DElEd निकाल जाहीर- राज्यात नऊ हजार DElEd विद्यार्थी उत्तीर्ण – DElEd Result 2025 @ mscepune.in

DElEd Result 2025 @ mscepune.in

DElEd Result 2025 @ mscepune.in – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या DElEd परीक्षेचा निकाल मंगळवारी (Dt. 4 Aug) सकाळी जाहीर झाला. यानुसार राज्यात ६४.७५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना हा निकाल www.mscepune.in संकेतस्थळावर पाहता येणार आहे. या सदर परीक्षा ३ ते १२ जूनदरम्यान पार पडली. राज्यातून १३ हजार ५२६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ९,००२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ४,८९९ विद्यार्थ्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. निकालाचे मूळ गुणपत्रक संबंधित विद्यार्थ्यांना अध्यापक विद्यालयामार्फत मिळेल. उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी करायची झाल्यास व छायाप्रत हवी असल्यास विद्यार्थ्यांना २० ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली.

 

DElEd Result 2025 mscepune.in

 

माध्यमनिहाय चित्र

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • मराठी : या माध्यमासाठी ९ हजार ९६१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ९ हजार ६५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ६ हजार २५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
  • उर्दुः या माध्यमासाठी २ हजार ३१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २ हजार २७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १ हजार ६६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
  • हिंदी : या माध्यमासाठी २६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २५७विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील २१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
  • इंग्रजी : या माध्यमासाठी १ हजार ३३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ८४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
  • कन्नड : या माध्यमासाठी ३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्या सर्वांनीच परीक्षा दिली असून, सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड