लष्करात देशसेवेची संधी!! आज लष्कराच्या TA बटालियनची महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी प्रक्रिया राबविली जाईल | Deolali TA Army Bharti 2024

Deolali TA Army Bharti 2024

Deolali TA Army Bharti 2024 –  येथील टीए बटालियनच्या वतीने रविवारी (दि. १०) महाराष्ट्र राज्यातील अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यातील तरुणांना संधी देण्यात आली. या जिल्ह्यांमधून सुमारे आठ हजार तरुणांनी भरती प्रक्रियेदरम्यान हजेरी लावल्याचे सैन्याच्या सूत्रांनी सांगितले. आनंदरोड मैदानावरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल येथे ही खुली भरती प्रक्रिया राबविण्यात आली.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

यापूर्वी राजस्थानच्या अजमेर, अलवर, जोधपूर, भरतपूरसह विविध जिल्ह्यांतून सहा हजारांपेक्षा अधिक तरुणांनी नशीब आजमावले. प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी ‘११६ टीए’ पॅरा बटालियनचे अधिकारी व जवान प्रयत्नशील आहेत.
आता जिल्हानिहाय भरती
आज, दि. ११ नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, नंदुरबार, सोलापूर, सांगली व सातारा येथील उमेदवारांसाठी प्रक्रिया राबविली जाईल. उद्या, दि. १२ नोव्हेंबर रोजी मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील तरुणांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे


Deolali TA Army Bharti 2024 –  कोरोना काळापासून लष्कराच्या टीए बटालियनची खुली भरती प्रक्रिया थांबलेली होती. मात्र आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रासह इतर सात राज्यांतील तरुणांना लष्करात सामील होण्याची संधी मिळणार आहे. या भरतीबाबतची अधिकृत अधिसूचना १२ ऑक्टोबर रोजी रोजगार समाचारमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

करोनामुळे रखडलेल्या खुल्या लष्कर भरती प्रक्रियेला देवळालीच्या शिगवे बहुला रोडवरील ११६ टीए पॅराबटालियनद्वारे सुरुवात झाली. ८१ सैनिक आणि ५७ इतर पदांसाठी ही भरती आहे. पहिल्याच दिवशी तेलंगणा, गुजरातसह केंद्रशासित प्रदेशातील तरुणांना संधी देण्यात आली होती. सोमवारी सुमारे तीन हजार युवक दाखल झाले होते.

Deolali Territorial Army Bharti Last Date

देवळालीतील टेरिटोरियल आर्मीच्या (टीए) ११६ पॅरासह ११८, १२३ (ग्रॅनाडियर्स) या तिन्ही इन्फंट्री बटालियनमध्ये सर्वसाधारण सैनिकांसह इतर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरूवात झाली. पहिल्या दिवशी तेलंगणा, गुजरात, गोवा या तीन राज्यांसह दादरा-नगर-हवेली, दीव-दमन, लक्षदीप आणि पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील युवक मोठ्या प्रमाणात आनंदरोड मैदानावरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल येथे दाखल झाले होते. उमेदवारांची उंची वजन, छाती मोजणी करुन निवड चाचणी प्रक्रिया पार पडली. मंगळवारी आंध्र प्रदेश, बुधवारी तामिळनाडू आणि केरळ, गुरूवारी कर्नाटक, शुक्रवारी आणि शनिवारी राजस्थान (जिल्हानिहाय), तर रविवारी ते मंगळवार दरम्यान महाराष्ट्रातील जिल्हानिहाय उमेदवारांना सहभागी होता येईल. १३ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत कागदपत्रे तपासणी, वैद्यकीय तपासणी, पात्र उमेदवारांच्या प्रलंबित समस्या यांची पाहणी करण्यात येईल.

लष्कराच्या टीए बटालियनची खुली भरती प्रक्रिया ही कोरोना काळापासून बंदच होती. मात्र नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून महाराष्ट्रासह अन्य सात राज्यांतील तरुणांना खुल्या भरतीद्वारे लष्करात देशसेवेची संधी देण्याचा निर्णय झाला आहे. यावावत १२ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या रोजगार समाचारमार्फत आधीच जाहीर सूचना प्रसिद्ध झाली आहे. तसेच लष्कराच्या अधिकृत सूत्रांकडूनही या भरतीबाबत कळविण्यात आले आहे.

येथील ११६ टीए पैरा बटालियनसह ११८ टीए, १२३ टीए (ग्रॅनेडियर्स) या तिन्ही इन्फ्रट्री बटालियनमध्ये ८१ सोल्जर व ५७ ट्रेडमनच्या पदांसाठी ४ ते १६ नोव्हेंबर दरम्यान एकत्रित खुली भरतीप्रक्रिया येथील आनंद रोड मैदानासह टीए बटालियनमध्ये तब्बल १२ दिवस राबविली जाणार आहे.

Deolali TA Army Bharti 2024 Schedule

यादरम्यान ४ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राबाहेरील तेलंगण, गुजरात, गोवा, दादरा नगर हवेली, दीव-दमण, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीमधील उमेदवार

  • ५ रोजी आंध्र प्रदेश
  • बुधवार ६ रोजी तमिळनाडू व केरळ,
  • ७ रोजी कर्नाटक,
  • ८ रोजी राजस्थान (जिल्हानिहाय),
  • तर १० ते १२ नोव्हेंबरदरम्यान महाराष्ट्रातील जिल्हानिहाय उमेदवारांच्या निवड चाचण्या होणार आहेत.

Deolali TA Army Bharti 2024 Selection Process

१३ ते १६ नोव्हेंबर दरम्यान कागदपत्रे तपासणी, ट्रेड टेस्ट, मेडिकल टेस्ट पात्र उमेदवारांच्या अन्य समस्यांसाठी तीन दिवस राखीव ठेवले आहे. या सरळ भरतीद्वारे ८१ सोल्जर (जनरल ड्यूटी) तर ५७ जागांसाठी ट्रेडमन पदाच्या भरती होणार असून यामध्ये शेफ (कुक), हेअर ड्रेसर, हाऊसकिपर, वॉशरमैन, क्लर्क अशा जागा असतील. पात्र उमेदवारांनी आधीच जाहीर केल्यानुसार आपल्या राज्य व जिल्ह्यानुसार होणाऱ्या तारखेला पहाटे ६ वा. मैदानावर हजर होणे अनिवार्य आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड