महाविद्यालय शिफ्टमध्ये भरणार

College Filling in shifts

येत्या काळात ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व वाढणार आहे. त्यासाठी डिजिटल पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकार आणि शिक्षण संस्थांना पुढाकार घ्यावा लागेल. सोशल डिस्टन्सिंगसाठी महाविद्यालये शिफ्टमध्ये भरवावी लागतील, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी मांडले.

असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूलच्या पुणे शाखेने (एआयएमएस) “शिक्षण पद्धती’ या विषयावर वेबिनार आयोजित केला होता. त्यामध्ये तिरुचिरापल्ली आयआयएमचे संचालक भीमराया मेत्री, वेलींगकर इन्स्टिट्यूटचे संचालक उदय साळुंके, पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, इनक्‍युबेशन सेंटरच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे संस्थापक संजय चोरडिया, डी. वाय. पाटील, डॉ. गणेश राव, श्रीराम नेर्लेकर, भरत अग्रवालसह आदी सहभागी झाले.

संजय धोत्रे म्हणाले, “करोना’चे संकट कधी संपेल हे माहिती नाही. त्यामुळे अंदाज बांधत आपल्याला नियोजन करावे लागेल. काहीवेळा नियोजनात बदलही करावा लागेल. त्यामुळे वर्षभराचे शैक्षणिक वेळापत्रकही बदललेले असेल. अशा परिस्थितीत 40 टक्‍क्‍यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण करावे लागेल.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

संस्थाचालकांची भूमिका

  • – ऑनलाइन प्रवेशपद्धत राबवावी.
  • – डिजिटलसाठी पायाभूत सुविधेचे आव्हान.
  • – शैक्षणिक कर्ज मिळण्यात सुलभता यावी.
  • – अभ्यासक्रमांच्या मान्यतेस दोन वर्षांची वाढ करा.

सोर्स : प्रभात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Swapnil bodke says

    HSC results kadhi laganar

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड