Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पोलीस तक्रार प्राधिकरणांतील रिक्त पदे भरणार, उच्च न्यायालयाचा आदेश । Police Complaint Authority Mumbai Bharti 2024

Police Complaint Authority Mumbai Bharti 2024

Police Complaint Authority Mumbai Bharti 2024 

न्यायालयाच्या दणक्यानंतर अखेर राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणांतील रिक्त पदे भरण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे. गृह विभागाच्या मागणीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य व विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणांतील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करीत ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण स्थापन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने २५ जून २०१४ रोजी दिले होते. त्यानुसार राज्यात पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. मात्र या प्राधिकरणातील २५ पैकी २३ पदे रिक्त असल्याची माहिती माहिती अधिकार कायद्याद्वारे उघडकीस आली आहे. राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण पूर्णपणे कार्यरत नसल्याने सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आणि विधी विभागाचा विद्यार्थी जिनय जैन यांनी अॅड. यशोदीप देशमुख आणि अॅड. विनोद सांगविकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.

 

खंडपीठाने सरकारच्या या उदासीनतेवर फटकारल्यानंतर गृह विभाग खडबडून जागा झाला. राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणातील दोन सदस्य तसेच नागपूर, नवी मुंबई, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नाशिक या विभागीय तक्रार प्राधिकरणांतील प्रत्येकी एक सदस्य या रिक्त पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले आहेत.

 


Police Complaint Authority Mumbai Bharti 2024: The state government on Thursday informed the High Court that it is in the process of filling up vacant posts in the State Police Complaints Authority (Police takrara pradhikaran Bharti 2024). The court, however, expressed displeasure over the pace of filling up of these posts. The court also said that these posts need to be filled immediately and if they are not filled, the functioning of the authority will come to a standstill.

 

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राज्य सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयात दिली. मात्र, ही पदे भरण्याच्या गतीबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तसेच, ही पदे तातडीने भरण्याची -आवश्यकता असून ती भरली न गेल्यास प्राधिकरणाचे कामकाज ठप्प होईल, असे -ताशेरे न्यायालयाने सुनावले. 

 

प्राधिकरणाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.. त्यामुळे, प्राधिकरणाबद्दलच्या जागरूकतेसाठी राज्यातील पोलीस ठाण्यांकडून काय प्रयत्न केले जात आहेत हे स्पष्ट करण्याचे आदेशही मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने दिले. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आणि कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या जिनय जैन यांनी वकील यशोदीप देशमुख यांच्यामार्फत जनहित याचिका केली आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार स्थापन केलेल्या प्राधिकरणातील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे. राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी, पोलीस अधिकाऱ्यांच्या कामकाजाविरुद्ध नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी अर्ध-न्यायिक संस्था म्हणून राज्य पोलीस तक्रार निवारण प्राधिकरण स्थापन करण्यात आले होते.

 

या प्रकरणी गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी, राज्य आणि विभागीय स्तरावरील पोलीस तक्रार प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून, कर्मचाऱ्याची बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्ती करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित धोरणाचा पुनर्विचार केला जात असल्याचे सरकारी वकील पी. पी. काकडे यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर, रिक्त पदे भरणे महत्त्वाचे आहे अन्यथा प्राधिकरणाचे कामकाज ठप्प होईल, असे न्यायालयाने सुनावले. या प्राधिकरणांमधील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अधिकाऱ्यांना त्यांचे काम करणे कठीण होऊन बसले आहे, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर प्राधिकरणाबाबत काही प्रमाणात प्रसिद्धी देण्यात आली. तथापि, प्राधिकरणाबद्दल नागरिकांना माहिती देणारे फलक सर्व पोलीस ठाण्यांमध्ये लावण्यात आले आहेत की नाही हे सरकारने स्पष्ट केलेले नसल्याकडे याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले.


Police Complaints Authority Mumbai is going to recruit vacant posts of “Investigating Officer, Administrative Officer, Senior Clerk, Stenographer (Senior Grade)”. There are a total of 09 vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can apply before the 23rd of October 2023. More details are as follows:-

पोलिस तक्रार प्राधिकरण मुंबई अंतर्गत “तपास अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक (वरिष्ठ श्रेणी)” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023 आहे.

मुंबई जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

  • पदाचे नावतपास अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक (वरिष्ठ श्रेणी)
  • पदसंख्या09 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • वयोमर्यादा – 64 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, ४ था मजला कुपरेज टेलीफोन एक्सचेंज बिल्डींग, महिर्षी कर्वे रोड, मुंबई- ४०००२१
  • ई-मेल पत्ता – [email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख23 ऑक्टोबर 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता- राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, ४ था मजला कुपरेज टेलीफोन एक्सचेंज बिल्डींग, महिर्षी कर्वे – रोड, मुंबई- ४०० ०२१ मुंबई
  • मुलाखतीची तारीख – 
    • तपास अधिकारी – 31 ऑक्टोबर 2023
    • इतर पदे – 01 नोव्हेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://mumbaipolice.gov.in/

Police Complaint Authority Mumbai Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
तपास अधिकारी 06
प्रशासकीय अधिकारी 01
वरिष्ठ लिपिक 01
लघुलेखक (वरिष्ठ श्रेणी) 01

