१५ वर्षांनंतर प्राध्यापकांना दिलासा; ‘कॅस’ अंतर्गत पदोन्नतीचा मार्ग मोकळा | DTE Mumbai Bharti 2026

DTE Mumbai Bharti 2026

तब्बल १५ वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नती प्रक्रियेला अखेर गती मिळाली असून, राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील अधिव्याख्यात्यांना ‘करिअर अॅडव्हान्समेंट स्कीम’ (कॅस) अंतर्गत लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. शैक्षणिक अर्हतेच्या अटीमुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या पदोन्नतीचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा होणार आहे.

विशेषतः १ जानेवारी १९९६ नंतर आणि २७ फेब्रुवारी २००३ पूर्वी नियुक्त झालेल्या अध्यापकांना पदव्युत्तर पदवीची अट पूर्ण न झाल्याने वरिष्ठ व निवड श्रेणी मिळण्यात अडचणी येत होत्या. त्या काळातील सेवाप्रवेश नियमांचा विचार करून शासनाने ही अट शिथिल केली असून संबंधित अध्यापकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

याशिवाय, उशिरा पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यामुळे ज्यांना लाभ नंतरच्या तारखेपासून देण्यात आला होता, त्यांच्या लाभाच्या दिनांकात सुधारणा करून पूर्वलक्षी लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुधारित दिनांकापासून लागू होणारी वेतनातील फरकाची रक्कम तात्काळ अदा केली जाणार आहे. हा निर्णय कायमस्वरूपी अध्यापकांसह २७ फेब्रुवारी २००३ पूर्वी अस्थायी किंवा हंगामी स्वरूपात नियुक्त होऊन नंतर नियमित झालेल्या अध्यापकांनाही लागू राहणार आहे.

तसेच, शासकीय व अशासकीय अनुदानित पदवी व पदविका संस्थांमधील कंत्राटी अथवा हंगामी सेवेतून नियमित झालेल्या प्राध्यापकांनाही ‘कॅस’चा लाभ मिळणार आहे. पूर्वलक्षी पदोन्नती, प्रशिक्षणासाठी मुदतवाढ, पीबी-४ साठी पीएच.डी.ची सक्ती रद्द करणे आणि उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मुदत देणे अशा तरतुदींमुळे हजारो प्राध्यापकांच्या पदोन्नतीचा मार्ग अखेर मोकळा होणार आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Previous Post:

DTE Mumbai Bharti 2025

DTE Mumbai Bharti 2025: The Directorate of Technical Education in Maharashtra has published recruitment notifications for vacant posts of “Eminent educationist who has worked as Vice-Chancellor of the University, An expert of repute from the field of Professional Education”. There are a total of 02 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can send their application to the given address or through e-mail before the last date. The Last date of application is 28th of February 2025. For more details about DTE Mumbai Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र तंत्रशिक्षण संचालनालय अंतर्गत “विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केलेले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, व्यावसायिक शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित तज्ज्ञ” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे.

DTE Mumbai Offline Application 2025

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावविद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केलेले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, व्यावसायिक शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित तज्ज्ञ
  • पदसंख्या02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता[email protected]
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, 3, महापालिका मार्ग, पी.बी. क्र. 1967, मुंबई-400001.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख28 फेब्रुवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://dte.maharashtra.gov.in/

DTE Mumbai Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केलेले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ01
व्यावसायिक शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित तज्ज्ञ01

How To Apply For DTE Mumbai Jobs 2025

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For dte.maharashtra.gov.in Bharti 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/fopM2
✅ अधिकृत वेबसाईट
https://dte.maharashtra.gov.in/

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड