महसूल विभागाच्या तीन नवीन ऑनलाईन सुविधा; जाणून घ्या!

Department of Revenue Online Facilities

Department of Revenue Online Facilities

Department of Revenue Online Facilities : Three new online facilities for the revenue department. Next Sunday on the backdrop of Revenue Day. From August 1, three more new online revenue services will be available to the people of the state. Further details are as follows:-

Mahasul Vibhag Online Link

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महसूल दिनाच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी दि. १ ऑगस्टपासूनच राज्यातील जनतेला महसूल विभागाच्या आणखी तीन नवीन ऑनलाईन सुविधा उपलब्ध होणार आहे. यामध्ये आतापर्यंत डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उपलब्ध करून देण्यात आला असून, यापुढे डिजिटल स्वाक्षरीत फेरफार, नवीन सातबारा आणि मिळकत पत्रकांचे फेरफारदेखील ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या तिन्ही नवीन सुविधांचा आरंभ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Department of Revenue Online Facilities

दैनंदिन कामासाठी लागणारा सातबारा, आठ ‘अ’चा उतारा, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड फेरफार सहज व विना हेलपाट्याशिवाय मिळण्यासाठी शासनाने डिजिटल सातबारा प्रकल्प सुरू केला. राज्यात गेल्या दीड-दोन वर्षांपासून ऑनलाईन व डिजिटल सातबारा दैनंदिन व्यवहारात वापरण्यात येत असून, दिवसाला तब्बल एक लाख डिजिटल स्वाक्षरीत सातबारे वापरले जात आहेत. या येत्या १ ऑगस्ट पासून डिजिटल स्वाक्षरीत सातबाऱ्यासोबतच डिजिटल स्वाक्षरीत फेरफार देखील नागरिकांना घर बसल्या उपलब्ध होणार असल्याचे या प्रकल्पाचे राज्याचे समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले.

राज्यात सन २०१५-१६ पासून ऑनलाईन फेरफार मोहिम सुरू करण्यात आली. यात आतापर्यंत राज्यातील १ लाख ३६ हजार फेरफार ऑनलाईन करण्यात आले असून १ कोटी १८ हजार फेरफार डिजिटल स्वाक्षरीत उपलब्ध आहेत. आता हे सर्व फेरफार डिजिटल स्वाक्षरीत ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

राज्यात १ ऑगस्टपासून नवीन सातबारा 

राज्यातील सातबाऱ्यात तब्बल पन्नास वर्षांनंतर बदल करण्यात आले आहे. नवीन सातबारा साधा, सहज समजेल व सुटसुटीत संगणकीय सातबाऱ्याच्या गरजा व सर्वसामान्य नागरिकांना सहज समजेल अशा भाषेत हा सातबारा तयार केला आहे. राज्यातील सर्व २ कोटी ४५ लाख सातबारे नवीन बदलासह तयार झाले असून, नागरिकांना १ ऑगस्टपासून नवीन सातबारा उपलब्ध होणार आहे. याशिवाय मिळकत पत्रकांचे फेरफार ऑनलाईन मिळणार आहेत.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड