एवढेच नव्हे तर ई-कॉमर्स कंपन्यांकडून वस्तू वितरित करणार्‍या लॉजिस्टिक कंपनी ईकॉम एक्स्प्रेसनेही ३० हजार नवीन नोकऱ्यांची घोषणा केली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या कंपन्यांमध्ये नोकर भरती अपेक्षित आहे.

२० टक्के कामगारांची कपात नाही 

RedSeer च्या म्हणण्यानुसार, फेस्टिव्ह सीजन संपल्यानंतर तात्पुरत्या कामगारांपैकी २० टक्के कामगारांची कपात केली जाणार नाही. अलिकडच्या काळात लोकांमध्ये ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड वाढला आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन भारतात एक लाख लोकांची भरती करणार आहे. नवीन कर्मचारी ऑर्डर पॅकिंग, शिपिंग किंवा क्रमवारी लावण्यात मदत करतील. या कामरागांची नियुक्ती अर्धवेळ व पूर्णवेळ तत्त्वावर केली जाणार आहे.

याचबरोबर, अहवालात म्हटले आहे की, अंदाजे ३ लाख नोकऱ्यांपैकी ७० टक्के या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टद्वारे देण्यात येतील अशी अपेक्षा आहे, तर उर्वरित ईकॉम एक्स्प्रेस इत्यादी लॉजिस्टिक कंपन्या देतील. या नोकऱ्यांपैकी ६० टक्के लॉजिस्टिक्स कार्यात असल्याचा अंदाज आहे. उर्वरितपैकी २० टक्के वेअर हॉसिंग म्हणजेच गोदामात आणि २० टक्के ग्राहक सेवा कार्यात असू शकतात.

Flipkart मध्ये अशी असणार भरती

महिन्याच्या सुरूवातीला फ्लिपकार्टने म्हटले होते की, या फेस्टिव्हल सीजनमध्ये ७०,००० लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या नोकरी मिळण्यास मदत होईल. फ्लिपकार्टमध्ये थेट नोकर्‍या पुरवठा साखळी विभागात (supply chain department) देण्यात येतील. त्याअंतर्गत कंपनी डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह, पिकर्स, पॅकर्स आणि शॉटर्सची भरती करणार आहे. याशिवाय, कंपनी फ्लिपकार्टच्या सेलर पार्टनर लोकेशन आणि किराणा दुकानांमध्ये अप्रत्यक्षरित्या लोकांना नोकरी देईल.

सोर्स : लोकमत


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड