खुशखबर! क्रॉम्प्टन कंपनी महिलांना देणार इलेक्ट्रिशियन होण्याचे प्रशिक्षण आणि रोजगार संधी । Crompton Saksham Training Registration

Crompton Saksham Training Registration

Crompton Saksham Training Registration

Crompton Saksham Training Registration: राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) आणि टाटा स्ट्राइव्हच्या सहयोगाने क्रॉम्प्टन ग्रीव्हज कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स कंपनी महिलांना इलेक्ट्रिकल क्षेत्रातील तांत्रिक प्रशिक्षण देत आहे. याद्वारे या क्षेत्रातील लैंगिक असमानाता दूर करण्याचाही कंपनीचा उद्देश आहे. यासाठी जानेवारी २०२४ मध्ये ‘सक्षम’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, या अंतर्गत आता दुसऱ्या तुकडीची घोषणा करण्यात आली आहे. या  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

यासाठी तीन महिन्यांचा निवासी अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून, यात वर्गातील अभ्यासासह प्रत्यक्ष प्रशिक्षणाचाही समावेश आहे. अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील गावांमधील अनेक तरुण महिलांना यशस्वीरित्या प्रशिक्षित केले असून, त्यांना नोकऱ्याही दिल्या आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या धोरणात्मक सहयोगातून प्रशिक्षित महिलांना शाश्वत रोजगार मिळण्याची खात्री कंपनीने दिली असून, ‘टाटा स्ट्राइव्ह’ ही किमान ७० टक्के रोजगार मिळण्याची काळजी घेत आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या उपक्रमामुळे तरूण महिलांसाठी पारंपरिकरित्या प्रतिबंधित असलेल्या क्षेत्राचे दरवाजे खुले होत असून, महिलांच्या भावी पिढीला इलेक्ट्रिकल क्षेत्रात करिअर घडवण्याची प्रेरणा मिळत आहे. या महिला इलेक्ट्रिशियन्स म्हणून यशस्वी कारकिर्द करतील, असा आम्हाला विश्वास आहे. ‘सक्षम’सारखे उपक्रम व्यवसायाबरोबरच अधिक समान व सर्वसमावेशक समाज घडवण्यासाठी आवश्यक आहेत, असे मत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रोमीत घोष यांनी व्यक्त केले.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड