Dhulivandan Wishes in Marathi 2024 – हाय फ्रेंड्स, धूलिवंदन, एक असा सण जो आनंदानी भरून असतो, आपल्याला माहीतच आहे फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री विधिपूर्वक होळी पेटवली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा होळी विझलेली असते, तेव्हा तेथील राख एकमेकांच्या अंगाला फासून धुळवड खेळून नंतर आंघोळ केली जाते. यात रंगाचा वापर व्हायला लागलाय. त्यामुळे धुलीवंदनाला एकमेकांना रंग लावून धुळवड साजरी करतात. तसेच, फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे आणि म्हणूनच हा दिवस रंगपंचमी म्हणून ओळखला जातो. यामुळे फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणजे होळी साजरी करतात, पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन/धुळवड साजरा होतो आणि यानंतर येणाऱ्या पंचमीच्या दिवशी रंगपंचमी साजरी करतात.


सूर्याच्या दाहकतेवर करूया पाण्याचा शिडकाव
ह्रदयात मिसळूया स्नेह हास्याचा भाव,
होऊ तल्लीन सप्तसुरात,
रंगवू एकमेकांना सप्तरंगात.
धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा”
गोड धोड खाद्याचा घेऊया आस्वाद,
प्रेम भाव निर्माण करू,
मिटवूया एकमेकातला वाद
खेळूया रंग उधळूया रंग,
तुम्हाला धुळवडीच्या शुभेच्छा”
“नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा
हिरवा, गुलाबी, गुलालाचा
पिचकारीत भरून सारे रंग
रंगवूया एकमेकांना
धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
“भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,
अखंड उडू दे मनि रंगतरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग!
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा”
“रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
साजरा करू होळी संगे…
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा”
“सुखाच्या रंगांनी आपले
जीवन रंगीबेरंगी होवो,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा! “



अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















