Mahsul Vibhag Bharti Update
राज्यातील महसूल प्रशासनातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी, या उद्देशाने महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार या विभागाच्या रचनेत मोठे बदल होणार आहेत. एकूण ३५ हजार ८७६ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. मुद्रांक, भूमी अभिलेख आणि महसूल विभाग या तिन्ही विभागांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. तब्बल वीस वर्षांनंतर महसूल विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंधास सरकारने मंजुरी दिली असून, गुरुवारी याबाबतचा शासन निर्णय जारी झाला आहे. याआधी, महसूल विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध २००६ मध्ये झाला होता. मागील वीस वर्षांत महसूल व बिगर महसुली कामात अनेक बदल झाले.
महाराष्ट्रात लवकरच १ हजार ७०० पेक्षा जास्त तलाठ्यांची पदभरती जाहिरात! Talathi Bharti 2026
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्य सच्चि राजेश अग्रवाल, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सच्चि विकास खारगे यांच्याशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती या आकृतिबंधाला मान्यता दिली. महसूल विभागातील ३४ हजार ५७६ नियमित व १३०० बाह्यस्रोतांद्वारे असे मिळ ३५,८७६ पदांचा आकृतीबंध शासनाने मान्य केला आहे.
प्रशासकीय पुनर्रचना व नवीन कार्यालये
नवीन संरचनेत विभाग, जिल्हा आणि तालुन पातळीवरील कार्यालयांचा समावेश आहे. यात ६ विभागीय आयुक्तालये, ३६ जिल्हाधिकारी कार्यालये, १९२ महसूल उपविभागीय कार्यालये आणि ३६० तहसीलदार कार्यालयांचा समावेश आहे.
Revenue department circular
राज्यात खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळवलेले, संशयास्पद वाटणारे तसेच केवळ आधार कार्ड दाखवून जारी केलेले जन्म–मृत्यू दाखले रद्द करण्याची मोठी कारवाई सरकारकडून सुरू झाली आहे. यासंबंधीचे परिपत्रक महसूल विभागाने गुरुवारी जारी केले असून राज्यातील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना १६ निकषांच्या आधारे सर्व दाखले पडताळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















