1 नोव्हेंबरपासून महाविद्यालये होणार सुरू; सुट्ट्यांना कात्री
Colleges Will Starts From 1st November
Colleges Will Starts From 1st November : यूजीसी शैक्षणिक सत्र २०२०-२१ साठी अॅकेडमिक कॅलेंडर जाहीर केले आहे.
Colleges Will Starts From 1st November : अंतिम वर्ष परीक्षांचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता देशातील सर्व कॉलेजांचे प्रथम वर्षाचे वर्ग १ नोव्हेंबरपासून भरविण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने नेमलेल्या समितने घेतला आहे. यानुसार यूजीसीने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाचे कॅलेंडरही जाहीर केले आहे. राज्यातील विद्यापीठांना १८ नोव्हेंबरपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याची मुभा मिळणार आहे. सत्र निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी सुट्यांच्या कालावधीत कपात करण्यात येणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने शैक्षणिक सत्र २०२०-२१ साठी अॅकेडमिक कॅलेंडर जाहीर केले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. पोखरियाल म्हणाले की विद्यापीठांमध्ये यूजी आणि पीजी प्रथम वर्षासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे तयार केलेल्या अॅकेडमिक कॅलेंडरला मंजुरी मिळाली आहे. याच ट्विटमध्ये पोखरियाल यांनी नव्या शैक्षणिक वर्षाचं पूर्ण वेळापत्रकही जारी केलं आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
करोनाच्या प्रादुर्भावामुळे अंतिम वर्ष परीक्षांपासून ते नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करेपर्यंत अनेक प्रश्न उभे आहेत. यात आता प्रथम वर्षाचे वर्ग कधी सुरू करावेत, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने समिती नेमली होती. समितीच्या शिफारशी स्वीकारून त्यानुसार कॅलेंडर जाहीर केले.
UGC academic calendar 2020-21: असे आहे संपूर्ण वेळापत्रक
- प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार – ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत
- पहिले सत्र / पहिल्या वर्षाचे वर्ग सुरू होणार – १ नोव्हेंबर २०२०
- परीक्षेच्या तयारीसाठी ब्रेक – १ मार्च २०२१ ते ७ मार्च २०२१ पर्यंत
- परीक्षा – ८ मार्च २०२१ ते २६ मार्च २०२१ पर्यंत
- सेमिस्टर ब्रेक – २७ मार्च २०२१ ते ४ एप्रिल २०२१
- सेमिस्टरचे वर्ग सुरू होणार – ५ एप्रिल २०२१
- परीक्षेच्या तयारीसाठी ब्रेक – १ ऑगस्ट २०२१ ते ८ ऑगस्ट २०२१
- परीक्षा – ८ ऑगस्ट २०२१ ते २१ ऑगस्ट २०२१
- सेमिस्टर ब्रेक – २२ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०२१
- पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात – ३० ऑगस्ट २०२१
सोर्स : म. टा.
पेपर का टाईम टेबल पोँसेस सर