How To Apply For Police Complaint Authority Mumbai Recruitment 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Police Complaint Authority Mumbai Notification 2023

  • या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे.
  • मुलाखतीची तारीख 31 ऑक्टोबर 2023, 01 नोव्हेंबर 2023 (पदांनुसार) आहे.
  • उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पट्टीवर दिलेल्या वेळेत मुलाखतीकरिता हजर रहावे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mumbaipolice.gov.in Bharti 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/jknz9
✅ अधिकृत वेबसाईट https://mumbaipolice.gov.in/

 


Maharashtra State Police Grievance Authority and Divisional Police Grievance Authority

  • Under section 22(5) of the Maharashtra Police (Amendment and Continuation) Act, 2014, the State Police Complaints Authority, Mumbai (Rapotpra) and under section 22(c) a total of six Divisional Police Complaints Authorities (Vipotpra), one for each division. They have been established in Mumbai (Kokan), Nashik, Pune, Chhatrapati Sambhajinagar, Amravati and Nagpur.

 

महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण व विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण

  • महाराष्ट्र पोलीस (सुधारणा व पुढे चालू ठेवणे) अधिनियम, २०१४ च्या कलम २२ (५) अन्वये राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, मुंबई (रापोतप्रा) येथे व कलम २२ (स) अन्वये प्रत्येक विभागासाठी एक अशी एकूण सहा विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणे (विपोतप्रा) नवी मुंबई (कोकण), नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर येथे स्थापन करण्यात आलेली आहेत.

 

  • महाराष्ट्र रापोतप्रा व विपोतप्रा पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध हाताळल्या जाणाऱ्या तक्रारींचे स्वरुप खालीलप्रमाणे असेल-
  1. पोलीस कोठडीतील मृत्यू :
  2. गंभीर दुखापत;
  3. बलात्कार किंवा बलात्कार करण्याचा प्रयत्न
  4. विहित केलेली कार्यपद्धती न अनुसरता केलेली अटक किंवा स्थानबद्धता
  5. भ्रष्टाचार;
  6. बलादग्रहण (खंडणी उकळणे);
  7. जमीन किंवा घर बळकावणे; आणि
  8. ज्यामध्ये कायद्याच्या कोणत्याही तरतुदींचे गंभीर उल्लंघन किंवा कायदेशीर प्राधिकाराचा दुरुपयोग याचा अंतर्भाव असेल अशी इतर कोणतीही बाब.
  • महाराष्ट्र रापोतप्रा व विपोतप्रा यांची कार्ये व अधिकार-
  1. वरील बाबीसंबंधी पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे पोलिसांसंबंधी दाखल करण्यात आलेल्या एखाद्या तक्रारीवर चौकशी करणे; तसेच, कोणत्याही व्यक्तीस प्राधिकरणाच्या मते, चौकशीच्या विषयवस्तुशी उपयुक्त, किंवा संबद्ध होऊ शकेल अशा मुद्यावर किंवा बाबीवर माहिती पुरविण्यासाठी फर्मावणे,
  2. पोलीस तक्रार प्राधिकरणास, पोट-कलम (१) मध्ये निर्देशिलेल्या कोणत्याही बाबींची चौकशी करतेवेळी, पुढील बाबींच्या संबंधात, दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ खाली एखाद्या दिवाणी दाव्याची न्यायचौकशी करतेवेळी दिवाणी न्यायालयाला जे अधिकार आहेत ते सर्व अधिकार असतील :-
  • साक्षीदारांना समन्स पाठविणे व त्यांना हजर राहण्यास भाग पाडणे आणि त्यांची शपथेवर तपासणी करणे;
  • कोणत्याही दस्तऐवजाचा शोध घेण्यास व तो सादर करण्यास फर्मावणे.
  • शपथपत्रांवर पुरावा स्वीकारणे.
  • कोणताही सार्वजनिक अभिलेख किंवा त्याची प्रत कोणत्याही न्यायालयाकडून किंवा कार्यालयाकडून मागविणे साक्षीदारांची किंवा दस्तऐवजांची तपासणी करण्याकरिता आयोगपत्र काढणे.
  • राज्य शासनाकडून विहित करण्यात येतील अशा इतर कोणत्याही बाबी.

सर्व नागरिकांच्या माहितीसाठी वर नमुद केलेल्या राज्य व ६ विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणांचे पत्ते व संपर्क खालीलप्रमाणे आहेत-

  • राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, ४ था मजला, एम. टी. एन. एल बिल्डींग, कूपरेज फुटबॉल मैदानासमोर, महर्षी कर्वे रोड, नरीमन पॉईट, मुंबई ४०००२१. ई-मेल [email protected]
  • विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, नवी मुंबई (कोकण) विभाग, पहिला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज, प्लॉट क्र. ७ ब, सेक्टर २१, खारघर, नवी मुंबई.
  • विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, पुणे विभाग, पुणे, अनंत हाईट्स, पहिला मजला, जाधव नगर, सर्व्हे नं. २९/२/१, नांदेड फाटा, खडकवासला रोड, पुणे-४११०६८. ईमेल [email protected]
  • विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, नाशिक विभाग, नाशिक, अजय पॅलेस, पौर्णिमा स्टॉप, नाशिक- पुणे रोड, नासर्डी पुलाजवळ, द्वारका, नाशिक, दूरध्वनी क्र. ०२५३२५९४०१६. ई-मेल [email protected]
  • विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर, साई ट्रेड सेंटर, आर. टी. ओ. कार्यालयाच्या बाजूला, रेल्वे स्टेशन रोड, छत्रपती संभाजी नगर-४३१००१. दूरध्वनी क्र. ०२४०- २९९१२३५ ई-मेल [email protected]
  • विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, अमरावती विभाग, अमरावती, पोलीस आयुक्त कार्यालय. अमरावती शहर, मालटेकडी रोड, कॅम्प अमरावती. दूरध्वनी क्र. ०७२१२५५१००१ ई-मेल- [email protected]
  • विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, नागपूर विभाग, नागपूर, प्रशासकीय ईमारत क्र. २. तिसरा माळा, बी विंग, सिव्हील लाईन्स, नागपूर शहर, नागपूर – ४४०००१. दूरध्वनी क्र. ०७१२२९९४१६७. ई-मेल [email protected]

 

Police Complaint Authority Mumbai Bharti 2023

Police Complaint Authority Mumbai Bharti 2023: According to the RTI details received in December 2021, the functioning of the authority is not running at full capacity, the website of the authority required by the police personnel and other matters are also incomplete. Further details are as follows:-

डिसेंबर २०२१ मध्ये मिळालेल्या माहिती अधिकार तपशिलानुसार प्राधिकरणाचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू नाही, पोलिस कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेले प्राधिकरणचे संकेतस्थळ आणि अन्य बाबीही अपूर्ण आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात सर्वसामान्य नागरिकांनी केलेल्या अनेक तक्रारी प्रलंबित असून ही संख्या दिवसागणिक वाढत आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

  • विभागीय स्तरावरील तक्रार निवारण मंच परिस्थितीही अशीच असून यामुळे नागरिकांच्या दाद मागण्याच्या अधिकारांवर बाधा येत आहे, असे त्यांनी याचिकेत म्हटले.
  • प्राधिकरणची पहिली समिती २०१७ मध्ये नियुक्त झाली असून तीन वर्षांसाठी ही मुदत आहे.
  • या समितीचा कालावधी २०२० मध्ये संपला.
  • एकूण पंचवीस पदांपैकी सध्या फक्त अध्यक्ष आणि सदस्य सचिवाची नियुक्ती झाली आहे.
  • मात्र अन्य पदे रिक्त असल्यामुळे पूर्ण क्षमतेने काम होऊ शकत नाही, असे याचिकेत स्पष्ट केले आहे.
  • तसेच या तक्रार निवारण मंचाचा लाभ नागरिकांसाठी आहे, त्यामुळे त्याबाबत जनजागृती आणि संकेतस्थळ अपडेट करणे आवश्यक आहे, राज्य सरकारने यासाठी योजना आखावी, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे.

अपुरा आर्थिक निधी आणि मनुष्यबळ असलेल्या पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणामधील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली आहे. तशी जनहित याचिका मेधा पाटकर यांनी ॲड. यशोदीप देशमुख आणि ॲड. विनोद सांगवीकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली.


Police Complaint Authority Mumbai Bharti 2021 : पोलिस तक्रार प्राधिकरण मुंबई येथे सदस्य पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 फेब्रुवारी 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सदस्य
  • पद संख्या – 1 जागा
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस उपआयुक्त मुख्यालय, नवी मुंबई तथा कार्यालय प्रमुख विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, नवी मुंबई (कोंकण), पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे कार्यालय, भारतीय रिसर्व्ह बँक समोर सेक्टर १० सी.बी. डी. बेलापूर नवी मुंबई
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 फेब्रुवारी 2021 आहे

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Police Complaint Authority Mumbai Bharti 2021

PDF जाहिरात : http://bit.ly/3oSMn5W

अर्ज नमुना : http://bit.ly/39EHXcw

अधिकृत वेबसाईट : mumbaipolice.gov.in

Police Complaint Authority Recruitment 2021 – For Retired Officer Post

Police Complaint Authority Mumbai Recruitment 2021 : Divisional Police Complaint Authority Mumbai has published a notification for the recruitment of a Retired Officer for the posts of Member. Interested and eligible candidates can send their application to the mentioned address before the last date. The last date of submission of the application is the 2nd of February 2021. Further details are given below.

Police Complaint Authority Mumbai Recruitment – संपूर्ण माहिती

Police Complaint Authority Bharti Details

Name of Department Police Complaint Authority Mumbai
Recruitment Details
Police Complaint Authority Mumbai Recruitment 2021
Name of Posts Member
Total Posts 01
Application Mode Offline
Official Website www.mumbaipolice.gov.in

Vacancy Details

Retired Officer 01

All Important Dates

Last Date For Offline Application 2nd of February 2021

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

6 Comments
  1. Amol mane says

    Nokri sarkari
    Who is tell me

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड