लेखा व खजिना संचालनालयात मिळणार 215 उमेदवारांना नोकरी!! जाणून घ्या अधिक माहिती

Directorate of Accounts and Treasury Bharti

Directorate of Accounts and Treasury Bharti Details 

Directorate of Accounts and Treasury Bharti : Due to Corona, the recruitment process was canceled by the Directorate of Accounts and Treasury. This decision was quashed by the Maharashtra Administrative Tribunal (MAT). This will benefit 215 candidates. The way to their appointment is going to be clear. Further details are as follows:-

Directorate of Accounts and Treasury Vacant Posts

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कोरोनामुळे लेखा व खजिना संचालनालयाने भरती प्रक्रिया रद्द केली होती. हा निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) रद्द केला. याचा लाभ २१५ उमेदवारांना मिळणार आहे. त्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मॅट अध्यक्ष मृदुला भाटकर व सदस्य मेधा गाडगीळ यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता इतर सर्व विभागातील भरती प्रक्रिया थांबविण्यात आल्या आहेत, असा अध्यादेश वित्त विभागाने ४ मे २०२० रोजी जारी केला. हा अध्यादेश अजूनही लागू आहे. निवड झालेल्या उमेदवारांच्या यादीला मुदतवाढ देण्यास आम्ही असमर्थ आहोत ही प्रशासनाची भूमिका अमान्य आहे, असेही मॅटने नमूद केले.

The Directorate of Accounts and Treasury has invited applications for the posts in June 2019. Applications were invited for 930 posts of Accounts Clerk, Audit Clerk, Junior Accounts Clerk and Junior Audit Clerk. By March 2020, 715 of these posts had been filled. A selection and waiting list was prepared for the remaining 215 posts. On 9th and 12th August 2021, the administration announced the cancellation of recruitment process for the remaining posts. This decision was taken as per the ordinance of 13 June 2018. The ordinance states that if the waiting list recruitment process is not completed within a year, then the recruitment process itself is canceled.

याविरोधात काही उमेदवारांनी मॅटमध्ये धाव धेतली. कोरोनामुळे एक वर्ष प्रशासकीय कामकाज बंद होते. त्यामुळे हा कालावधी भरती प्रक्रिया रद्द करण्यासाठी ग्राह्य धरला जाऊ नये, असा युक्तिवाद उमेदवारांनी केला. मात्र अध्यादेशानुसार एक वर्ष भरती प्रक्रिया पूर्ण न झाल्यास ती रद्द होते. त्याप्रमाणेच ही भरती प्रक्रिया रद्द झाली आहे व ती योग्य आहे, असा दावा प्रशासनाने केला.

त्यावर मॅट म्हणाले, महाराष्ट्रात कोरोनाचा प्रभाव झपाट्याने झाला. पहिल्या व दुसऱ्या लाटेने जनजीवन ठप्प झाले. कोरोनामुळे सरकारी कार्यालये पूर्णक्षमतेने काम करत नव्हती. सरकारी कार्यालयांना मिळणारी मुभा मान्य केली जाऊ शकते, तर, नियुक्तीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनाही थोडी सवलत मिळायला हवी.

लॉकडाऊनमुळे प्रशासकीय कामकाज बंद होते, असे कारण देत संबंधित उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली नाही. लॉकडाऊनचे नियम अंशत: शिथिल करण्यात आले होते. आता तर प्रशासकीय कामकाज नियमितपणे सुरू आहे. निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी लॉकडाऊन आधी किंवा नंतर करता आली असती, असे नमूद करत मॅटने उर्वरित पदांची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय रद्दबातल ठरवला व उर्वरित पदे भरण्याचे आदेश दिले.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड