शिक्षकांसाठी खुशखबर! TET वैधतेबाबत महत्त्वाचा निर्णय

CTET TET Validity

CTET TET Validity: शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन (NCTE) ने केंद्रीय शिक्षक पात्रता परिषद आणि अन्य शिक्षक पात्रता परीक्षांसंबंधी (TET) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एनसीटीईचा हा निर्णय लाखो उमेदवारांना मोठा दिलासा देणारा आहे.

एनसीटीईने आता सेंट्रल टीचर्स एलिजिबिलीटी टेस्ट किंवा देशातील कोणत्याही अन्य राज्यस्तरीय शिक्षक पात्रता परीक्षेला आतापर्यंत असलेली सात वर्ष वैधतेची मर्यादा हटवली आहे. अलीकडेच एनसीटीईच्या ५० व्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयाचा अर्थ काय? – CTET TET Validity

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

यापूर्वी टीईटीची वैधता सात वर्षांची होती. म्हणजेच जेव्हा परीक्षार्थी परीक्षा उत्तीर्ण होत, तेव्हापासून पुढील सात वर्षांपर्यंत कोणत्याही सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी करण्यास पात्र असत. मात्र एनसीटीईने आता हा निर्णय घेतला आहे की सर्व शिक्षक पात्रता परीक्षांचे प्रमाणपत्र आयुष्यभरासाठी वैध राहील. म्हणजेच आता जे उमेदवार कोणत्याही परीक्षेत यशस्वी होतील, ते नेहमी सरकारी शिक्षक बनण्यास पात्र राहतील.

ज्यांनी यापूर्वी टीईटी उत्तीर्ण केले, त्यांचे काय?

बैठकीत असं सांगण्यात आलं की जे पूर्वी टीईटी उत्तीर्ण झाले आहेत, ज्यांच्याकडे टीईटी क्वालिफाइड सर्टिफिकेट आहे, त्यांच्यासाठी हा निर्णय लागू होणार नाही नाही यासंबंधी कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर निर्णय घेण्यात येईल.

नोटिफिकेशननंतर लागू होणार बदल

एनसीटीईने आता यासंबंधी कोणतेही औपचारिक परिपत्रक किंवा तत्सम सूचना जारी केलेली नाही. विविध राज्या पात्रता परीक्षांसाठी संबंधित राज्यांकडून नोटिफिकेशन जारी केले जाईल. त्याचवेळी सीबीएसई बोर्ड देखील अधिकृत संकेतस्थळावर लवकरच यासंबंधी घोषणा करतील. अधिकृत नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर एनसीटीईद्वारे केलेला हा बदल लागू होणार आहे.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड